खादीची गुणवत्ता अधिक वाढविण्यावर भर देणार

By Admin | Updated: May 3, 2015 01:49 IST2015-05-03T01:49:20+5:302015-05-03T01:49:20+5:30

खादीच्या गुणवत्तेत अधिकाधिक वाढ करून ग्रामीण रोजगार वाढीवर अधिकाधिक भर देणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री गिरीराज सिंह यांनी केले.

Focusing on increasing the quality of khadi | खादीची गुणवत्ता अधिक वाढविण्यावर भर देणार

खादीची गुणवत्ता अधिक वाढविण्यावर भर देणार

वर्धा : खादीच्या गुणवत्तेत अधिकाधिक वाढ करून ग्रामीण रोजगार वाढीवर अधिकाधिक भर देणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री गिरीराज सिंह यांनी केले.
महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकीकरण संस्थेला (एमगिरी) शनिवारी सकाळी त्यांनी भेट दिली. संपूर्ण संस्थेच्या कार्याबाबत माहिती जाणून घेतली. ग्रामीण उद्योगावर भर देऊन ग्रामीण युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यावर भर द्या, अशा सूचना केंद्रीय उद्योग राज्यमंत्री गिरीराज सिंह यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या़ संस्थेतील कॅड-कॅम प्रयोगशाळेचे त्यांच्या हस्ते उद्घाटनही करण्यात आले़ यावेळी ते बोलत होते़
यावेळी खासदार रामदास तडस, खादी आणि ग्रोमोद्योग आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण कुमार झा, एमगिरीचे संचालक डॉ. पी.बी. काळे, ग्रामीण शिल्प आणि अभियांत्रिकी विभागाचे उपसंचालक के.बी. राव, के. रवी कुमार यांची उपस्थिती होती. एमगिरी येथील सौरउर्जेवरील चरखा, शिलाई मशीन, खादी आणि टेक्सटाईल निर्मिती आदींची त्यांनी पाहणी केली. संस्थेच्या कार्य, उपक्रमांची माहिती जाणून घेतली. त्यांना संस्थेबाबत संपूर्ण माहिती केंद्राचे संचालक पी.बी. काळे यांनी दिली. याप्रसंगी एमगिरी येथील वैज्ञानिक, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते़ प्रारंभी मान्यवरांनी महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधीजींच्या पुतळ्याला सुतमाला अर्पण करून अभिवादन केले.(कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Focusing on increasing the quality of khadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.