शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

बेमुदत कामबंद आंदोलनातील तहसीलदार-नायब तहसीलदारांची 'गांधीगिरी'

By महेश सायखेडे | Updated: April 3, 2023 18:20 IST

'ग्रेड-पे'च्या मागणीसाठी गांधी पुतळ्या समोर दिले धरणे

वर्धा : तहसीलदार आणि नायब तहसीलदारांनी 'ग्रेड-पे'च्या मागणीसाठी बेमुदत कामबंद आंदोलन ३ एप्रिलपासून सुरू केले आहे. आंदोलनाच्या पहिल्या दिवशी सोमवारी महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेच्या नेतृत्त्वात स्थानिक गांधी पुतळा परिसरात एकत्र आलेल्या तहसीलदार व नायब तहसीलदारांनी धरणे दिले. आंदोलनादरम्यान विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत महसूल मंत्र्यांना पाठविण्यात आले.

महाराष्ट्र राज्यातील महसूल विभागातील नायब तहसीलदार, राजपत्रित वर्ग-२ हे महत्त्वाचे पद आहे. पण नायब तहसीलदार पदाचे वेतन राजपत्रित वर्ग-२ चे नसल्याने महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने नायब तहसीलदार यांचे ग्रेड-पे वाढविण्याबाबत शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. पण संघटनेच्या मागणीला केराची टोपली दाखविली जात असल्याने समस्या अजूनही कायम आहे. नायब तहसीलदार राजपत्रित वर्ग-२ यांचे ग्रेड-पे ४ हजार ८०० रुपये करण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

आंदोलनात वर्धेचे तहसीलदार रमेश कोळपे, आर्वीचे तहसीलदार विद्यासागर चव्हाण, कारंजाच्या तहसीलदार एश्वर्या गिरी, आष्टीचे तहसीलदार सचिन कुमावत, समुद्रपूरचे तहसीलदार कपील हटकर, देवळीचे तहसीलदार राजेश सरवदे, हिंगणघाटचे तहसीलदार सतीश मासाळ, सेलूचे तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, तहसीलदार विजय लोखंडे, नायब तहसीलदार अतुल रासपायले आदी सहभागी झाले होते.

तालुका कचेरीतील कामकाज प्रभावित

तहसीलदार व नायब तहसीलदारांच्या बेमुदत कामबंद आंदोलनामुळे जिल्ह्यातील आठही तालुकाकचेरीतील कामकाज सोमवारी प्रभावित झाले होते. तहसीलदार आणि नायब तहसीलदार बेमुदत कामबंद आंदोलनामुळे त्यांच्या दालनात नसल्याने विविध कामानिमित्त तहसील कार्यालयांत आलेल्यांना आल्या पावली परत जावे लागले.

टॅग्स :Employeeकर्मचारीagitationआंदोलनwardha-acवर्धा