चार ग्रा.पंं. भाजपा तर तीन काँग्रेसच्या ताब्यात
By Admin | Updated: April 19, 2016 05:54 IST2016-04-19T05:54:55+5:302016-04-19T05:54:55+5:30
तालुक्यातील सात ग्रामपंचायतीची निवडणूक होऊ घातली होती. यात मिर्झापूर ग्रामपंचायत अविरोध झाल्याने उर्वरीत सहा

चार ग्रा.पंं. भाजपा तर तीन काँग्रेसच्या ताब्यात
आर्वी : तालुक्यातील सात ग्रामपंचायतीची निवडणूक होऊ घातली होती. यात मिर्झापूर ग्रामपंचायत अविरोध झाल्याने उर्वरीत सहा ग्रामपंचायतीकरिता रविवारी मतदान झाले. त्याची मतमोजणी सोमवारी झाली असून यातील मिर्झापूर, पिपरी पुनर्वसन, मांडला, सर्कसपूर या चार ग्रा.पं.वर भाजपाने तर हैबतपूर, अहिरवाडा, जाम पुनर्वसन येथे काँग्रेसने बहुमत प्राप्त केले आहे.
मिर्झापूर ग्रामस्थांनी निवडणूक न घेण्याचा निर्णय घेऊन संगीता कोल्हे, बाळासाहेब सोनटक्के, अर्चना जाधव, प्रमिला भांगे, नंदू निघोट, सविता कठाणे, पद्मा मुंद्रे, सुरेश काळपांडे यांना अविरोध घोषित केले. सर्कसपूर येथे दिगंबर सोलव, प्राची निखाडे, राणी गोरले, निखिल कडू, वंदना सहारे, पुंडलिक सरोदे, समदुरा राऊत यांची अविरोध निवड झाली.
अहिरवाडा येथे पंजाब नत्थूजी कोकोटे, सुषमा रोशन मंगाम, छाया गणेश गायकवाड, प्रदीप हरिश्चंद्र फाले, अरुणा त्र्यंबक कसर, संजय दादाराव इथापे, मनीषा अशोक कोल्हे निवडूण आले. पिपरी पुनर्वसन शैलेश मारोतराव तलवारे, उर्मिला विनोद डोळे, शेख नासीर शेख अमिर, करूणा मात्रे, कविता राजेंद्र शिरगरे, प्रशांत गणेश सलाम, शेवंता अशोक धुर्वे निवडून आल्या.
जाम पुनर्वसन येथे नंदा ठाकरे, मनीष माहुरे, शंकर चव्हाण, नरेश बडगे, शालिनी दहिवाडे, संगीता बाळसकर, राजेंद्र ठाकरे निवडून आले. मांडला येथे बबन परतेकी, उमेश परतेकी, रेखा कंगाली, संध्या लांडगे, बबीता धुर्वे, रवी कळसकर, अर्चना इंगळे निवडून आले.
हैबतपूर येथे राहुल राऊत, सीमा पाटील, अनसूया निखाडे, स्वप्नील कयलके, शालिनी चातरकर, अनिल गडलिंग, पद्मा भांगे यांची निवड झाली.
भाजपाचे विधानसभा प्रमुख विजय बाजपेयी यांच्या कार्यालयासमोर माजी आमदार दादाराव केचे यांच्या उपस्थितीत विजयी उमेदवारांनी जल्लोष साजरा केला. तर काँग्रेसच्यावतीने आ. अमर काळे यांच्या निवास्थानीही विजयी उमेदवारांनी जल्लोष साजरा केला. या गावात आता सरपंचपद कुणाला मिळेल याकडे साऱ्याचे लक्ष लागले आहे.(शहर प्रतिनिधी)
आंजीत संचेरिया गटाचे वर्चस्व कायम
आंजी (मोठी) : स्थानिक वॉर्ड क्र. १ मधील ग्रामपंचायत सदस्याने दिलेल्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेकरिता रविवारी पोटनिवडणूक झाली. यात सरपंच जगदीश संचेरिया यांच्या जनशक्ती पॅनलचे अशोक बोरसरे विजयी झाले.
या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत जगदीश संचेरिया यांच्या गटाने १५ पैकी १२ जागा जिंकून बहुमत प्राप्त केले होते. काही दिवसापूर्वी एका ग्रा.पं. सदस्याचे सरपंचाशी मतभेद झाल्याने राजीनामा दिला होता. या जागेकरिता संचेरिया गटाचे अशोक बोरसरे व भाजपाचेच दीपक बावणकर यांनी नामांकन दाखल केले होते. दोन्ही गटाकरिता प्रतिष्ठेच्या असलेल्या या निवडणुकीत सरपंच गटाचा विजय झाला.
अशोक बोरसरे यांना ५५० तर दीपक बावणकर यांना ३०२ मते मिळाली. सोबतच नकारार्थी १३ मते पडली. संचेरिया गटाचे अशोक बोरसरे हे २४८ मतांनी निवडून आले. या निवडणुकीसाठी संचेरिया गटाचे उपसरपंच नितीन भावरकर, अल्का कोठे, नारायण बाकडे, किरण बोरकर, कुकडे, नौशाद शेख आदींनी प्रयत्न केले.
पवनूर येथे सत्ताधारी गटाला हादरा
आंजी (मोठी) : नजीकच्या पवनूर येथे सत्ताधारी गटाचे केशव कडू यांच्या निधनाने रिक्त जागेकरिता झालेल्या पोटनिवडणुकीकरिता रविवारी मतदान झाले. यात सत्ताधारी गटाला हादरा देत लक्ष्मण कोंडलकर विजयी झाले.
येथे सत्ता गटातर्फे सुभाष कडू यांनी नमांकन दाखल केले होते. यात लक्ष्मण कोंडलकर यांनी १९० मत घेत ३१ मतांनी सुभाष कडू यांना पराभूत केले. लक्ष्मण कोंडलकर महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अभियान सुरू झाले तेव्हापासून अध्यक्ष आहेत. तसेच ते आंजी विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे सदस्य आहे. (वार्ताहर)