गांधीजी त्यागाचे प्रतीक असून मानवता जपणारे होते
By Admin | Updated: February 2, 2016 01:56 IST2016-02-02T01:56:35+5:302016-02-02T01:56:35+5:30
गांधी आश्रम पाहायला तुम्ही तरूण मंडळी आला. राष्ट्रीय महसूल सेवा ही परीक्षा उत्तीर्ण करून, प्रशिक्षण घेऊन तुम्ही शासकीय सेवेत आता रूजू होणार आहात.

गांधीजी त्यागाचे प्रतीक असून मानवता जपणारे होते
श्रीराम जाधव : भावी महसूल अधिकाऱ्यांना मार्गदर्शन
सेवाग्राम : गांधी आश्रम पाहायला तुम्ही तरूण मंडळी आला. राष्ट्रीय महसूल सेवा ही परीक्षा उत्तीर्ण करून, प्रशिक्षण घेऊन तुम्ही शासकीय सेवेत आता रूजू होणार आहात. गांधीजींना समजण्यासाठी मोहम्मद अली जिना, विनायक सावरकर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांमध्ये बापू बॅरिस्टर असूनही सामान्य मानसासारखे उच्च, सिद्धांतपूर्ण जीवन जगले. ते त्यागाचे प्रतीक असून मानवता जपणारे होते, असे मत प्रा.डॉ. श्रीराम जाधव यांनी व्यक्त केले.
हुतात्मा दिनी सेवाग्राम आश्रमात एनएडीटी नागपूर येथून ३२ मुली व १३० मुले, अशा १६० भावी भारतीय महसूल अधिकारी आले होते. या भावी अधिकाऱ्यांना ते मार्गदर्शन करीत होते. ब्रिटीश पार्लमेंटसमोर गांधीजींचा पुतळा आहे. बापूंनी ब्रिटीशांशी सत्य, अंहिसा व सत्याग्रहाच्या माध्यमातून लढा दिला. ब्रिटीशांनी ‘तोडा, फोडा, राज्य करा’ ही नीती वापरली; पण गांधींसोबत संपूर्ण देश असल्याने देश स्वातंत्र्य झाला. १९१६ मध्ये बनारस विश्वविद्यालयात विद्यार्थ्यांसमोर स्वच्छतेवर भाषण दिले. मंदिर स्वच्छ; पण आजूबाजूचा परिसर बकाल का? स्वच्छतेचे काम स्वत:पासून करून त्याचे सार्वत्रिकीकरण व्हावे, असे गांधीजींनी विद्यार्थ्याना सांगितले. देशात स्वच्छता अभियान सुरू असले तरी ते फोटो काढण्यापर्यंत नसावे. करणी व कथनीमध्ये समानता असल्याने बापूंना जग मानते. ही प्रेरणा भूमी असून देशाची जबाबदारी तुमच्या खांद्यावर आहे. गांधी आचरणाचा विषय आहे, असेही डॉ. जाधव यांनी सांगितले.(वार्ताहर)