वायगाव येथे आढळला ऊदमांजर

By Admin | Updated: October 26, 2015 02:05 IST2015-10-26T02:05:45+5:302015-10-26T02:05:45+5:30

येथील दूध गंगा वॉर्डातील सुधीर मस्कर यांच्या घराच्या भितींच्या फटीत ऊदमांजर हा दुर्मिळ प्राणी फसलेल्या स्थितीत आढळूून आला.

Founded in Wayagaon, | वायगाव येथे आढळला ऊदमांजर

वायगाव येथे आढळला ऊदमांजर

गावात भीती : वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतले ताब्यात
वायगाव (निपाणी) : येथील दूध गंगा वॉर्डातील सुधीर मस्कर यांच्या घराच्या भितींच्या फटीत ऊदमांजर हा दुर्मिळ प्राणी फसलेल्या स्थितीत आढळूून आला. त्याला वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी काढून ताब्यात घेतले. या प्राण्याला पाहून परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा प्रकार रविवारी सकाळी घडला.
मस्कर यांच्या घराच्या भिंतीच्या फटीत मांजरासारखा दिसणारा प्राणी फसल्याचे नागरिकांना दिसून आले. त्यांनी याची माहिती मस्कर यांना दिली. या प्राण्याची जवळून पाहणी केली असता हा प्राणी मसन्याऊद(ऊदमांजर) असल्याचे गावातील काही नागरिकांनी सांगितले. तो लहान मुलांवर हल्ला करीत त्यांना जीवे मारत असल्याचे काही ज्येष्ठ नागरिकांनी सांगितल्याने गावात भीती पसरली.
नागरिकांची याची माहिती दूरध्वनीवरून वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळ गाठले. यावेळी दीपक तिजारे, मुळे, कांबळे, कस्तुभ गावंडे, एल.पी. पवार यांनी घटनास्थळ गाठत या मांजरीला ताब्यात घेतले. गावातील राहुल हिंगे, किशोर तराळे, नितीन वाघ, प्रफुल उगेमुगे आदींची उपस्थिती होती. या प्राण्यालापकडून पोत्यात बंद करून जंगलात सोडण्यात येणार असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.(वार्ताहर)

Web Title: Founded in Wayagaon,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.