शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
4
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
5
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
6
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
7
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
8
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
9
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
10
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
11
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
12
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
13
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
14
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
15
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
16
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
17
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
19
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
20
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय

Ganesh Chaturthi 2018; वर्धा जिल्हा; नाचणगावातील १२५ वर्षे पुरातन गणेश मंदिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 11:20 IST

पुलगाव हे शहर अस्तित्वात येण्यापूर्वी गुंजखेडा या गावाकडे मालगुजारी होती. इंग्रजांनी १८८० मध्ये रेल्वे मार्गासाठी वर्धा (वरदा) नदीवर रेल्वे पूल बांधला व पुलगाव शहर उदयास आले.

ठळक मुद्देकपडा उद्योगाला ट्रेडमार्कही श्री गणेश ठरला

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पुलगाव हे शहर अस्तित्वात येण्यापूर्वी गुंजखेडा या गावाकडे मालगुजारी होती. इंग्रजांनी १८८० मध्ये रेल्वे मार्गासाठी वर्धा (वरदा) नदीवर रेल्वे पूल बांधला व पुलगाव शहर उदयास आले. रेल्वे सुरू झाल्याने आठ जीन सुरू होते. याच मंडळींनी १८९० मध्ये चार एकर जागेत गणेश व शितला माता मंदिराचे बांधकाम केले.तेव्हापासून मंदिरात पुजारी म्हणून पं.मदनलाल शर्मा कार्यरत होते. १ मे २०१३ मध्ये पं. कमलनयन यांचा मृत्यू झाल्याने वंशपरंपरागत पुजारी म्हणून सध्या पं. दिलीप कमलनयन शर्मा कार्यरत आहेत. या ठिकाणी पूर्वीचे गणेश मंदिर आजही त्याच स्थितीत आहे. महाराजदिन यांनी त्या काळी पिंपळ वृक्षाखाली देवीची स्थापना केली. आज तेथे छोटेखानी शितला माता मंदिर आहे व लागूनच गणेश मंदिर आहे. धार्मिक प्रवृत्ती व निष्ठा या भावनेतून गणेश जिनींग व प्रेसींग तर १८८१ मध्ये पुलगाव कॉटन मिल सुरू झाला. त्या कपडा उद्योगाला ट्रेडमार्कही श्री गणेश ठरला. हे दोन्ही देवी देवता जागृत मानल्या जाते. आजही मार्बलची सुंदर गणेशमूर्ती भाविकांचे श्रद्धास्थान आहे. १९०२ मध्ये पुलगाव नगर परिषदेची स्थापना होवून नगररचना करण्यात आली. १९१० मध्ये जागतिक बाजारपेठेतील आर्थिक मंदिमुळे शहरातील अनेक उद्योग बंद करून भांडवलदारांनी उद्योगांची विक्री केली. १९५५-५६ मध्ये मालगुजारी संपली आणि २२ नोव्हेंबर १९९५ रोजी गणेश व शितला माता देवस्थान ट्रस्टचे प्रकरण सहधर्मदाय आयुक्ताकडे न्यायप्रविष्ठ झाले. ११ वर्षे न्यायालयीन प्रकरण सुरू होते. २८ नोव्हेंबर २००६ रोजी निकाल लागला व देवस्थान ट्रस्टला अधिकार मिळाले. मध्यंतरी शहरात अनेक मोठी मंदिरे झाली, पण न्यायालयीन खर्च, उत्पन्न स्त्रोंताचा अभाव यामुळे या जागृत देवस्थानाचा विकास होवू शकला नाही. इंग्रज राजवटीत १८९३ पासून गणेशोत्सवाच्या माध्यमातून स्वातंत्र्यासाठी देशप्रेम जागृत करण्याचे कार्य केले जात होते. शहरातील नागरीक आजही नवरात्र गणेशोत्सव आदी कार्यक्रमांतून या मंदिराच्या प्रांगणात उत्सव साजरे करतात. न्यायालयीन प्रकरणामुळे मंदिराचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले होते. पण भाविकांची श्रद्धा कायम आहे. वास्तविक, येथील प्रशस्त जागा, १२५ वर्षांचा इतिहास, भाविकांची श्रद्धा पाहता शासनाने धार्मिक स्थळाचा दर्जा व विकास निधी देणे गरजेचे आहे.

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८