शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

सात महिन्यांत वाढले ९.२५ रुपयांनी पेट्रोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 23:51 IST

पेट्रोल व डिझेलच्या सतत होणाऱ्या दरवाढीमुळे वर्धेकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. गत सात महिन्यात वर्धेत ९.२५ रुपयांनी पेट्रोल तर १२.४८ रुपयांनी डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. या दरवाढीचा आॅटोचालकांसह जड वाहनचालक व दुचाकी चालकांना चांगलाच आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देवाहनचालक त्रस्त : दररोज बदलतात दर, डिझेलच्या दरात १२.४८ रुपयांनी वाढ

महेश सायखेडे ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पेट्रोल व डिझेलच्या सतत होणाऱ्या दरवाढीमुळे वर्धेकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. गत सात महिन्यात वर्धेत ९.२५ रुपयांनी पेट्रोल तर १२.४८ रुपयांनी डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. या दरवाढीचा आॅटोचालकांसह जड वाहनचालक व दुचाकी चालकांना चांगलाच आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत बऱ्यापैकी घसरन झाली असली तरी केंद्र व राज्य सरकारकडून या दोन्ही अतिज्वलनशील पदार्थांवर विविध कर लादून त्याची वसूली वाहनचालकांसह सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे. सध्या टर्बो व इथेलॉन मिस्क अशा दोन प्रकारच्या पेट्रोलची विक्री होत आहे. परंतु, पेट्रोल मध्ये १० टक्के मिळविण्यात येणाºया इथेलॉनचा खरा फायदा सरकारलाच व तेल कंपन्यांनाच होत असल्याचे दिसून येते. १ नोव्हेंबर २०१७ रोजी पेट्रोल प्रती लिटर ७६.५७ रुपये तर डिझेल ५९.८० रुपये होते. तर शुकवार २५ मे रोजी पेट्रोल ८५.८२ रुपये आणि डिझेल ७२.२८ रुपये प्रती लिटर होते. अवघ्या सात महिन्यात वर्धेत ९.२५ रुपयांनी पेट्रोल तर १२.४८ रुपयांनी डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. पेट्रोल व डिझेलच्या दिवसेंदिवस वाढत्या दरांमुळे इतर जिवनावश्यक वस्तूंवरही त्याचा विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे पेट्रोल व डिझेलच्या दिवसेंदिवस वाढत्या दरांवर अंकुश लावण्यासाठी सरकारने तात्काळ योग्य पाऊल उचलावे अशी मागणी आहे.दरवाढीचा लाभ सरकारलाचसध्या ८५.८२ रुपये प्रती लिटरने पेट्रोलची विक्री होत असून प्रती लिटर पेट्रोल विक्रीवर २.७६ पैसे विक्रेत्यांना मिळतात. या विक्री होणाºया पेट्रोलवर केंद्र सरकार २१.७५ रुपये आणि राज्य सरकारच्या २३.६२ रुपयांच्या कराचा समावेश आहे. राज्य सरकार फिक्स सेस म्हणून ९ रुपये व २५ टक्के इतर कर पेट्रोलच्या डिलर किंमतीवर आणि डिझेलच्या डिलर किंमतीवर फिक्स सेस १ रुपया तसेच २१ टक्के इतर कर लावत असल्याने याचा सर्वाधिक फायदा सरकारलाच होत असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येते.जिल्ह्यातील ५० टक्के पेट्रोलपंपावरील दर बदलतात आॅनलाईन पद्धतीनेसरकारने पेट्रोल व डिझेलचे दर निश्चित करण्याचा विषय आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी जोडला आहे. त्यामुळे प्रत्येक दिवशी पेट्रोल व डिझेलचे दर बदलतात. सदर बदलनारे दर जिल्ह्यातील ५० टक्के पेट्रोलपंपावर आॅनलाईन पद्धतीने बदलत असून उर्वरित ५० टक्के पेट्रोल पंपावरील दर मॅन्युअली पद्धतीने प्रत्येक दिवशी सकाळी ६ वाजता बदलविले जात असल्याचे शहरातील एका पेट्रोलपंप मालकाने सांगितले.