पारंपरिक वेशात देतो गांधी विचारांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 12:05 AM2018-02-24T00:05:06+5:302018-02-24T00:05:06+5:30

भागलपूर बिहार येथील ५१ वर्षीय गांधी विजयकुमारसिंग धावक हा पारंपरिक वेशात व भारताचा राष्ट्रध्वज खांद्यावर घेऊन सर्वोदय समाज संमेलनात सहभागी होण्यासाठी आश्रमात आले आहे.

Gandhi Voices | पारंपरिक वेशात देतो गांधी विचारांची माहिती

पारंपरिक वेशात देतो गांधी विचारांची माहिती

Next
ठळक मुद्देभागलपूर बिहार येथील ५१ वर्षीय गांधी विजयकुमारसिंग धावक

ऑनलाईन लोकमत
सेवाग्राम : भागलपूर बिहार येथील ५१ वर्षीय गांधी विजयकुमारसिंग धावक हा पारंपरिक वेशात व भारताचा राष्ट्रध्वज खांद्यावर घेऊन सर्वोदय समाज संमेलनात सहभागी होण्यासाठी आश्रमात आले आहे. ते पारंपरिक वेशात व सोप्या शब्दात गांधी विचार कसे मार्गदर्शक आहेत, याची माहिती नागरिकांना देतात.
गत ३५ वर्षांपासून गांधीजीचे विचार, त्यांचे कार्य आणि भारत मातेचा जयघोष करीत राष्ट्र्ध्वजाचा सन्मान करा, देशाला राष्ट्रभक्तांच्या त्यागातून स्वराज्य मिळाले, त्याचे स्मरण करून देशाच्या एकता, अखंडता, विकास आणि स्वच्छतेसाठी झटा असे सांगत ते प्रबोधन करीत आहेत. ते स्वत:ला सर्वोदयी आणि गांधी भक्त मानतात. म्हणून त्यांनी स्वत:चे नाव गांधी विजय कुमार यादव धावक असे ठेवले. धावक हे नाव पण त्यांनी जोडले. ते विद्यार्थी जीवनात विविध धाव स्पर्धेत सहभागी होत. शिवाय मॅरेथॉन स्पर्धेतही त्यांनी भाग घेतला होता. १९९०मध्ये राजीव गांधी भागलपूरला सद्भावना यात्रेसाठी आले होते. त्यात आपणही सहभागी होऊन धावलो. राजीव गांधी यांनी आपल्याला गाडीवर बोलावून गळ्यात पुष्पहार टाकून सन्मानित केले. त्यामुळे आपण धावक हे आपल्या नावात जोडल्याचे विजयकुमार सांगतात. डॉ. सुब्बाराव हे आपल्यासाठी आदर्श आहेत. त्यांच्या आणि सर्वोदयाच्या प्रत्येक शिबिरांमध्ये व संमेलनात आपण सहभागी होतो. अरूणाचल प्रदेशातील दुर्गम भागात त्यांनी प्रवास केला. चंपारण्यामध्ये फिरले. भीती हा शब्द त्यांना माहिती नाही, नसल्याचेही ते सांगतात. गांधीवाद्यांनी युवकांना संधी दिली पाहिजे. गांधीवाद गावागावात पोहचविला पाहिजे. तेव्हाच या देशाचा खºया अर्थाने विकास होईल. संमेलनानंतर हरियाणा येथे जाणार असल्याचे एल. एल. बी. झालेले विजयकुमार म्हणाले.

Web Title: Gandhi Voices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.