सामान्य होम क्वारंटाईन, अधिकारी नो क्वारंटाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 05:01 IST2020-06-09T05:00:00+5:302020-06-09T05:01:21+5:30
शासनाने कोरोनाच्या चवथ्या लॉकडाऊन काळामध्ये बºयाच प्रमाणात शिथिलता दिली आहे. तसेच शिथिलतेच्या तिसºया टप्प्यात शासकीय कार्यालयातील उपस्थिती संख्या वाढविण्याबद्दलही आदेश दिले आहे. मात्र, जिल्हाबंदी अद्याप कायम आहे. बाहेर जिल्ह्यात जाण्याकरिता ई-पास काढणे व आल्यानंतर १४ दिवस क्वारंटाईन होणे बंधनकारक आहे.

सामान्य होम क्वारंटाईन, अधिकारी नो क्वारंटाईन
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : बाहेर जिल्ह्यात जाण्याकरिता सर्वसामान्यांना ई-पास काढणे तसेच बाहेर जिल्ह्यातून आल्यानंतर १४ दिवस होम क्वारंटाईन होणे बंधनकारक केले आहे. मात्र, हा नियम शासकीय अधिकारीच पाळत नसल्याचे दिसून येत आहे. आजही दुसऱ्या जिल्ह्यातून अधिकाऱ्यांची ये-जा सुरु असून वर्ध्यातील अधिकारी नागपुरमध्ये बैठकीला जात आहे. पण, ते क्वारंटाईन होत नसल्याने कोरोनाचा संसर्ग फक्त सर्वसामान्यांमुळेच होतो काय? असा प्रश्न वर्धेकरांकडून उपस्थित केल्या जात आहे.
शासनाने कोरोनाच्या चवथ्या लॉकडाऊन काळामध्ये बºयाच प्रमाणात शिथिलता दिली आहे. तसेच शिथिलतेच्या तिसºया टप्प्यात शासकीय कार्यालयातील उपस्थिती संख्या वाढविण्याबद्दलही आदेश दिले आहे. मात्र, जिल्हाबंदी अद्याप कायम आहे. बाहेर जिल्ह्यात जाण्याकरिता ई-पास काढणे व आल्यानंतर १४ दिवस क्वारंटाईन होणे बंधनकारक आहे. पण, आजही बहुतांश शासकीय कार्यालयाचे कार्यालय प्रमुख अधिकारीच नागपूर जिल्ह्यातून ये-जा करीत असल्याचे निदर्शनास आले आहे.
प्रशासनाला कोणतीही माहिती न देता कार्यालयात येणे आणि निघून जाणे असा त्यांचा दिनक्रम सुरु आहे. विशेषत: पशुसंर्वधन विभागाची सोमवारी नागपुरला बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीला वर्ध्यातील जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रज्ञा डायगव्हाणे व जिल्हा उपायुक्त डॉ. राजीव भोजने हे दोन्ही अधिकारी उपस्थित होते. आता हे अधिकारी वर्ध्यात आल्यानंतर नियमानुसार होम क्वारंटाईन होणार का? तसेच इतरही विभागाचे अधिकारी बैठकीकरिता नागपुरला जात असल्याने तेही क्वारंटाईन होतात का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जिल्ह्याच्या बाहेर जावून आल्यानंतर शासनाच्या नियमावलीनुसार १४ दिवस होम क्वारंटाईन होणे बंधनकारक आहे. पण, काही अधिकारी नागपुरला बैठकीनिमित्त जात असल्याची माहिती आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाºयांची चर्चा झाली करण्यात आली असून त्यासंदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल.
- सुरेश बगळे, उपविभागीय अधिकारी, वर्धा.
हेटी (कुंडी) येथील गवळाऊ पशुपैदास केंद्रासंदर्भात मंत्रीमहोदयांनी नागपुरात बैठक बोलावली होती. त्या बैठकीला जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.डायगव्हाणे व मी उपस्थित होतो. इतर जिल्ह्यातील अधिकारी या बैठकीला आले होते. वरिष्ठांचा आदेश असल्यामुळे आम्हाला नागपुरला जावे लागले.
- राजीव भोजने, जिल्हा उपायुक्त, पशुसंवर्धन विभाग, वर्धा