शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

चार महिन्यांत २.२६ लाख गरजूंना मिळाला शिवभोजनचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 05:00 IST

शासनाच्या शिवभोजन योजनेचा प्रारंभ राज्यात २६ जानेवारी २०२० पासून सुरू झाला. गरीब व गरजू लोकांना स्वस्तात भोजन मिळावे याकरिता शासनाने वर्धा जिल्ह्याकरिता  २३ ऑगस्ट २०२१ पर्यंत वर्धा शहर व जिल्ह्यांतर्गत आठ तालुके मिळून १७ केंद्रे सुरू करण्यात आली. या सर्व  केंद्राला शासनाने प्रतिदिन १ हजार ६०० थाळ्यांचा इष्टांग मंजूर केला होता. पण कोरोना काळात कुणीही गरीब व गरजू व्यक्ती उपाशी राहू नये, म्हणून शासनाने  १५ एप्रिल २०२१ पासून नि:शुल्क शिवभोजन थाळी उपलब्ध करून दिली.  

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोना काळात सर्वत्र लॉकडाऊन असताना कुणीही गरीब उपाशी राहू नये यासाठी शासनाने १५ एप्रिलपासून नि:शुल्क शिवभोजन थाळी उपलब्ध करून दिली. तसेच जिल्ह्यात शिवभोजन थाळीचा इष्टांक दीड पट वाढवून तो २,१०० पर्यंत दिला. एप्रिल ते ऑगस्ट या चार महिन्यात २ लाख २६  हजार ६०० गरिबांना निःशुल्क शिवभोजन थाळीचा आधार मिळाला आहे. शासनाच्या शिवभोजन योजनेचा प्रारंभ राज्यात २६ जानेवारी २०२० पासून सुरू झाला. गरीब व गरजू लोकांना स्वस्तात भोजन मिळावे याकरिता शासनाने वर्धा जिल्ह्याकरिता  २३ ऑगस्ट २०२१ पर्यंत वर्धा शहर व जिल्ह्यांतर्गत आठ तालुके मिळून १७ केंद्रे सुरू करण्यात आली. या सर्व  केंद्राला शासनाने प्रतिदिन १ हजार ६०० थाळ्यांचा इष्टांग मंजूर केला होता. पण कोरोना काळात कुणीही गरीब व गरजू व्यक्ती उपाशी राहू नये, म्हणून शासनाने  १५ एप्रिल २०२१ पासून नि:शुल्क शिवभोजन थाळी उपलब्ध करून दिली.  तसेच प्रतिदिन थाळीच्या इष्टांकात  दीड पट वाढ केली.  वर्धा जिल्ह्यात सरासरी १ हजार ८०० ते २ हजार १०० थाळ्यांचा लाभ गरीब व गरजू तसेच अनाथ लोक दररोज या सर्व केंद्रावरून घेत आहे. एकूणच शासनाची ही योजना गरजुंना आधार देणारी ठरत आहे.

१७ केंद्रांना वितरित केले अनुदान- या योनजेंतर्गत वर्धा जिल्ह्यात एकूण १७ केंद्रावर या थाळीचा लाभ गरीब व गरजू लोक घेत आहे. १५ एप्रिल ते २३ ऑगस्ट २०२१ पर्यंत संपूर्ण महाराष्ट्र राज्यात २ कोटी ४३ लाख २३० लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. तर वर्धा जिल्ह्यातील १७ केंद्रावरून २ लाख २६ हजार ६१३ गरीब व गरजू लोकांनी या थाळीचा लाभ घेतलेला आहे. विशेष म्हणजे  १७ शिवभोजन केंद्राला शासनाच्या नियमाप्रमाणे  १४ ऑगस्ट २०२१ पर्यंतचे संपूर्ण अनुदान वितरित करण्यात आले आहे. 

 

टॅग्स :shiv bhojnalayaशिवभोजनालय