शहरं
Join us  
Trending Stories
1
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
2
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
3
'शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचांग पाहणार का?'; उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
4
समोर मृत्यू आला पण त्यांनी संघर्ष निवडला; गुराख्याने परतवला वाघ आणि बछड्यांचा हल्ला
5
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
6
AI बिनधास्त वापरा, पण त्याआधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा! नाहीतर स्वतःच अडचणीत सापडाल
7
५ राशींवर दुर्गा देवीची कायम लक्ष असते, लाभते विशेष कृपा; हाती राहतो पैसा, शुभ-कल्याण-भरभराट!
8
कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला
9
सेन्सेक्सलाही टाकले मागे! सरकारी कंपनीचा शेअर महिन्यात ४०% नी वधारला; तेजीचे कारण काय?
10
लेक राहासाठीही आहे वेगळी व्हॅनिटी व्हॅन, आलियाचा प्रश्न ऐकून महेश भटही झाले शॉक
11
भयावह! "आमची कबर इथेच..."; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट
12
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार हवा, पण अर्धी अमेरिकाच नाखूश! सर्वेक्षणात झाला धक्कादायक खुलासा 
13
IND vs PAK: 'इतका राग होता तर खेळलाच कशाला?' हस्तांदोलन न करण्यावर शशी थरूर संतापले!
14
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
15
वाढीव मदतीचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर मांडू; मंत्री मकरंद पाटील यांचे शेतकऱ्यांना आश्वासन
16
भाजपाच्या अध्यक्षपदासाठी नाव आघाडीवर, कशी असेल पुढची वाटचाल? फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
17
भगवा कुर्ता, कपाळी भस्म; संजय दत्तने घेतलं महाकालेश्वरचं दर्शन, भक्तीत तल्लीन झाला अभिनेता
18
'रशियाचे लष्कर कागदी वाघासारखेच'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले, रशियानेही केला पलटवार
19
कारगिल युद्धावेळीही आपण पाकिस्तानसोबत..., हस्तांदोलन वादावरून शशी थरूर यांनी दिला टीम इंडियाला सल्ला

दारूविक्रेत्यांना लगाम घालून दारूबंदी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 21:47 IST

वर्धा जिल्ह्याला गांधी जिल्हा घोषित करून यात दारूबंदी करण्यात आली. याला अनेक वर्षे लोटले असून पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादामुळे जिल्ह्यात खुलेआम दारू विकल्या जात असते, हे वास्तव असून वेळोवेळी वॉश आऊट केल्या जात असतानाही पुलगाव शहरात अवैधरीत्या मोठ्या प्रमाणात दारू विक्री होत आहे.

ठळक मुद्दे२५० महिला कार्यकर्त्यांचे पोलीस प्रशासनाला साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : वर्धा जिल्ह्याला गांधी जिल्हा घोषित करून यात दारूबंदी करण्यात आली. याला अनेक वर्षे लोटले असून पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादामुळे जिल्ह्यात खुलेआम दारू विकल्या जात असते, हे वास्तव असून वेळोवेळी वॉश आऊट केल्या जात असतानाही पुलगाव शहरात अवैधरीत्या मोठ्या प्रमाणात दारू विक्री होत आहे. त्याचा परिणाम परिसरातील सर्व सामान्य कुटुंबावर होत आहे. खून, मारामारी घरफोडी या गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. त्याचा परिणाम समाजाच्या मानसिकतेवर होत असून शहरातील दारू विक्रेत्यावर लगाम घालून अवैध दारूविक्रीवर अंकुश घालावा, अशी मागणी शहरातील डॉ.आंबेडकर नगर भागातील ३०० महिला कार्यकर्त्यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे.महिलांनी केलेल्या तक्ररीनुसार डॉ. आंबेडकर नगर भागात खुलेआम दारू विकल्या जात आहे. ही दारू मानवी शारिरीक दृष्ट्या विषारीयुक्त असून शरिराला घात करणारी आहे. दारू पिणाऱ्यांना बरेच प्रकारचे आजार होवून अनेकांचा बळीही गेला आहे. तर अनेकांना मेंदूचे, आतडी, फुफ्फुसाचे, किडनीचे, रक्ताचे शरीर कंपाचे आजाराने ग्रासलेले आहेत. आंबेडकर नगर येथील आठवडी बाजार परिसरात अल्पवयीन मुले, विद्यार्थ्यांना गांजा, चरस याची नशा करण्याची सवय लागली आहे.आंबेडकरनगरमध्ये गरीब कुटुंब मोठ्या प्रमाणात वास्तव्याला आहेत. सदर कुटूंबातील लोक मोलमजुरी व कामधंदा करून आपले कुटूंबाचा उदरनिर्वाह करतात. परंतु या भागात होत असलेल्या अवैद्य दारू विक्रीमुळे व या दारू सेवनामुळे घरात दररोजची भांडण, झगडे, मारामारी होवून कलह व अशांती निर्माण झाली आहे. त्यामुळे आमच्या मुला बाळांवर, शैक्षणिक, मानसिक परिणाम होवून सुख, शांती हिरावून घेतली गेली असल्याचा आरोपही निवेदनातून करण्यात आला आहे.मागील कित्येक वर्षांपासून सुरू असलेली दारू विक्रेत्यांची दादागिरी, गुंडगिरी, झुंडशाही सुरूच आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना अश्लिल शिवीगाळ, मारझोड करणे, चाकु, सुरे, भाले, फरशे तलवारी काढणे, वॉर्डात दहशतीचे वातावरण निर्माण करून खुनांची व जीवे मारण्याची धमकी देणे, असा प्रकार सर्रास सुरू आहे, असे निवेदनात म्हटले आहे.१५ दारूविक्रेत्यांचा उच्छाद, महिला व मुली त्रस्तयेण्याजाणाऱ्या रस्त्यावर उभे राहून तरूण महिला, मुली, विद्यार्थ्यांना अश्लिल चाळे करणे यामुळे परिसरातील महिला, विद्यार्थीनी, ज्येष्ठ नागरिकांना या दारूविक्रेत्यांच्या घरासमोरून जाताना जीव मुठीत घेवून जावे लागत आहे. येथील १४-१५ दारू विक्रेत्यांनी घातलेल्या उच्छादामुळे राहणे, चालणे, फिरणे, जगणे मुश्कील झाले असल्याचा आरोपही निवेदनातून पोलीस प्रशासनाला कल्पना परिहार, आशा नंदेश्वर, रेखा सहारे, कविता सरदारे, जीजा वांदिले, शालू जांभुळकर, माया सरदारे यांच्यासह २५० महिलांनी केला आहे.