गांधी जयंतीदिनी विविध आंदोलने

By Admin | Updated: October 3, 2015 01:50 IST2015-10-03T01:50:37+5:302015-10-03T01:50:37+5:30

येथील महात्मा साखर कारखाना पूर्ती उद्योग समूहाने विकत घेतला.

Gandhi Jayanti dini different agitations | गांधी जयंतीदिनी विविध आंदोलने

गांधी जयंतीदिनी विविध आंदोलने

कर्मचाऱ्यांचा आत्मक्लेष
वर्धा : येथील महात्मा साखर कारखाना पूर्ती उद्योग समूहाने विकत घेतला. हा व्यवहार झाला त्यावेळी कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन व भविष्य निर्वाह निधीची रक्कम देण्यासंदर्भात करार करण्यात आला होता. मात्र तसे झाले नसल्याने संतप्त कर्मचाऱ्यांच्या कृती समिती व किसान अधिकार अभियानच्यावतीने शुक्रवारी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ आत्मक्लेष आंदोलन केले
सकाळी १० वाजतापासून गांधी पुतळ्यापासून या आंदोलनाला प्रारंभ झाला. यावेळी भाऊरावजी काकडे, बाळासाहेब मिसाळ, गजेंद्र सुरकार, मंगेश शेंडे, सु०उाम पवार यांच्यासह अनेकांनी मार्गदर्शन केले. या आंदोलनात ३५० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी आपली उपस्थिती नोंदविली होती. येथे हा कारखाना नागपूर येथील पूर्ती उद्योग समूहाने विकत घेतला. सन २००९ मधील या व्यवहारात येथील कर्मचाऱ्यांचे थकलेले वेतन व भविष्य निर्वाह निधी देण्यासंदर्भात कंपनीकडून टोलवाटोलवीचे उत्तर मिळाले. यामुळे संतप्त झालेल्या कामगारांनी आज किसान अधिकार अभियानच्या मार्गदर्शनात महत्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ आंदोलन सुरू केले. यावेळी अभियानचे अविनाश काकडे यांच्यासह अभियानच्या सदस्यांसह कारखान्यातील कर्मचारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)


कृषी पंपाकरिता आंदोलन
वर्धा : जिल्ह्यामधील पाच हजार शेतकऱ्यांना वीज वितरण कंपनीने रितसर डिमांड भरूनही पाच वर्षांपासून वीज जोडणी दिली नाही. ती मिळावी म्हणून गांधी आश्रमात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन देत ३१ डिसेंबर पर्यंत वीज जोडण्या दिल्या नाही तर शेतकऱ्यांना सोबत घेवून महात्मा फुले समता परिषद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर फासी लटको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला.
शेतकऱ्यांना तत्काळ वीज जोडणी देण्यासाठी ३१ डिसेंबर २०१५ पर्यंत देण्याबाबत नियोजनपुर्वक त्वरित कार्यवाही करावी, अन्यथा १ जानेवारी २०१६ ला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांना सोबत घेवून, फासी लटको आंदोलन करू, असे निवेदन सेवाग्राम आश्रमात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना देण्यात आले. जून २०१५ अखेरपर्यंत वर्धा जिल्ह्यामध्ये हिंगणघाट विभागात १, ६६७, आर्वी विभागात, १,६९५ तर वर्धा विभागातत १,९९४ वीज जोडण्या अशा जोडण्या देणे बाकी आहे. या शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्यासाठी शासनाने ६५ कोटी रुपयांची तरतुदही केली आहे. तरी शेतकऱ्यांना वीज जोडणी दिली जात नाही, ही शोकांतिका आहे. ना. मुनगंटीवार यांना निवेदन देतांना परिषदेचे विभागीय संघटक प्रा. दिवाकर गमे, विनय डहाके, विजय मुळे, निळकंठ राऊत, निळकंठ पिसे, केशव तितरे, सुरेश सातोकर उपस्थित होते.(प्रतिनिधी)

Web Title: Gandhi Jayanti dini different agitations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.