पीक कर्जाकरिता नाहरकत प्रमाणपत्रासाठी पायपीट

By Admin | Updated: May 25, 2014 23:45 IST2014-05-25T23:45:58+5:302014-05-25T23:45:58+5:30

तालुक्यातील शेतकर्‍यांची आतापर्यंत जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नाहरकत प्रमाणपत्रासाठी ससेहोलपट सुरू होती. यात आता सहकारी सोसायटीचे गटसचिव शेतकर्‍यांना त्यांच्या ठिकाणी मिळत नसल्याने सहकारी

Footpath for Naharkar certificate for crop loan | पीक कर्जाकरिता नाहरकत प्रमाणपत्रासाठी पायपीट

पीक कर्जाकरिता नाहरकत प्रमाणपत्रासाठी पायपीट

शेतकरी हवालदिल : तळपत्या उन्हात सहकारी संस्थेच्या गटसचिवाचा शोध

्रप्रफुल्ल लुंगे - सेलू

तालुक्यातील शेतकर्‍यांची आतापर्यंत जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नाहरकत प्रमाणपत्रासाठी ससेहोलपट सुरू होती. यात आता सहकारी सोसायटीचे गटसचिव शेतकर्‍यांना त्यांच्या ठिकाणी मिळत नसल्याने सहकारी संस्थेच्या नाहरकत प्रमाणपत्राकरिता ते भटकत आहेत. शेतकर्‍यांकडे हे नाहरकत प्रमाणपत्र नसल्याने त्यांना राष्ट्रीयकृत बँकेतील पीक कर्जाचे प्रकरण दाखल होण्यास अडचणी येत आहेत. अंगाची काहीली होणार्‍या तळपत्या सूर्याची आग अंगावर झेलत शेतकरी सहकारी सोसायटीच्या गटसचिवाच्या शोधात भटकत आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अवसायनात निघाली. त्यामुळे सहकारी संस्थेकडून मिळणारे पीक कर्ज शेतकर्‍यांना मिळणे बंद झाले. कर्जाकरिता राष्ट्रीयकृत बँकेकडे शेतकरी चकरा मारीत आहेत. राष्ट्रीयकृत बँका इतर बँकासह सहकारी संस्था व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नाहरकत (कर्ज नसल्याचा दाखला) प्रमाणपत्र मागत आहेत.

प्रारंभी सहकारी संस्थेचे कर्ज असल्याचे प्रमाणपत्र, कर्जभरण्याची पावती सातबारावरून कर्ज नोंद कमी करण्याचा दाखला जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेला दाखवूनही तेथील अधिकारी बँकेचे नाहरकत प्रमाणपत्र देत नव्हते. सहकारी सोसायटीत तुम्ही कर्ज भरलेली असेल; मात्र जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सोसायटीने ते भरले नसल्याचे कारण पुढे करून बँका तसे प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करीत असल्याने शेतकर्‍यांना भयंकर मनस्ताप झाला.

आता पुन्हा नवीन संकटात शेतकरी अडकला आहे. सहकारी संस्थाचे गटसचिव सहकारी बँक डुबल्याने पगाराअभावी अडचणीत आले. त्यांच्या पोटातच काही नसल्याने त्यांचे काम करण्यात लक्ष लागत नाही. यामुळे ते आपल्या कर्तव्यावर हजर न होता इतरत्र राहत आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांना ते वेळेवर उपलब्ध होत नाही. सहकारी सोसायटीचे कर्जमुक्त असणारे शेतकरी सोसायटीच्या नाहरकत प्रमाणपत्रासाठी चकरा मारतात. गटसचिव सापडता सापडत नसल्याने भर उन्हाळ्यात शेतकर्‍यांची पायपीट सुरू आहे. शेतीचा हंगाम तोंडावर आला आहे. यामुळे शेतकर्‍यांना पैशाची नितांत गरज आहे.

Web Title: Footpath for Naharkar certificate for crop loan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.