शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
2
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
3
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
4
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
5
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
6
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
8
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
9
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
10
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
11
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
12
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
13
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
14
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
15
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
16
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
17
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
18
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
19
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
20
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका

११६ लाभार्थ्यांना वैरण बियाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 10:03 PM

२०१८-१९ च्या जिल्हा वार्षिक योजना दुभत्या जनावरांना वैरण उपलब्ध करण्यासाठी सुधारणा कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषदेला २० लाखांचा निधी प्राप्त झाला होता. प्रतिलाभार्थी रु. १५०० च्या मर्यादेमध्ये वैरण बियाणे मका, ज्वारी, बाजरी, यशवंत, जयवंत प्रजातीचे ठोंबे १०० टक्के अनुदानावर मोफत पुरविण्यात आले.

ठळक मुद्देवैरण विकास योजना : चाराटंचाईवर केली मात

सुधीर खडसे ।लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : २०१८-१९ च्या जिल्हा वार्षिक योजना दुभत्या जनावरांना वैरण उपलब्ध करण्यासाठी सुधारणा कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषदेला २० लाखांचा निधी प्राप्त झाला होता. प्रतिलाभार्थी रु. १५०० च्या मर्यादेमध्ये वैरण बियाणे मका, ज्वारी, बाजरी, यशवंत, जयवंत प्रजातीचे ठोंबे १०० टक्के अनुदानावर मोफत पुरविण्यात आले. समुद्रपूर तालुक्यातील ११६ शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेत चाराटंचाईवर यशस्वीरीत्या मात केली.तालुक्यातील बोथली येथील वाल्मीक सेलवटे यांच्याकडे ५ संकरित गाई, ८ नागपुरी म्हैस आणि ४ बैल असून १०० लिटर दुधाची ते जाम येथे विक्री करतात. योजनेंतर्गत त्यांनी शेतात वैरण पिकांची लागवड केल्याने टंचाईच्या काळातही जनावरांकरिता मुबलक चारा उपलब्ध आहे. दहेगाव येथील विकी सहस्त्रबुद्धे यांच्याकडे १० गाई, ३ म्हैस, २ बैल आणि ७ वासरे आहेत. मुरादपूर येथील चंद्रभान हिवसे यांच्याकडे २ बैल ५ गाई व इतर जनावरे आहेत. निंभा येथील मोरेश्वर बागेश्वर यांना पशुसंवर्धन विभागाच्या योजनेमधून २ दुधाळ जनावरे वाटप करण्यात आली. सध्या त्यांच्याकडे २ बैल, २ संकरित गाई आणि २ कालवडी आहेत. तसेच विनोद महादेव नारनवरे यांच्याकडे २ बैल, २ संकरित गाई, २ गोºहे आणि १ कालवड असुन असून त्यांनीही वैरण बियाणे लागवड करीत चाराटंचाईवर मात केली.चारा नियोजनाअभावी पशुपालक चिंताग्रस्त असतांना या पशुपालकांनी पुरवठा करण्यात आलेल्या बियाण्यांची लागवड केली. त्यामुळे भर उन्हाळ्यात या शेतकऱ्यांकडे मुबलक चारा उपलब्ध आहे.शेतकऱ्यांनी घ्यावा आदर्शजिल्ह्यात भीषण पाणी आणि ज्वारीचा पेरा हद्दपार झाल्याने चाराटंचाई निर्माण झाली आहे. अद्याप एकाही तालक्यात चाराछावणी नाही. दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांनी वैण बियाणे, ठोंबे लागवड करून चारा उत्पादन घेत चाराटंचाईवर यशस्वीरीत्या मात केल्याने इतर शेतकऱ्यांनी प्रेरणा घेण्याची गरज आहे.दुभत्या जनावरांकरिता वैरण उपलब्ध करण्यासाठी सुधारणा कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषदेकडून पंचायत समितीला १ लाख ७५ हजारांचा निधी प्राप्त झाला. यातून वैरण बियाणे आणि ठोंबे खरेदी करीत पशुपालकांना पुरवठा करण्यात आले.- डॉ. स्मिता मुडे, पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पं.स.समुद्रपूर.