‘फॉडर कॅफेटेरिया’ प्रकल्प पाण्याअभावी मरणपंथाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 00:20 IST2019-02-02T00:18:50+5:302019-02-02T00:20:18+5:30
ग्रामीण भागातील दुधाळू गायी, म्हशींना ओला चारा मिळावा, चाºयाच्या माध्यमातून भरपूर दुधासोबतच चांगल्या प्रतिचे दूध मिळावे आणि गोपालकांचेही उत्पन्न वाढून चाराटंचाईवर मात करण्यासाठी वर्धा जिल्ह्यातील पुलगाव, अल्लीपूर व सिंदी (रेल्वे) येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या २० गुंठे जागेची फॉडर कॅफेटेरियाचे बेणे (चारा) लागवडीसाठी निवड करण्यात आली होती.

‘फॉडर कॅफेटेरिया’ प्रकल्प पाण्याअभावी मरणपंथाला
योगेश वरभे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अल्लीपूर : ग्रामीण भागातील दुधाळू गायी, म्हशींना ओला चारा मिळावा, चाºयाच्या माध्यमातून भरपूर दुधासोबतच चांगल्या प्रतिचे दूध मिळावे आणि गोपालकांचेही उत्पन्न वाढून चाराटंचाईवर मात करण्यासाठी वर्धा जिल्ह्यातील पुलगाव, अल्लीपूर व सिंदी (रेल्वे) येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या २० गुंठे जागेची फॉडर कॅफेटेरियाचे बेणे (चारा) लागवडीसाठी निवड करण्यात आली होती.
९ मार्च २०१६ रोजी शासनाच्या वतीने फॉडर कॅफेटेरियाचा प्रकल्प राबविण्याचा आदेश देण्यात आला होता. झाशी व हैदराबाद येथील २७ प्रजातींच्या चाºयाची रोपे आणून लावण्याते आली, जेणेकरून गोपालकांच्या चाराटंचाईवर मात करून उत्पन्नवाढीसही मदत होईल.
परंतु, अल्लीपूर येथील एका जागेवरील चारा प्रकल्प पाण्याअभावी कोरडा पडला असून अखेरच्या घटका मोजत आहे. दवाखान्यात तीव्र पाणी टंचाई असल्यामुळे विहीर, विंधन विहीर पाणी नसल्याने रोपे वाळू लागली आहे. तातडीने नवीन कूपनलीकेची व्यवस्था केल्यास उन्हाळ्यात चारा उपलब्ध होईल तसेच बेणेही शेतकºयांना उपलब्ध होईल, अन्यथा उन्हाळ्यात दुधाळू जनावरांची हेळसांड होऊन शेतकºयांच्या उत्पन्नात घट येईल. कारंजा येथे एक लाख बेणे, हिंगणघाट येथे ८० हजार, समुद्रपूर येथे ९० हजार बेणे वितरित करण्यात आले होते. आता मात्र वाळलेले बुंधे तेवढेच शिल्लक राहिलेले आहेत.
चाराटंचाईवर मात करण्यासोबतच भरपूर दूध आणि त्या माध्यमातून गोपालकही समृद्ध व्हावेत या अनुषंगाने बेण्यांची लागवड करण्यात आली. मात्र, महत्त्वपूर्ण या प्रकल्पाला पाण्याअभावी फटका सहन करावा लागत आहे.
दवाखान्यात पाण्याचे मुबलक साधन उपलब्ध नसल्यामुळे चाºयाला पाणी देणे शक्य होत नाही. कूपनलिकेला पाणी नसल्याने येथे पाणीटंचाई आहे.
- डॉ. अमित लोहकरे, पशुधन विकास अधिकारी, अल्लीपूर.
चारा बेणे दवाखान्यात उपलब्ध नसल्याने दुधाळू जनावरांना अडचण येत आहे. बेण्याला मुबलक व २४ तास पाणी देणे गरजेचे आहे.
- अरविंद साखरकर, दुग्ध उत्पादक शेतकरी, अल्लीपूर.