‘गांधी सेवा संघ’ झाला ९१ वर्षांचा

By Admin | Updated: July 12, 2014 23:49 IST2014-07-12T23:49:24+5:302014-07-12T23:49:24+5:30

महात्मा गांधी जिवंत असताना त्यांच्या नावाने स्थापना करण्यात आलेली एकमेव संस्था म्हणजे गांधी सेवा संघ होय! १३ जुलै १९२३ रोजी स्थापना झालेल्या या संस्थेला आज ९१ वर्षे पूर्ण झाली आहेत़

'Gandhi Seva Sangh' was 9 1 year | ‘गांधी सेवा संघ’ झाला ९१ वर्षांचा

‘गांधी सेवा संघ’ झाला ९१ वर्षांचा

दिलीप चव्हाण - सेवाग्राम
महात्मा गांधी जिवंत असताना त्यांच्या नावाने स्थापना करण्यात आलेली एकमेव संस्था म्हणजे गांधी सेवा संघ होय! १३ जुलै १९२३ रोजी स्थापना झालेल्या या संस्थेला आज ९१ वर्षे पूर्ण झाली आहेत़
गांधीजींच्या सूचनेप्रमाणे अखिल भारतीय रचनात्मक संस्थांच्या नोंदी, दस्तावेज, प्रकाशन, पुस्तक व पत्रिकांचे संकलन आदींचे कार्य करणे आणि त्यांचे सरंक्षण, उत्तम व्यवस्था करून चांगल्या प्रकारचे गं्रथालय उभे करण्याचे काम गांधी सेवा संघाने केले़ यातूनच सर्वोदय विचारांचे अध्ययन होण्यास हातभार लागण्याची दृष्टी होती़ आज ग्रंथालय सुस्थितीत असून आचार्यच्या अध्ययनासाठी या ग्रंथालयातील संदर्भ ग्रंथांचा उपयोग घेतला जातो़ या ठिकाणी त्या काळातील सुधारित चरखा, बापूंचे पत्र, साहित्य, वस्तूंचे जतनही करण्यात आलेले आहे़ संघाच्या स्थापनेकरिता वर्धेला पहिली बैठक झाली़ यात चक्रवर्ती राजगोपालचारी, डॉ़ राजेंद्र प्रसाद, सरदार वल्लभभार्ई पटेल, श्रीकृष्णदास जाजू आदी उपस्थित होते़ गांधीजींच्या अहिंसात्मक असहयोग कार्यक्रमात पूर्णत: सहभागी कार्यकर्त्यांना मदत करण्याचा उद्देश संघ स्थापनेचा होता़ प्रत्येक सदस्य प्रांतामध्ये शाखा निर्माण करून संघटनात्मक कार्य करण्यासाठी संघाच्या केंद्रीय निधीतून ४० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचे ठरले़ जेणेकरून विशाल अखिल भारतीय संघटन उभे राहील़ कार्यकर्त्यांच्या परिवाराची जीवन व्यापनाचीही व्यवस्था करण्याचे नियोजन करण्यात आले होते़
गांधी सेवा संघ गांधीजींच्या विचारांची महत्त्वपूर्ण रचना मानल्या गेली आहे़ ही संस्था रचनात्मक कार्यासाठी समर्पित होती़ बापूंनी जो विचार व कार्य केले ते सदैव सर्वांसाठी पे्ररणेचे केंद्र बनले़ देशात ज्या रचनात्मक कार्य करणाऱ्या संस्था होत्या, त्या सर्वांना गांधीजींचे मार्गदर्शन मिळत होते; पण प्रत्येक संस्थेला आपली मर्यादा जाणवू लागली़ संस्थेने आपापले तंत्रज्ञान विकसित केले होते़ तंत्रज्ञानाबरोबर राष्ट्रीय स्तरावर मंत्रबोध करणारे राष्ट्रीय संघटन आवश्यक होते़ जे सर्व रचनात्मक कार्य करणाऱ्या संस्थांना एकसुत्रात बांधून योग्य दिशा प्रदान करेल़ सर्वांच्या दृष्टीने गांधी सेवा संघ हिच संस्था योग्य दिशादर्शक व आधारवड वाटायला लागली़ १९३४-३५ मध्ये बापूंनी संघाची धूरा सांभाळली़ त्यांनी याला अहिंसेची प्रयोगशाळा माणून कार्य सुरू केले़ अहिंसक समाज निर्माणासाठी समाजातील हिंसक व रचनात्मक संस्थांचे महत्त्व हळूहळू कमी करणे़ यामुळे मानवाला खरे स्वराज्य प्राप्त होईल़ स्वराज्य म्हणजे स्व वर नियंत्रण आणि स्वत:चे राज्य ‘हिंद स्वराज्य’ मध्ये नव समाजाचे वर्णन बापूंनी केले़ यास पृथ्वीवर प्रत्यक्ष साकार करण्यासाठी रचनात्मक संस्था व गांधी सेवा संघाने कार्य करावे, असा विचार गांधीजींचा होता़
१९४५ मध्ये कारावासातून सुटका झाल्यानंतर अखिल भारत चरखा संघाचे काम सांभाळले़ गावोगावी चरख्याच्या माध्यमातून स्वावलंबन व रोजगार निर्मितीचे काम सुरू केले़ ग्रामोद्योग वाढविला़ गावातील घरोघरी ग्रामोद्योग विकसित झाल्याने अहिंसात्मक प्रवृत्ती वाढीस लागली, अशाप्रकारे घरापासून तर गाव, नंतर देश, स्वावलंबन व स्वाभिमानाकडे वाटचाल करू लागले़ अन्न, वस्त्र निवारा व शिक्षणाची व्यवस्था गावातच व्हावी, याची व्यवस्था संघाकडे सोपविली़ १९४८ मध्ये विशुद्ध आत्मा बापूंची हत्या झाली; पण त्यांचे विचार, कार्य, तत्व आणि रचनात्मक कार्य करणाऱ्या संस्था कार्यरत आहेत़
सेवाग्राम येथील गांधी सेवा संघाचे कार्य ग्रंथालयाच्या माध्यमातून सुरू असून ११ पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले़ बालकांपासून तर वृद्धापर्यंत नियमित अध्ययनासाठी येतात़ आचार्य अध्ययनासाठी मुली व मुले येत असून अनेकांनी याच ग्रंथालयातून आचार्य पदवी प्राप्त केली़ गांधी सेवा संघाचा इतिहास दिशा, प्रेरणा व स्फूर्ती देणारा असला तरी देशाच्या खऱ्या विकासाचे बिजारोपण यातून होऊ शकते़

Web Title: 'Gandhi Seva Sangh' was 9 1 year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.