बॅग चोरणाऱ्या चार महिलांना अटक
By Admin | Updated: September 30, 2016 02:13 IST2016-09-30T02:13:46+5:302016-09-30T02:13:46+5:30
येथील बसस्थानकावर बसमध्ये चढत असताना महिलेची बॅग लंपास झाल्याची तक्रार महिलांनी पोलिसांकडे केली.

बॅग चोरणाऱ्या चार महिलांना अटक
बसस्थानकावरील पोलिसाकडून तत्काळ कारवाई
हिंगणघाट : येथील बसस्थानकावर बसमध्ये चढत असताना महिलेची बॅग लंपास झाल्याची तक्रार महिलांनी पोलिसांकडे केली. या तक्रारीवरून येथे कार्यरत पोलीस कर्मचाऱ्याने तत्काळ कारवाई करीत संशयित असलेल्या चार महिलांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडून चोरीतील बॅग जप्त करण्यात आली. ही घटना गुरुवारी घडली.
उषा तन्ना हातागडे (४५), लक्ष्मी रमेश हातागडे (२५), प्रिया प्रदिप हातागडे (२०) व एका अल्पवयीन मुलगी सर्व रा. रामेश्वरी, रिंगरोड राहाटेनगर, नागपूर अशी अटकेतील महिलांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलीस सुत्रानुसार, मंदा गजानन बोरकुटे (२४) रा. सावली (वाघ) या बस स्थानिकावर हिंगणघाट येथे गावात परत जाण्याकरिता आल्या होत्या. दरम्यान सावलीच्या बसमध्ये चढताना तीन वयस्क महिला व एक मुलगी यांनी मंदाच्या हँड बॅगमधून पैशाची पर्स चोरली. पर्समध्ये ५५० रुपये ठेवले होते. ही बाब लक्षात येताच महिलेने बस स्थानकावर येताच येथे कार्यरत पोलीस कर्मचारी दिलीप आंबटकर यांना दिली. त्यांनी महिलेची तक्रार नोंदवून घेत या महिलांचा शोध घेतला. दरम्यान या महिला बसस्थानकातून आपल्या प्रवासाकरिता रवाना झाल्या होत्या.
त्यांचा शोध घेत पोलिसांना या महिलांना माता मंदिर परिसरात अटक केली. त्यांच्याकडून चोरी गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर कारवार्ई पोलीस निरीक्षक शैलेश साळवी, आर.एम. जंजाळ, दिलीप आंबटकर व पोलीस कर्मचाऱ्यांनी केली.(तालुका प्रतिनिधी)