सामान्य ज्ञान स्पर्धेचे पुरस्कार वितरण
By Admin | Updated: February 7, 2016 00:15 IST2016-02-07T00:15:39+5:302016-02-07T00:15:39+5:30
लोकमत बाल विकास मंच व सरस्वती विद्या मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने सामान्य ज्ञान स्पर्धा २३ जानेवारी रोजी यशवंत विद्यालय येथे घेण्यात आली.

सामान्य ज्ञान स्पर्धेचे पुरस्कार वितरण
बाल विकास मंचचा उपक्रम : ६०० विद्यार्थ्यांचा सहभाग
वायगाव (नि.) : लोकमत बाल विकास मंच व सरस्वती विद्या मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने सामान्य ज्ञान स्पर्धा २३ जानेवारी रोजी यशवंत विद्यालय येथे घेण्यात आली. यात ६०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यातील स्पर्धा परीक्षेचा निकाल जाहीर करून पुरस्कारांचे वितरण शनिवारी सकाळी ८.३० वाजता सरस्वती विद्या मंदिर येथे करण्यात आले.
अध्यक्षस्थानी सरस्वती विद्या मंदिर स्थानिक समितीचे अध्यक्ष डॉ. संजय शेंद्रे तर अतिथी म्हणून प्राथमिक मुख्याध्यापिका रूपाली बोंदरे, माध्य. मुख्याध्यापक चेतन दंडारे, जया प्रजापती, स्पर्धा आयोजक गौरव देशमुख, जि.प. शिक्षक तडस, घोडे, यशंवत विद्यालयाच्या शिक्षिका देशमुख आदी उपस्थित होते. जवाहरलाल दर्डा व मॉ सरस्वती यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमास प्रारंभ झाला. प्रास्ताविक गौरव देशमुख तर संचालन तुकाराम पोहाणे यांनी केले.
यातील अ गटात १०० गुण घेणारे दोन विद्यार्थी असल्याने प्रथम श्रावणी लोंडे व तमन्ना राजपुरोहित यांना, द्वितीय सचिन पोहाणे, देवयानी पोराटे यांना तर तृतीय क्रमांक जि.प. शाळेचे दोन विद्यार्थी ओम आजनकर, अभिजीत कुंभारे यांना देण्यात आले. प्रोत्साहन पुरस्कार निकीता वंजारी, क्रीश चाफले, मनस्वी डूडूरकर, आचल कुंभारे, यश देशमुख आॅक्सफोर्ड पब्लिक स्कूल वायगाव (नि.) याला देण्यात आले. ब गटात प्रथम रूजल पाटील, द्वितीय ओम चौधरी सरस्वती विद्या मंदिर तर तृतिय पुरस्कार माधुरी तेलरांधे यशवंत विद्यालय वायगाव व वैष्णवी घोडे जि.प. शाळा वायगाव यांना देण्यात आला.
क गटात प्रथम गौरव भोयर, द्वितीय यशवंत शिंदे व तृतीय तेजस घोडखांदे यांना देण्यात आले. प्रोत्साहनपर पुरस्कार तेजस थूल, कुणाल डफरे, भावेश रावेकर सरस्वती विद्या मंदिर वायगाव (नि.) यांना देण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुरस्कृत करण्यात आले. कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांचे आभार माध्य. मुख्याध्यापक चेतन दंडारे यांनी मानले.(वार्ताहर)