पाचवी ते दहावीच्या विद्यार्थिनींना मोफत पास
By Admin | Updated: August 9, 2014 23:52 IST2014-08-09T23:52:27+5:302014-08-09T23:52:27+5:30
महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थिनींच्या शैक्षणिक भवितव्याचा मुद्दा लक्षात घेऊन परिवहन महामंडळाच्या बसद्वारे मोफत प्रवास देण्याचा आदेश जाहीर केला आहे़

पाचवी ते दहावीच्या विद्यार्थिनींना मोफत पास
महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थिनींच्या शैक्षणिक भवितव्याचा मुद्दा लक्षात घेऊन परिवहन महामंडळाच्या बसद्वारे मोफत प्रवास देण्याचा आदेश जाहीर केला आहे़ याचा फायदा ग्रामीण विद्यार्थिनींना होणार आहे़
४शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना दिलासा मिळाला आहे़ पूर्वी आदेश मिळाला नाही, असे कारण पूढे करीत परिवहनचे कर्मचारी विद्यार्थिनींची अडवणूक करीत होते़ यामुळे मुली शिक्षणापासून वंचित राहत होत्या़
४परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांद्वारे ग्रामीण भागातील थांब्यावर बस न थांबविणे, या बसमध्ये पास चालत नाही, असे उर्मटपणे सांगून विद्यार्थिनींची गळचेपी करणे, आदी प्रकार घडतात़ हे प्रकार रोखणेही तेवढेच गरजेचे झाले आहे़
४जिल्हा परिषद शिक्षण विभागाने राज्य शालेय शिक्षण विभागाद्वारे नव्याने देण्यात आलेल्या आदेशाबाबत परिवहन महामंडळाला अवगत करणे, विद्यार्थिनींना मोफत प्रवास करू दिला जातो वा नाही, याची खातरजमा करणेही तितकेच गरजेचे झाले आहे़