शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवारांच्या उपस्थितीत माजी आमदार अखेर राष्ट्रवादीत; 'तुतारी'वर लढणार लोकसभा

By रवींद्र चांदेकर | Updated: March 29, 2024 21:15 IST

निवडणूक अधिसूचना निघण्यापूर्वीच भाजपने उमेदवाराची घोषणा केली होती. त्यानंतर ‘वंचित’नेही उमेदवाराची घोषणा केली

वर्धा : लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली असताना येथील जागेचा महाविकास आघाडीच्या उमेदवारीचा तिढा सुटला नव्हता. अखेर शुक्रवारी सायंकाळी काँग्रेसचे आर्वीचे माजी आमदार अमर काळे यांनी मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश घेतला. त्यामुळे आता ते ‘तुतारी’वर लढणार असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

निवडणूक अधिसूचना निघण्यापूर्वीच भाजपने उमेदवाराची घोषणा केली होती. त्यानंतर ‘वंचित’नेही उमेदवाराची घोषणा केली. मात्र, महाविकास आघाडीने उमेदवाराची घोषणा केली नव्हती. वर्ध्याची जागा महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाट्याला आली आहे. मात्र, उमेदवार ठरविताना पक्षाच्या नाकीनऊ आले होते. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे आर्वीचे माजी आमदार अमर काळे यांना ‘तुतारी’वर लढणार असल्याची चर्चा होती. मात्र, त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश घेतला नव्हता. त्यामुळे काळे यांच्या उमेदवारीविषयी संभ्रम निर्माण झाला होता. अखेरीस शुक्रवारी सायंकाळी त्यांनी मुंबई येथे राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी राष्ट्रवादीत अधिकृत प्रवेश घेतला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत अमर काळे यांना पक्षात प्रवेश दिला. यावेळी वर्धा जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रा. सुरेश देशमुख, माजी आमदार प्रा. राजू तिमांडे, वर्धा जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदीले, हिंगणघाट बाजार समितीचे सभापती सुधीर कोठारी, कामगार नेते आफताब खान आदी उपस्थित होते. अमर काळे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशामुळे येथील जागेचा तिढा जवळपास संपुष्टात आल्याचे सांगितले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने शनिवारी मुंबईत काळे यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र, अद्याप अमर काळे यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला नसल्याची माहिती आहे.

मुंबई येथे शुक्रवारी मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश घेतला आहे. राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंती पाटील यांनी मला पक्षात प्रवेश देत स्वागत केले. यावेळी वर्धा जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते. उद्या, शनिवारी पत्रकार परिषदेत लोकसभेच्या उमेदवारांची घोषणा होणार आहे. त्यात वर्धा लोकसभा मतदार संघातून माझ्या नावाचाही समावेश असेल.अमर काळे.

टॅग्स :wardha-acवर्धाSharad Pawarशरद पवारlok sabhaलोकसभाNCPराष्ट्रवादी काँग्रेसlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४