आट्या-पाट्या खेळाला आरक्षण मिळावे
By Admin | Updated: January 3, 2016 02:36 IST2016-01-03T02:36:34+5:302016-01-03T02:36:34+5:30
आट्या-पाट्या या खेळाला ऐतिहासिक महत्त्व आहे; पण या खेळाला विशेष महत्त्व राहिले नाही. इतिहास लक्षात घेता नोकरी संबंधित या खेळाला आरक्षण देण्यात यावे, ....

आट्या-पाट्या खेळाला आरक्षण मिळावे
दीपक कवीश्वर : राज्यस्तरीय स्पर्धेला प्रारंभ
वायगाव (नि.) : आट्या-पाट्या या खेळाला ऐतिहासिक महत्त्व आहे; पण या खेळाला विशेष महत्त्व राहिले नाही. इतिहास लक्षात घेता नोकरी संबंधित या खेळाला आरक्षण देण्यात यावे, असे मत महाराष्ट्र आट्या-पाट्या असोसिएशनचे महासचिव डॉ. दीपक कवीश्वर यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य आट्या-पाट्या महामंडळ संलग्नित जिल्हा आट्या- पाट्या असोसिएशनद्वारे आयोजित ३० वी पुरूष व २७ वी महिला राज्यस्तरीय आट्यापाट्या विजेतपद स्पर्धेला शुक्रवारी प्रारंभ झाला. यावेळी ते बोलत होते. स्पर्धेचे उद्घाटन खासदार रामदास तडस यांच्या हस्ते डॉ. दीपक कवीश्वर, जि.प. सभापती मिलिंद भेंडे, सुनील बुरांडे, जि.प.सदस्य मीना वाळके, पं.स. सदस्य ज्योत्सना मंगरुळकर, सरपंच अपर्णा शिंदे, प्राचार्य प्रदीप मेघे, चंद्रकांत ठक्कर, सतीश ईखार, रमेश वाळके यांच्या आतिथ्यात पार पडले. २३ पुरुष व १५ महिला संघातील खेळाडूंची प्रभात फेरी काढण्यात आली. यानंतर आट्या -पाट्या स्पर्धेला प्रारंभ झाला. खेळ पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.(वार्ताहर)