कृषी पंपाच्या वीजपुरवठ्यासाठी मोर्चा
By Admin | Updated: July 15, 2014 00:07 IST2014-07-15T00:07:19+5:302014-07-15T00:07:19+5:30
शेतकऱ्यांच्या कृषी पंपाला सुरळीत व नियमित वीज पुरवठा करण्यात यावा, या मागणीकरिता सोमवारी सकाळी मनसेच्यावतीने शेतकऱ्यांना घेऊन वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक दिली.

कृषी पंपाच्या वीजपुरवठ्यासाठी मोर्चा
सिंदी (रेल्वे) : शेतकऱ्यांच्या कृषी पंपाला सुरळीत व नियमित वीज पुरवठा करण्यात यावा, या मागणीकरिता सोमवारी सकाळी मनसेच्यावतीने शेतकऱ्यांना घेऊन वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक दिली. लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
मोर्चा धडकताच मनसेच्या शिष्टमंडळासह शेतकऱ्यांनी वर्धेचे कार्यकारी अभियंता एन.जी.वैरागडे, सहाय्यक अभियंता ए.व्ही.जयस्वाल, कनिष्ठ अभियंता सिंदी व्हि.के. गुबे यांना निवेदन सादर केले. शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची विद्युत भार सुरळीत करावा. सभोवतालच्या परिसरातील व सिंदी येथील होणारा अनियमित विद्युत पुरवठा बंद करून सुरळीत करावा, यासह अन्य मागण्यांचा समावेश होता.
यावेळी सिंदीचे पोलीस उपनिरीक्षक परमार, जमादार गजू काळे, गांजरे, निकम, चिमुरकर, निलेश सडमाके व इतर पोलिसांनी सदर परिस्थिती चोख बंदोबस्त ठेवून व्यवस्थितरित्या सांभाळली.
या मोर्चामध्ये मनसे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले, अमोल बोरकर, बाबाराव कलोडे, मंगल सोनटक्के, शुभम दांडेकर, सुनील भुते, प्रवीण श्रीवास्तव, वासुदेव वैरागडे, अनिल आडकिने, युगल औचट, मिलिंद बेलखोडे, लक्ष्मण डकरे, नरेश तडस, रवी बेलखोडे, सोनू झाडे यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते.(प्रतिनिधी)