जुगाऱ्यांसह गावकरीही जेरबंद
By Admin | Updated: August 30, 2014 02:00 IST2014-08-30T02:00:01+5:302014-08-30T02:00:01+5:30
जुगार रेड करण्याकरिता गेलेल्या ठाणेदारांना जुगार सापडला नाही म्हणून परत येत असताना गावातील झाडाखाली बसून ...

जुगाऱ्यांसह गावकरीही जेरबंद
समुद्रपूर : जुगार रेड करण्याकरिता गेलेल्या ठाणेदारांना जुगार सापडला नाही म्हणून परत येत असताना गावातील झाडाखाली बसून असलेल्या गावकऱ्यांना जुगार खेळत असल्याच्या कारणाने अटक केली. यातही त्या गावकऱ्यांना जामीण नाकरल्याने त्यांना गुन्हा नसताना आरोपीप्रमाणे पोलीस ठाण्यात रात्र काढवी लागल्याने पोलिसांवर रोष व्यक्त होत आहे.
तालुक्यातील बर्फा येथे मोठ्या प्रमाणात जुगार भरत असल्याची माहिती ठाणेदाराला मिळाल्याने ताफा घेवून बर्फाला येथे गेले. तिथे त्यांना जुगार न सापडल्याने परतीच्या प्रवासात बोडखा या गावातील चिंचेच्या झाडाखाली बसलेल्या लोकांना जुगार खेळत असल्याचा कारणावरून अटक केली. या झाडाखाली शेतातील काम करून घराकडे परत येत असताना उभ्या असलेल्या काही शेतकऱ्यांचाही समावेश आहे. अशांनाही जुगार अॅक्टनुसार अटक करण्यात आली. सदर गुन्हा जामिनपात्र असूनही जामीन नाकारला. १० रुपयांच्या कोर्ट फी स्टॅम्प लावून जमानतदाराने अर्ज दिला असता ठाणेदार जिट्टावर यांनी अर्ज नाकरला. यापूर्वी समुद्रपूर येथे रात्री १० वाजता बंद घरात एक लाखांचा जुगार पकडण्यात आला; मात्र त्या आरोपींना एक तासातच जामिनावर सोडण्यात आले. राळेगाव येथील जुगारातील आरोपींना दोन तासातच जामीन देण्यात आली. पोलिसांच्या या कारवाईने गावात विविध चर्चेला उधाण आले आहे.(तालुका प्रतिनिधी)