बहिणीच्या पाठोपाठ दोन भावांचा कोरोनाने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 05:00 IST2021-04-25T05:00:00+5:302021-04-25T05:00:07+5:30
अंतरगाव येथील गजानन हळदे यांची विवाहित मुलगी सरला ज्ञानेश्वर शेट्टे (४६) रा. हिंगणा, जि. नागपूर हिला सासरी असताना कोरोनाचा संसर्ग झाला. यात तिचा मृत्यू झाला. बहिणीच्या अंत्यसंस्कारासाठी सेलू तालुक्यातील अंतरगाव येथून तिचे दोन भाऊ राजेंद्र हळदे (४४) व संजय हळदे (४२) नागपूर जिल्ह्यात गेलेत. अंत्यसंस्कार विधी पूर्ण झाल्यावर हे दोघेही आपल्या गावी परतले.

बहिणीच्या पाठोपाठ दोन भावांचा कोरोनाने मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू : मोठ्या बहिणीला कोरोनाचा संसर्ग झाला. तिच्यावर उपचार सुरू असताना तिची प्राणज्योत मालवली. बहिणीच्या अंत्यसंस्कारावरून परतल्यानंतर दोन भावांना कोरोनाचा संसर्ग झाला. या दोघा विवाहित भावांवर सावंगी (मेघे) येथील कोविड रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. ही मनाला चटका देणारी घटना सेलू तालुक्यातील अंतरगाव येथे घडली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
अंतरगाव येथील गजानन हळदे यांची विवाहित मुलगी सरला ज्ञानेश्वर शेट्टे (४६) रा. हिंगणा, जि. नागपूर हिला सासरी असताना कोरोनाचा संसर्ग झाला. यात तिचा मृत्यू झाला. बहिणीच्या अंत्यसंस्कारासाठी सेलू तालुक्यातील अंतरगाव येथून तिचे दोन भाऊ राजेंद्र हळदे (४४) व संजय हळदे (४२) नागपूर जिल्ह्यात गेलेत. अंत्यसंस्कार विधी पूर्ण झाल्यावर हे दोघेही आपल्या गावी परतले. अशातच त्यांची प्रकृती बिघडल्याने कोविड चाचणी करण्यात आली. यात या दोघांचा अहवाल कोविड पॉझिटिव्ह आला. प्रकृती गंभीर असल्याने दोन्ही भावांना सावंगी येथील कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना राजेंद्रचा २० एप्रिलला तर संजयचा २३ एप्रिलला मृत्यू झाला. राजेंद्र एका शाळेत लिपिक म्हणून कार्यरत होता तर संजय खासगी कंपनीत नोकरी करायचा.