३७ शिक्षण सेवकांच्या वेतनाचा मार्ग मोकळा; तीन वर्षे वेतनाविना सेवा
By Admin | Updated: February 5, 2015 23:14 IST2015-02-05T23:14:22+5:302015-02-05T23:14:22+5:30
तीन वर्षांपूर्वी नियुक्त ६४ पैकी ३७ शिक्षण सेवकांना शिक्षणाधिकारी यांनी शिबिर घेत वैयक्तिक मान्यता प्रदान केली़ यामुळे त्यांच्या वेतनाचा मार्ग मोकळा झाला; पण अद्याप

३७ शिक्षण सेवकांच्या वेतनाचा मार्ग मोकळा; तीन वर्षे वेतनाविना सेवा
वर्धा : तीन वर्षांपूर्वी नियुक्त ६४ पैकी ३७ शिक्षण सेवकांना शिक्षणाधिकारी यांनी शिबिर घेत वैयक्तिक मान्यता प्रदान केली़ यामुळे त्यांच्या वेतनाचा मार्ग मोकळा झाला; पण अद्याप २७ शिक्षण सेवकांना मान्यता प्रदान करण्यात आलेली नाही़ या शिक्षण सेवकांनाही त्वरित वैयक्तिक मान्यता देण्याची मागणी समितीने केली आहे़
६४ शिक्षण सेवकांना वैयक्तिक मान्यता प्रदान करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद तक्रार निवारण समितीने आमरण उपोषण केले़ यानंतर शिक्षणाधिकारी (माध्य.) यांच्याद्वारे आयोजित वैयक्तिक मान्यता शिबिरात ३७ शिक्षण सेवकांना मान्यता देण्यात आली़ गत तीन वर्षांपासून हे सर्व शिक्षक विनावेतन विघादानाचे काम करीत होते़ त्यांना वेतन मिळावे व त्यासाठी वैयक्तिक मान्यता शिबिराचे आयोजन करावे, या मागणीसाठी तक्रार निवारण समितीने वेळोवेळी आंदोलने केली. शासनाचे आदेश असताना शिक्षणाधिकारी वैयक्तिक मान्यता शिबिराचे आयोजन करण्यास टाळाटाळ करीत होते. अखेर २ जानेवारी रोजी ६४ शिक्षण सेवकांनी आमरण उपोषण सुरू केले. उपोषणाला शिक्षक आ़ नागो गाणार यांनी भेट देत त्वरित मार्ग काढा अन्यथा उपोषण करण्याचा इशारा दिला़ यामुळे शिबिराचे आयोजन करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले़
२८ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत शिबिराचे आयोजन करण्यात आले. यात ६४ पैकी ३७ शिक्षण सेवकांना वैयक्तिक मान्यता दिल्याने त्यांच्या वेतनाचा मार्ग मोकळा झालेला आहे. उर्वरित २७ शिक्षण सेवकांच्या प्रस्तावातील त्रूटीमुळे त्यांना वैयक्तिम मान्यता देण्यात आली नाही. यामुळे उर्वरित शिक्षण सेवकांनाही वैयक्तिक मान्यता त्वरित प्रदान करावी, अशी मागणी तक्रार निवारण समितीने केली आहे़ अन्यथा आंदोलन करण्याचा इशाराही अजय भोयर, रमेश टपाले, टोपले व पदाधिकाऱ्यांनी दिला आहे़(कार्यालय प्रतिनिधी)