इथेलॉनयुक्त पेट्रोलचा त्रास पंप मालकांनासध्या पेट्रोलमध्ये १० टक्के इथेलॉन मिक्स केल्या जाते. त्याचा संपर्क पाण्याशी आल्यास पेट्रोल व इथेलॉन वेगवेगळे होत ते तळाशी जाते. इथेलॉन चेक करण्यासाठी पेट्रोलपंप मालकांना तेल कंपन्या कुठल्याही सोयी-सूविधा पुरवित नाहीत. अनावधानाने पेट्रोल व इथेलॉन वेगवेगळे झाल्यास ते ग्राहकांच्या वाहनाच्या इंधन टँक मध्ये जावून नागरिकांची वाहन अचानक बंद पडल्यावरच पंप मालकांच्या लक्षात ते येते. इथेलॉन व पेट्रोल वेगवेगळे झाल्यावर पंप मालकांना नागरिकांच्या रोषाला पुढे जावे लागत असल्याने इथेलॉनयुक्त पेट्रोलचा सर्वाधिक त्रास पंप मालकांनाच सहन करावा लागत असल्याचे सांगण्यात आले.ऊस उत्पादकांना फायदाच नाहीऊसाच्या मळीपासून इथेलॉन हे इंथन सर्वाधिक केले जाते. सध्या पेट्रोलमध्ये १० टक्के इथेलॉनचा वापर होत आहे. इथेलॉनला पेट्रोलचा दर मिळत असला तरी त्याचा खरा फायदा ऊस उत्पादकांना होत नसल्याचे शेतकरी व शेतकऱ्यांचे प्रश्न रेटणारे सांगतात. सरकारकडूनही शेतकऱ्यांच्या ऊसाला योग्य भाव दिल्या जात नाही अशी ओरडही जिल्ह्यातील शेतकºयांकडून होत आहे.निवडणूक काळात १९ दिवस रोखली दरवाढकर्नाटक निवडणुकीच्या कालावधीत तब्बल १९ दिवस पेट्रोल व डिझेलची दरवाढ रोखण्यात आली होती. सध्या महाराष्ट्राच्या तुलनेत कर्नाटकात ६ रुपयांनी पेट्रोल तर २ रुपयांनी डिझेल स्वस्त असल्याचे जानकारांकडून सांगण्यात आले.जिल्ह्यात २.७१ लाखांवर वाहनेगत वर्षी १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०१८ या कालावधीत जिल्ह्यात २४ हजार ९०१ वाहनांची विक्री झाली. त्यात २१ हजार ७६१ दुचाकींचा तर १ हजार ७३० कारचा समावेश आहे. वर्धा जिल्ह्यात उपप्रादेशिक परिवहन कार्यालय वर्धा येथे नोंदणी केलेली २ लाख ७१ हजारांच्यावर छोटी-मोठी व जड वाहने असल्याचे अधिकाºयांकडून सांगण्यात आले.ब्राझीलमध्ये ३५ टक्केपर्यंत इथेलॉनचा वापरस्वदेशी इंथन म्हणून इथेलॉनची ओळख. देशातील पैसा देशातच रहावा या हेतूने पेट्रोलमध्ये इथेलॉन मिस्क केल्या जाते. वास्तविक पाहता देशात कुठेही इथेलॉन ब्लेंडिंग होत नाही. ते केवळ मिक्स केल्या जाते. ब्राझीलमध्ये योग्य पद्धतीने इथेलॉनचा सुमारे ३५ टक्केच्यावर वापर होत असल्याचे अभ्यासू पेट्रोलपंप मालक आसिफ जाईद यांनी सांगितले.पेट्रोल-डिझेलवर महाराष्ट्रात सर्वाधिक करदेशातील इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात पेट्रोल व डिझेलवर सर्वाधिक कर लावण्यात आले आहेत. त्यामुळे येथील वाहनचालकांना इतर राज्यापेक्षा जादाच पैसे पेट्रोल व डिझेलसाठी मोजावे लागत आहेत.ग्राहक सुविधा क्रमांकाद्वारे कळतो झटपट खरा दरजिल्ह्यातील प्रत्येक पेट्रोलपंपावर ग्राहकांना आजच्या दराबाबत सूविधा व्हावी या हेतूने एक विशिष्ट फलक लावण्यात आले आहेत. या फलकावर एक ग्राहक सुविधा क्रमांक देण्यात आला आहे. त्या क्रमांकावर एसएमएस केल्यास तात्काळ ग्राहकाला त्या दिवशीचा पेट्रोल व डिझेलचा खरा दर सहज माहिती होत असल्याचे पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्यांनी सांगितले.तेल कंपन्या होत आहेत गब्बरकेंद्र व राज्य सरकारच्या जनसामान्य विरोधी धोरणांमुळे दिवसेंदिवस होत असलेल्या पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीचा लाभ सरकारसह खऱ्या अर्थाने तेल कंपन्यांना होत असल्याचा आरोप जनसामान्यांकडून केला जात आहे. गत काही वर्षांपासून तोट्यात असल्याचे सांगणाऱ्या तेल कंपन्या सध्या फायद्यात आल्याचे बोलले जात आहे. तेल कंपन्या सध्या गब्बर होत असून सर्वसामान्यांना होणारा त्रास लक्षात घेता सरकारने त्वरित योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे.

टॅग्स :Petrolपेट्रोल