न्यायपालिकेवर विश्वासाकरिता त्वरित न्याय मिळावा

By Admin | Updated: April 4, 2017 01:18 IST2017-04-04T01:18:29+5:302017-04-04T01:18:29+5:30

लोकशाहीच्या तीन स्तंभापैकी न्यायपालिका हा महत्त्वाचा स्तंभ आहे. जनतेचा न्यायपालिकेवर विश्वास निर्माण करण्यासाठी शीघ्र व त्वरित न्याय मिळणे गरजेचे आहे.

Get justice for justice on the judiciary | न्यायपालिकेवर विश्वासाकरिता त्वरित न्याय मिळावा

न्यायपालिकेवर विश्वासाकरिता त्वरित न्याय मिळावा

वासंती नाईक : जिल्हा सत्र न्यायालयाचे उद्घाटन
हिंगणघाट : लोकशाहीच्या तीन स्तंभापैकी न्यायपालिका हा महत्त्वाचा स्तंभ आहे. जनतेचा न्यायपालिकेवर विश्वास निर्माण करण्यासाठी शीघ्र व त्वरित न्याय मिळणे गरजेचे आहे. व तोच उद्देश ठेऊन आज हिंगणघाट सारख्या ठिकाणी जिल्हा सत्र न्यायालयाचे उदघाटन होत आहे, यामुळे न्याय इच्छुक जनतेचे समाधान होईल, असे मत मुबंई उंचच न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या न्यायमूर्ती व वर्धा जिल्ह्याच्या पालक न्यायाधीश वासंती नाईक यांनी सोमवारी येथे व्यक्त केले.
येथे नव्याने निर्मित जिल्हा सत्र न्यायालय व वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालयाच्या उदघाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. न्यायाधीश नाईक यांनी आज येथे निर्माण होत असलेले न्यायालय हे न्याय लोकांच्या द्वारी या कायद्याच्या संकल्पनेला योग्य न्याय देईल व त्यासाठी येथील वकिलवर्ग अधिक जबाबदारीने वागतील अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा व सत्र न्यायाधीश संध्या रायकर होत्या.


हिंगणघाटला मिळाले जिल्हा न्यायालय
हिंगणघाट : येथील दिवाणी न्यायालयाच्या परिसरात सकाळी ८ वाजता या नवीन न्यायालयाचा उदघाटन सोहळा पार पडला. अनेक वर्षांपासून संघर्ष करीत असलेल्या हिंगणघाटकरांना कर्तव्यपूर्तीचा आनंद मिळाला.
व्यासपीठावर हिंगणघाट बार रुमचे अध्यक्ष अ‍ॅड. अशोक काकडे, नवनियुक्त जिल्हा दिवाणी न्यायाधीश संजय खोंगल यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. अतिथीच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. प्रास्ताविक अ‍ॅड. काकडे यांनी केले. संचालन दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर राजूरकर यांनी केले. येथे हे न्यायालय व्हावे यासाठी शासनदरबारी प्रयत्न करणारे आमदार समीर कुणावार याचे स्वागत ज्येष्ठ अ‍ॅड. आर. एल. सुटे यांनी केले. उपस्थितांचे आभार जिल्हा दिवाणी न्यायाधीश संजय खोंगल यांनी मानले.
कार्यक्रमाला दिवाणी न्यायाधीश अमोल सुर्वे, अनिरुद्ध चांदेकर, नेरकर, गराड, माजी आमदार राजू तिमांडे, ज्येष्ठ सहकार नेते अ‍ॅड. सुधीर कोठारी, ज्येष्ठ वकील चंद्रकांत देशपांडे, मुरलीमनोहर व्यास, जयस्वाल, डब्ल्यू. डी. जवादे यांच्यासह अनेक गणमान्य व्यक्ती उपस्थित होते.
कार्यक्रमाला अ‍ॅड. हेमंत बोंडे, आर. एल. सुटे, रवी मद्यलवार, अक्षय वाशीमकर, स्वप्नील धारकर, देवगिरकर, गजुभाऊ हिंगमीरे, रमेश थुल, प्रिया शेंडे, प्रतिभा बोरीकर, अर्शी अहमद, विनोद राजपुरीया, एस. डी. मून, बंडूभाऊ ढेकरे आदींनी सहकार्य केले. उदघाटन कार्यक्रमानंतर निसर्गवेध मित्र मंडळाच्यावतीने न्यायमूर्ती वासंती नाईक यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. अ‍ॅड. सागर हेमके यांनी हे वृक्ष उपलब्ध करून दिले.(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Get justice for justice on the judiciary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.