गांधी जयंती साजरी करताना दिलेला शब्दही पाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2020 05:00 IST2020-10-02T05:00:00+5:302020-10-02T05:00:08+5:30

बांधकाम विभाग सचिव उल्हास देबडवार यांच्या अध्यक्षतेखालील या समितीने वर्ध्यात वृक्ष बचाओ नागरिक समितीची भूमिका समजून घेत एकही वृक्ष तोडला जाणार नाही तसेच झाडांना कोणतीही इजा होणार नाही याची दक्षता घेतली जाईल, याबाबत याच सभेत आश्वस्त केले. मात्र अवघ्या दहा दिवसातच पुन्हा वृक्षतोड सुरू झाल्यामुळे नागरिक समितीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Follow the word given while celebrating Gandhi Jayanti | गांधी जयंती साजरी करताना दिलेला शब्दही पाळा

गांधी जयंती साजरी करताना दिलेला शब्दही पाळा

ठळक मुद्देगोपुरी परिसरात वृक्षतोड : वृक्ष बचाओ समितीची तीव्र नाराजी

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत सुरू असलेल्या रस्ता रूंदीकरणाच्या कामादरम्यान होणाऱ्या वृक्ष कटाईला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी स्थगिती दिली. या कामाबाबत फेरविचार करण्यासाठी सचिवस्तरीय समिती नेमण्यात आली. बांधकाम विभाग सचिव उल्हास देबडवार यांच्या अध्यक्षतेखालील या समितीने वर्ध्यात वृक्ष बचाओ नागरिक समितीची भूमिका समजून घेत एकही वृक्ष तोडला जाणार नाही तसेच झाडांना कोणतीही इजा होणार नाही याची दक्षता घेतली जाईल, याबाबत याच सभेत आश्वस्त केले. मात्र अवघ्या दहा दिवसातच पुन्हा वृक्षतोड सुरू झाल्यामुळे नागरिक समितीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
सध्या गोपुरी चौकात रस्ता रूंदीकरणाचे काम सुरू असून या भागात रात्रीतून दोन झाडे तोडण्यात आल्याचे दिसून आले. तर याच मार्गावरील काही मोठ्या झाडांची मुळे कापण्यात आली असून काही हिरव्या झाडांच्या खोडावरील साली काढल्या गेल्याने या झाडांना क्षती पोचली आहे. दत्तपूर ते सेवाग्राम या मार्गावरील झाडांच्या उघड्या पडलेल्या मुळ्यांनाही माती टाकून संरक्षित करण्याचे सचिवांच्या उपस्थित झालेल्या सभेत ठरलेले असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतलेल्या या पवित्र्याबद्दल निसर्गप्रेमी नागरिकांनी खेद व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे रस्त्याच्या कडेला असणाºया वृक्षाभोवती दीड मीटर परिघात खोदकाम न करण्याचेही याच सभेत निश्चित करण्यात आले होते. तसेच झाडांभोवती खोदकाम करणे गरजेचेच असेल तर मोठ्या यंत्रांचा वापर न करता मानवी श्रमातून हे काम केले जावे, याबाबतही या सभेत चर्चा करण्यात आली होती. मात्र या सर्व सूचनांना हरताळ फासत आणि निर्णयांचा अवमान करीत ठेकेदारी पद्धतीने कामे करण्यात येत आहे.
ज्या महात्मा गांधींनी पर्यावरणाबाबत जागृत राहून या परिसरात मोठ्या प्रमाणात कडुलिंबाची झाडे लावली, त्या महात्म्याची जयंती वृक्षांना संरक्षण देऊन साजरी करावी, असे आवाहन वृक्ष बचाओ नागरिक समितीद्वारे करण्यात आले आहे. गोपुरी परिसरात वृक्ष तोडण्यात आल्याने परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला.

Web Title: Follow the word given while celebrating Gandhi Jayanti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.