राज्यातील ४८६ रेल्वेस्थानकावर मोफत वाय-फाय सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 14:25 IST2019-01-16T14:24:58+5:302019-01-16T14:25:32+5:30
देशातील ७१५ रेल्वे स्टेशनांवर वाय-फाय सुविधा सुरू करण्यात आली आहे. तसेच देशातील ५७३४ रेल्वे स्टेशनवर निशुल्क वाय-फाय सुविधा उपलब्ध करण्याकरिता प्रस्तावित आहे.

राज्यातील ४८६ रेल्वेस्थानकावर मोफत वाय-फाय सुविधा
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : देशातील ७१५ रेल्वे स्टेशनांवर वाय-फाय सुविधा सुरू करण्यात आली आहे. तसेच देशातील ५७३४ रेल्वे स्टेशनवर निशुल्क वाय-फाय सुविधा उपलब्ध करण्याकरिता प्रस्तावित आहे. या मध्ये महाराष्ट्रातील ४८६ रेल्वे स्टेशनचा समावेश आहे.
रेल्वेवर कोणताही आर्थिक भार येऊ न देता ही सुविधा उपलब्ध केली जात आहे. रेल-टेलने ए-वन आणि ए श्रेणीतील स्टेशनांवर वाय-फाय सुविधा पुरवण्यासाठी मेसर्स मेहता इन्फॉर्मेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीशी करार केला आहे. ही कंपनी मेसर्स गुगल इन्कापोर्रेटेड कंपनीची उपकंपनी आहे. याच कंपन्या वाय-फाय सुविधेवरील खर्चाचा भार उचलणार आहेत. आॅक्टोंबर २०१८ पर्यंत देशातील ७१५ रेल्वे स्टेशनवर १.३ मिलियन युनिक वापरकर्त्यांनी मोफत वाय-फाय सुविधेचा लाभ घेतलेला आहे. बी आणि सी श्रेणीतील ४३८ स्टेशनांवरील सुविधेसाठीही निधीची तरतूद व्हावी, अशी सूचना रेलटेलला करण्यात आलेली आहे. ग्रामीण भागातील २०० स्टेशनांवर या सुविधेसाठी आरसीआईएलच्यावतीने संचार मंत्रालयसोबत करार करण्यात आलेले आहे. तसेच या स्टेशन वर वाय-फाय सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता संचार दूरसंचार विभागाच्या युएसओएफ अंतर्गत २७.७७ कोटी निधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
आरक्षीत टिकीट काढणे, अनारक्षीत तिकीट काढणे, पी.एन.आर. ची माहिती, धावत्या गाडीची स्थिती जाणून घेणे या सर्व सुविधा आज रेल्वे विभागाने पारंपारीक पध्दतीसोबत आॅनलाईन स्वरुपात उपलब्ध करुन दिलेली आहे. या सर्व बाबीचा विचार करुन प्रवाश्यांना आपल्या मोबाईल फोन मधला डेटा खर्च न करता वाय-फाय सुविधा मोफत उपलब्ध करुन दिल्याने प्रवाश्यांचा फार मोठा लाभ झालेला आहे.
रामदास तडस, खासदार, वर्धा लोकसभा क्षेत्र