महिनाभरात मिळणार जिल्हा बँकेला निधी

By Admin | Updated: December 18, 2015 02:41 IST2015-12-18T02:41:39+5:302015-12-18T02:41:39+5:30

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला दैनंदिन आर्थिक व्यवहार सुरू करण्यासाठी व रिझर्व्ह बँकेचा परवाना प्राप्त करण्यासाठी आवश्यक ५०.३८ कोटी रुपयांची रक्कम अद्याप आली नाही.

Fund to the District Bank will be available throughout the month | महिनाभरात मिळणार जिल्हा बँकेला निधी

महिनाभरात मिळणार जिल्हा बँकेला निधी

बँकेचे दैनंदिन आर्थिक व्यवहार होणार सुरळीत
वर्धा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला दैनंदिन आर्थिक व्यवहार सुरू करण्यासाठी व रिझर्व्ह बँकेचा परवाना प्राप्त करण्यासाठी आवश्यक ५०.३८ कोटी रुपयांची रक्कम अद्याप आली नाही. नागपूर जिल्हा बँकेने २४.८४ कोटी रुपये १५ दिवसांपूर्वी प्राप्त केले; पण वर्धा बँकेचा निधी अडकला होता. नागपूर विधान झालेल्या चर्चेमध्ये हा प्रश्न निकाली निघाला असून एक महिन्यात तो बँकेला प्राप्त होणार आहे.
वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला मंजूर करण्यात आलेला ५०.३८ कोटी रुपयांचा निधी अद्याप मिळाला नाही. किसान अधिकार अभियानने जिल्हाधिकारी, आमदार, खासदार यांना निवेदने दिली. शिवाय जिल्हा उपनिबंधक कार्यालय सहकारी संस्था व अन्य संघटनांनीही हा मुद्दा लावून धरला. आ. पंकज भोयर, आ. समीर कुणावार, माजी आमदार दादाराव केचे व जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांच्या सहकार्याने राज्याचे सहकार सचिव जाधव व सहकार परिषद अध्यक्ष शेखर चरेगावकर यांच्याशी विधानभवन येथील सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कक्षात बैठक झाली. बैठकीत किसान अधिकार अभियानच्या शिष्टमंडळास चरेगावकर व जाधव यांनी वर्धा व बुलढाणा बँकेला दैनंदिन आर्थिक व्यवहारासाठी रिझर्व्ह बँकेचा परवाना मिळवून देण्यासाठी आवश्यक उर्वरित ५०.३८ कोटी रुपये देण्यावर शासन कायम आहे. एक महिन्यात रकमेची प्रक्रिया पूर्ण होईल. तांत्रिक व आर्थिक अडचणींमुळे वर्धा बँकेच्या रकमेला विलंब झाल्याचे सांगितले. यामुळे एक महिन्यात जिल्हा बँकेचे व्यवहार सुरळीत होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.(कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Fund to the District Bank will be available throughout the month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.