चार अपघातात तिघे ठार, १० जखमी

By Admin | Updated: November 23, 2015 01:47 IST2015-11-23T01:47:04+5:302015-11-23T01:47:04+5:30

जिल्ह्यात शनिवारी रात्री सुरू झालेली अपघाताची मालिका रविवारीही सुरूच असल्याचे दिसून आले. या दोन दिवसात सेलू, समुद्रपूर आणि वरूड येथे चार अपघात झाले.

Four killed, 10 injured in road accidents | चार अपघातात तिघे ठार, १० जखमी

चार अपघातात तिघे ठार, १० जखमी

जिल्ह्यात अपघातांची मालिका : सेलू, समुद्रपूर आणि वरूड येथील घटना
वर्धा : जिल्ह्यात शनिवारी रात्री सुरू झालेली अपघाताची मालिका रविवारीही सुरूच असल्याचे दिसून आले. या दोन दिवसात सेलू, समुद्रपूर आणि वरूड येथे चार अपघात झाले. यात तिघांचा मृत्यू झाला तर १० जण जखमी झाले. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे. समुद्रपूर तालुक्यातील जाम चौकात उभ्या असलेल्या ट्रकवर दुचाकी आदळल्याने रामू हरिभाऊ चुलबुले (३०) रा. शिरूड ता. हिंगणघाट ठार झाला तर उभ्या ट्रकला मागाहून जीपने धडक दिल्याने अनिता रमेश बक्सरे (५२) नामक महिलेचा मृत्यू झाला. यात वाहनातील सात जण जखमी झाले. वरूड येथे भरधाच जीपने दुचाकीला दिलेल्या धडकेत रमेश कुकडे (३८) रा. वरुड यांचा मृत्यू झाला. सेलू येथे दुचाकी स्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात कंटेनर उलटला. यात दुचाकीचालकासह कंटेनर चालक गंभीर जखमी झाला आहे.

जीप दुचाकी अपघातात एक ठार

पवनार - पवनार-वरूड रस्त्यावर भरधाव जीपने दुचाकीला दिलेल्या धडकेत एक जण जागीच ठार झाला. ही घटना रविवारी दुपारी घडली. रमेश कुकडे (३८) रा. वरूड असे मृतकाचे नाव आहे.
एम.एच.३२ क्यू ५३८५ क्रमांकाच्या मालवाहू जीपने एम.एच३२ झेड २५५९ या दुचाकीला धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की दुचाकीस्वार रमेश कुकडे (३८) हा जागीच ठार झाला. दुचाकीसह मालवाहू जीप रस्त्यालगत असलेल्या नालीत उलटली.
पोलीस सुत्रानुसार, सदर मालवाहू जीप महिलाश्रमकडून सिमेंटचे पोते भरून मोहीकडे जात होती. रमेश कुकडे हा त्याच्या दुचाकीने पवनार वरून वरूडकडे जात होता. दरम्यान रमेश कुकडे हा जीपवर आदळला. यात रमेशचा जागीच मृत्यू झाला. सेवाग्राम पोलीस ठाण्याचे दिलीप किटे व मंगेश वाघाडे यांनी लगेच घटनास्थळी जावून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. घटनेचा तपास सुरू आहे.(वार्ताहर)

सेलू- नागपूर-वर्धा मार्गावर कोटंबा- केळझर दरम्यान दप्तरी पेट्रोलपंपाजवळ लोखंडी मोठे दोन लोखंडी बंडल घेवून जाणारा कंटेनर आणि मोटारसायकल यात अपघात झाला. यात कंटेनर उलटला व त्यातील दोनही लोखंडी बंडल घटनास्थळीच पडले. ते जर दूर फेकल्या गेले असते तर मोठी हानी झाली असती. ही घटना रविवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास घडली. यात दुचाकीचालक अनिल धुर्वे रा. भोसा आणि कंटेनरचा चालक गंभीर जखमी झाला. त्यांच्यावर सेवाग्राम रुग्णालयात उपचार सुरू आहे.
दुचाकी क्र. एमएच ३२ डब्ल्यु ९४७५ ने अनिल धुर्वे हा नागपूरकडे जात होता. दरम्यान कंटेनर क्र. एमएच ०६ एक्यु ७८५० हा नागपूर येथून वर्धेकडे येत होता. दुचाकी चालकाला वाचविण्याच्या प्रयत्न हा अपघात घडल्याची चर्चा परिसरात होती.

Web Title: Four killed, 10 injured in road accidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.