शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
2
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
3
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
4
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
5
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
6
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
7
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
8
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
9
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
10
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
12
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
13
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
14
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
15
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
16
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
17
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
18
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
19
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
20
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
Daily Top 2Weekly Top 5

पिपरी पुनर्वसनवासीय महिलांचा निम्न वर्धा कार्यालयांवर घागर मोर्चा

By admin | Updated: April 30, 2016 02:19 IST

गावात पाण्याच्या थेंबाकरिता नागरिकांना भटकंती करण्याची वेळ आली असताना निम्न वर्धा विभागाकडून सहा वेळा पाठविण्यात येत असलेले पाण्याचे टँकर तीनच वेळा पाठविण्यात येत आहे.

अधिकाऱ्यांना घेराव : सहाऐवजी आता तीनदाच येतात टँकरवर्धा : गावात पाण्याच्या थेंबाकरिता नागरिकांना भटकंती करण्याची वेळ आली असताना निम्न वर्धा विभागाकडून सहा वेळा पाठविण्यात येत असलेले पाण्याचे टँकर तीनच वेळा पाठविण्यात येत आहे. यामुळे संतप्त झालेल्या पिपरी पुनर्वसन येथील महिलांनी शुक्रवारी निम्न वर्धा विभागाच्या कार्यालयावर घागर मोर्चा नेला. यावेळी अधिकाऱ्यांना घेराव घालत गावात पाणी पुरविण्याची मागणी केली. तर अधिकाऱ्यांनी यावर लवकरच मार्ग काढण्याचे आश्वासन दिल्याने महिलांनी माघार घेतली. निम्न वर्धा धरणात जमिनी गेलेल्या काही गावांचे पुनर्वसन सालोड (हिरापूर) नजीकच्या पिपरी येथे करण्यात आले. येथेही सुविधा पुरविण्याकरिता प्रशासनाच्यावतीने दिरंगाई करण्यात आली. गावात पाण्यासह इतर सुविधांची वाणवा आहे तर भर उन्हाळ्यात येथे पाण्याकरिताही नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. गावातील पाणी पुरवठ्याच्या विहिरीने तळ गाठला आहे. शिवाय पाणी पुरवठ्याच्या नळयोजनेची पाईपलाईन नादुरूस्त आहे. अशात गावात पाणी पुरविण्याकरिता दिवसात तीनच टँकर पाठविण्यात येत आहे. येथे पाण्याकरिता महिलांची भांडणे होत असल्याने टँकरचे पाणी विहिरीत टाकण्यात येत आहे. येथेही महिलांची भांडणे होत आहेतच. गावात पूर्वी प्रमाणे सहावेळा पाण्याचा टँकर पाठवा, अशी मागणी करीत येथील महिलांनी निम्न वर्धा कार्यालयावर घागर मोर्चा काढण्यात आला.यावर अधिकाऱ्यांनी गावातील पाणी समस्या निकाली काढण्याकरिता एक नवीन विहीर प्रस्तावित असून त्यावर निर्णय होणे बाकी आहे. तर नादुरूस्त असलेली पाईपलाईन दुरूस्त करण्याचाही प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. त्यालाही मंजुरी देण्यात आली आहे. यावर लवकरच काम सुरू होणार असल्याचे आंदोलनकर्त्यांना महिलांना सांगितले. यानंतर महिलांनी आंदोलन मागे घेतले. (प्रतिनिधी)