चार बहिण भावाने स्वत:लाच केले शेतात क्वांरटाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 05:00 IST2020-05-21T05:00:00+5:302020-05-21T05:00:12+5:30

प्रज्वल आणि भूमी या लॉकडाऊनच्या आधीच आर्वीवरून मामाकडे चंद्रपूरला गेले होते आणि मयूर आणि अंकिता हेही मामाकडे गावाला आले होते आता शासनाने जिल्ह्यात घरी गावात जाण्याची परवानगी दिल्याने तेथून तपासणी करून ऑनलाईन परवानगी घेऊन आर्वीला आले. येथे आल्यावर उपजिल्हा रुग्णालयात स्वत:ची तपासणी करून कुटुंबीयांना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी तालुक्यातील माटोडा बेनोडा येथील शिवारातील शेतात स्वत: क्वांरटाईन केले.

Four siblings bribed themselves in the field quarantine | चार बहिण भावाने स्वत:लाच केले शेतात क्वांरटाईन

चार बहिण भावाने स्वत:लाच केले शेतात क्वांरटाईन

ठळक मुद्देकोरोनाच्या संक्रमात जपले सामाजिक भान : चंद्रपूर जिल्ह्यातून दाखल झाले आर्वीत

लोकमत न्यूज नेटवर्क
देऊरवाडा/आर्वी : येथील नेताजी वार्डात चंद्रपूर जिल्ह्यातून आर्वीत परत आलेल्या चार बहिण भावांनी कुटुंबीयांना कोरोना विषाणूची लागण होऊ नये संसर्ग होऊ नये यासाठी स्वत:लाच सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या माटोडा बेनोडा येथील शेतात मंगळवारी ५ वाजता क्वांरटाईन करून घेतल्याची घटना येथे घडली.
प्रज्वल आणि भूमी या लॉकडाऊनच्या आधीच आर्वीवरून मामाकडे चंद्रपूरला गेले होते आणि मयूर आणि अंकिता हेही मामाकडे गावाला आले होते आता शासनाने जिल्ह्यात घरी गावात जाण्याची परवानगी दिल्याने तेथून तपासणी करून ऑनलाईन परवानगी घेऊन आर्वीला आले. येथे आल्यावर उपजिल्हा रुग्णालयात स्वत:ची तपासणी करून कुटुंबीयांना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी तालुक्यातील माटोडा बेनोडा येथील शिवारातील शेतात स्वत: क्वांरटाईन केले. दुसरीकडे चोरून गावात प्रवेश करणारे लोक सुध्दा आढळून येत आहे. तसेच क्वांरटाईन झालेले नागरिक सामाजिक जाणीव न ठेवता सर्रासपणे बाहेर फिरताना दिसून येतात. त्या पार्श्वभूमीवर या भावा बहिणींनी केलेली कृती इतरांसाठी प्रेरणा देणारी ठरली आहे. जिल्ह्यात आढळलेले बहुतांश रुग्ण याच तालुक्यातील आहेत.

Web Title: Four siblings bribed themselves in the field quarantine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.