गांधी विचारच समाजात नवसंजीवनी आणेल!

By Admin | Updated: November 29, 2014 23:25 IST2014-11-29T23:25:55+5:302014-11-29T23:25:55+5:30

महात्मा गांधी यांच्या विचाराने पे्ररित झालेला कार्यकर्ता वैयक्तिक जीवनासह संवेदनशीलतेने समाजात नवसंजीवनी निर्माण करेल, असे मत गांधी विचारक व्याख्यात कुमार प्रशांत यांनी व्यक्त केले.

Gandhi thought will bring neo-socialism in society! | गांधी विचारच समाजात नवसंजीवनी आणेल!

गांधी विचारच समाजात नवसंजीवनी आणेल!

वर्धा : महात्मा गांधी यांच्या विचाराने पे्ररित झालेला कार्यकर्ता वैयक्तिक जीवनासह संवेदनशीलतेने समाजात नवसंजीवनी निर्माण करेल, असे मत गांधी विचारक व्याख्यात कुमार प्रशांत यांनी व्यक्त केले.
मगन संग्रहालयात गांधी ‘विचाराबद्दल समाजात पसरविलेले गैरसमज व इतिहासातील सत्य’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले़ यावेळी गांधी विचारांशी जुळलेल्या कार्यकर्त्यांना प्रबोधन करताना ते बोलत होते़
कुमार प्रशांत पूढे म्हणाले की, महात्मा गांधींना दोन पद्धतीने स्वीकार केला, सुविधांचे गांधी व द्विदातले गांधी आहे. शासन आणि प्रशासनाने सुविधांचे गांधी विचारांचा स्वीकार केला व गांधी विचारकांनी द्विदाच्या गांधींचा अवलंब केला. कारण, यांना रचनात्मक कामांच्या उपयोगावर विश्वास राहिला नाही. यामुळे सुविधांच्या गांधीने गांधी विचारातील तत्वज्ञानाचे तुकडे केले तर द्विदा गांधींनी विचारांचे महत्त्व कमी केले; पण महात्मा गांधी ही संपत्ती कधीही संपुष्टात येऊ शकत नाही. जगात ख्रिश्चन धर्मपुस्तकांच्या प्रकाशनानंतर प्रत्येक वर्षाला गांधी व्यक्तिमत्वावर ३०० पुस्तके प्रकाशित होतात़ महात्मा गांधी यांनी लिहिलेली हिंद स्वराज पुस्तक सर्वाधिक लहान आहे; पण ते आजच्या वर्तमान परिस्थितीचे दर्शन घडवित आहे़ या पुस्तकावर विविध देशाचे संशोधन कार्य चाललेले आहे. महात्मा गांधी यांच्या कल्पनेतील समाज संयमनियंत्रित व संयमचलित असायला पाहिजे. ज्याचा आधार सामान्य नागरिक आहे. चुकीच्या मार्गाने भ्रमित झालेल्या प्रत्येक माणसावर समाज नियंत्रण ठेवेल़ यातून ग्रामस्वराज्य साकार होईल, असे गांधीजींचे विचार होते.
अनियंत्रित पुंजीवाद समाजात असंतुलन निर्माण करीत आहे. पुंजीवाद आणि सत्ता एकत्रित आल्यास समाज परावलंबी होईल. जसे समाजात रचनात्मक कार्य करणाऱ्या शक्तीपेक्षा सांप्रदायिकता, विषमता, हिंसा पसरविणाऱ्या शक्ती वेगाने आणि मजबुतीने काम करीत आहे. या शक्तीला समाजाने वेळीच नियंत्रित न केल्यास गांधी विचार अप्रभावी ठरतील़ गांधी विचाराने पे्ररित झालेल्या कार्यकर्ता सत्य व अहिंसेच्या आधारे अवाजवी आवाजांना व बंदुकांच्या भीतीला न घाबरता निष्ठेने सुजान समाज निर्मितीसाठी कार्य करावे. गांधीजींचे शेवटचे लिखित वाक्य असे होते की, भारतातील सात लाख गावांत प्रत्येक गावाच्या एक रचनात्मक कार्यकर्ता मिळाला तर मी नव्या भारताची निर्मिती करू शकतो, असे मत गांधी विचारक व्याख्याते कुमार प्रशांत यांनी व्यक्त केले. व्याख्यानाला ३० संस्थांचे गांधी विचारांशी जुळलेले १२० कार्यकर्ते उपस्थित होते़(स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Gandhi thought will bring neo-socialism in society!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.