चार कोरोनाबाधित; एका रुग्णाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 05:00 IST2020-07-22T05:00:00+5:302020-07-22T05:00:18+5:30
वर्धा शहरातील गोलबाजार परिसरातील टिळक चौकामध्ये रहिवासी असलेली ५४ वर्षीय महिला मधुमेह, उच्च रक्तदाब यासह इतर आजारावरील उपचाराकरिता सेवाग्राम रुग्णालयात दाखल होती. त्या महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर निकट संपर्कातील व्यक्तींचेही स्वॅब घेण्यात आले असता त्यांची २८ वर्षीय सूनही कोरोनाबाधित आढळून आली.

चार कोरोनाबाधित; एका रुग्णाचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा/कारंजा (घा.) : दिवसागणिक जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. मंगळवारी चार रुग्ण आढळले असून यामध्ये कारंजा तालुक्यातील काकडा या गावातील दोन तर वर्धा शहरातील दोन रुग्णांचा समावेश आहेत. यातील वर्ध्यातील एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.
वर्धा शहरातील गोलबाजार परिसरातील टिळक चौकामध्ये रहिवासी असलेली ५४ वर्षीय महिला मधुमेह, उच्च रक्तदाब यासह इतर आजारावरील उपचाराकरिता सेवाग्राम रुग्णालयात दाखल होती. त्या महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर निकट संपर्कातील व्यक्तींचेही स्वॅब घेण्यात आले असता त्यांची २८ वर्षीय सूनही कोरोनाबाधित आढळून आली.
तर काकडा येथील सहा रुग्णांची तपासणी केली असता त्यापैकी ७० आणि ७४ वर्षीय दोन पुरुषांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे १५०० लोकसंख्येच्या गावात आतापर्यंत १२ रुग्ण आढळल्याने गाव हॉटस्पॉट ठरत आहे.
मृताच्या परिवाराच्या पाच प्रतिष्ठानांना टाळे
गोलबाजार परिसरात आढळलेल्या एकाच परिवारातील दोन रुग्णांपैकी एकाचा मृत्यू झाल्याने येथील परिसर सील करण्यात आला. सोबतच या परिवाराची शहरात ठिकठिकाणी असलेली पाच प्रतिष्ठानेही सील करण्यात आली आहे. या रुग्णांच्या हायरिक्समधील १९ तर लोरिक्समधील ५० पेक्षा अधिक रुग्णांना सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांचे स्वॅब घेतले जाणार आहे. सोबतच संपर्कातील इतरही व्यक्तींचा शोध सुरु केला आहे.
शहरातील नागरिकांनी बाहेर जिल्ह्यात जात असल्यास त्यासंदर्भात आरोग्य, महसूल किंवा पालिका प्रशासनाला माहिती द्यावी, अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाईल. तसेच घरोघरी सर्वेक्षणाकरिता येणाऱ्या कर्मचाऱ्यांना अचूक माहिती देवून सहकार्य करावे.
सुरेश बगळे, उपविभागीय अधिकारी, वर्धा.