जिल्ह्यात सहा हजारांवर अधिक गरिबांना मोफत आरोग्यसेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2019 06:00 AM2019-11-02T06:00:00+5:302019-11-02T06:00:23+5:30

खासदार तडस म्हणाले, दिवाळी सुटीनिमित्ताने वर्धा जिल्ह्यातील आयुष्यमान भारत योजनेच्या लाभार्थ्यांना भेट देत संवाद साधला. या योजनेबद्दल नागरिक समाधानी असून वर्धा लोकसभा क्षेत्रात अत्यंत चांगले कार्य झाल्याने समाधान आहे. पंतप्रधान मोदी यांनी आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाच्या कुटुंबाला सुरक्षा कवच दिले असून लाभार्थी आयुष्यमान भारत योजनेविषयी समाधान व्यक्त करताना दिसतात, असेही ते यावेळी म्हणाले.

Free health care for more than six thousand poor in the district | जिल्ह्यात सहा हजारांवर अधिक गरिबांना मोफत आरोग्यसेवा

जिल्ह्यात सहा हजारांवर अधिक गरिबांना मोफत आरोग्यसेवा

Next
ठळक मुद्देरामदास तडस : आयुष्यमान योजनेच्या लाभार्थ्यांसोबत संवाद कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : केंद्र सरकारची पंतप्रधान आयुष्यमान भारत-पंतप्रधान जनआरोग्य योजना ही जगातील सर्वांत मोठी आरोग्य विमा योजना आहे. या योजनेमुळे समाजातील गरिबांना नि:शुल्क आरोग्यसेवेचा आधार मिळणार आहे.
पंतप्रधान मोदी यांची महत्त्वाकांक्षी आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचा वर्धा लोकसभा क्षेत्रात २३ सप्टेंबर २०१८ पासून प्रारंभ झालेला आहे. वर्धा लोकसभा मतदार संघातील वर्धा, आर्वी, देवळी, हिंगणघाट, विधानसभा क्षेत्रात १ वर्षाच्या कालावधीमध्ये विविध आजाराकरिता समाजातील ६ हजार ५३८ पेक्षा अधिक गरिबांना नि:शुल्क आरोग्यसेवेचा आधार मिळालेला आहे, असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी आयुष्यमान भारत योजनेच्या संवाद कार्यक्रमात केले.
विकास भवनात दीपावली निमित्त आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांसोबत संवादावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी, विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी अभ्युदय मेघे, अमित गोमासे, हरीश तांदळे उपस्थित होते. आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत लाभ घेतलेल्या प्रत्येक कुंटुबातील सदस्यासोबत त्यांनी संवाद साधला. लाभार्थ्यांनी आयुष्यमान भारत योजनेचे अनुभव कथन केले.
खासदार तडस म्हणाले, दिवाळी सुटीनिमित्ताने वर्धा जिल्ह्यातील आयुष्यमान भारत योजनेच्या लाभार्थ्यांना भेट देत संवाद साधला. या योजनेबद्दल नागरिक समाधानी असून वर्धा लोकसभा क्षेत्रात अत्यंत चांगले कार्य झाल्याने समाधान आहे. पंतप्रधान मोदी यांनी आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाच्या कुटुंबाला सुरक्षा कवच दिले असून लाभार्थी आयुष्यमान भारत योजनेविषयी समाधान व्यक्त करताना दिसतात, असेही ते यावेळी म्हणाले.
प्रास्ताविकातून जिल्हा शल्य चिकित्सक पुरुषोत्तम मडावी यांनी वर्धा जिल्ह्यात एकूण लाभार्थी १ लाख २९ हजार असून ग्रामीण भागातील १ लाख २ हजार व शहरी भागात २६ हजार लाभार्थी आहेत. प्रतीकुटुंब 5 लाख रुपयापंर्यत ४९२ रुग्णालयात उपचार होणार आहेत.
वर्धा जिल्ह्यात पाच रुग्णालये यामध्ये सामान्य रुग्णालय, वर्धा, उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट, कस्तुरबा हॉस्पीटल सेवाग्राम, आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी (मेघे) राणे हॉस्पीटल आर्वी या रुग्णालयात रुग्णांना योजनेचा लाभ दिला जात आहे.
वर्धा जिल्हयात आतापर्यंत १ लाख २० हजार ई-कार्डचे वाटप झालेले आहे. आयुष्यमान भारत योजनेतून १३०० विविध आजारांवर सरकारी रुग्णालयात व ८४० आजारावर खासगी रुग्णालयात उपचार होत आहे. लाभार्थ्यांना योग्य माहिती मिळावी याकरिता मोफत टोल फ्री क्रमांक १४५५५ कॉल करता येणार असल्याची माहिती दिली. यावेळी विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी अभ्युदय मेघे यांनीही मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचालन जिल्हा समन्वयक डॉ. प्रफुल्ल मेश्राम यांनी केले. उपस्थितांचे आभार जिल्हा प्रमुख डॉ. रितेश गुजरकर यांनी मानले, कार्यक्रमाला डॉ. अमोल चाफले, डॉ. सुशील चैधरी तसेच सामान्य रुग्णालयाचे कर्मचारी व प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजनेचे लाभार्थी देवीदास मेघे, नारायण तलमले, राजू झामरे, रंजना झामरे, सुरेश फुले, शैलेंद्र मेंढे, अमोल भोंगाडे, नंदू उगले, सुखदेव राऊत, पंकज येरेकार, उत्तम पाटील, वैशाली कोवे, गणेश बोरा, अनिल नैताम, मंदा नागोसे, रमेश भेंडे, सुभाष अरबट, प्रशांत मुंजेवार, सुखदेव उगले व प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजनेचे लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Free health care for more than six thousand poor in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.