शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
2
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
3
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
4
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
5
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
6
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
7
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
8
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
9
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
10
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
12
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
13
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
14
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
15
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
16
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
17
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
18
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
19
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
20
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
Daily Top 2Weekly Top 5

आर्वी नाक्यावरील अतिक्रमणावर चालला गजराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 05:00 IST

कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी देशात १७ मे पर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. पण, वर्धा जिल्हा ग्रीनझोनमध्ये असल्याने लॉकडाऊनमध्ये शिथिलता देत काही दुकानांसह भाजीपाला विक्री सुरू करण्यात आली. पण, जिल्ह्यातील हिवरा तांडा येथे मृत महिलेचा कोरोना पॉझिटीव्ह रिपोर्ट आल्याने प्रशासन खडाडून जागे झाले आणि पुन्हा दोन दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला.

ठळक मुद्देफळविक्रेत्यांच्या हातगाड्या जप्त : सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा, नगरपालिका, पोलीस विभागाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनाचे संकट लक्षात घेता सार्वजनिक ठिकाणी गर्दी होवू नये, यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना राबविण्यात येत आहे. पण, आर्वी नाका परिसरात हातगाडीचालकांनी अतिक्रमण केल्याने रहदारीस अडथळा निर्माण झाल्याने आर्वीनाका ते कारला रस्त्यावरील तसेच आयटीआय कॉलेजमार्गावर करण्यात आलेले अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात काढण्यात आले.कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी देशात १७ मे पर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. पण, वर्धा जिल्हा ग्रीनझोनमध्ये असल्याने लॉकडाऊनमध्ये शिथिलता देत काही दुकानांसह भाजीपाला विक्री सुरू करण्यात आली. पण, जिल्ह्यातील हिवरा तांडा येथे मृत महिलेचा कोरोना पॉझिटीव्ह रिपोर्ट आल्याने प्रशासन खडाडून जागे झाले आणि पुन्हा दोन दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला. दोन दिवसांच्या लॉकडाऊनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी शिथिलता आणत पूर्वीप्रमाणे दुकाने दुपारी दोन वाजेपर्यंतच उघडण्यास मुभा दिली. पण, शहरातील आर्वीनाका परिसरात भरणाऱ्या भाजीबाजारामुळे आणि रस्त्याकडेला लागणाऱ्या फळविक्रेत्यांच्या हातगाड्यांमुळे गर्दी उसळली होती. यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा वाजले होते.सार्वजनिक ठिकाणी गर्दी होवू नये, यासाठी प्रशासनाने अनेकदा नागरिकांना गर्दी न करण्याच्या सूचनाही दिल्या.पण, फळविक्रेते आणि भाजीविक्रेत्यांनी प्रशासनाचे आदेश धुडकवून टाकले. होणाऱ्या गर्दीमुळे विषाणू संसर्गाचा धोका होण्याची शक्यता असल्याने अखेर बुधवारी नगरपालिकेच्या वतीने पोलीस बंदोबस्तात आर्वी मार्गावरील हातगाड्यांचे अतिक्रमण काढण्यात आले.तसेच हातगाड्या जप्त करीत विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. आयटीआय कॉलेजकडे जाणाऱ्या मार्गावरही अतिक्रमण मोहीम राबविण्यात आली. ही कारवाई नगर पालिकेचे कर्मचारी, पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांनी केली.पालिका कर्मचाऱ्यांची अरेरावीआर्वीनाका परिसरात अतिक्रमण काढत असताना रस्त्याने ये-जा करणाऱ्यांशी पालिकेचे कर्मचारी अरेरावी करीत होते. रस्त्याने एक शेतकरी जात असताना पालिकेच्या कर्मचाऱ्याने शेतकऱ्याशी हुज्जत घातली. दोघांमध्ये वादावादीही झाली. त्यामुळे जनतेच्या हितार्थ कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी जनतेलाच वेठीस धरू नये, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण