शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

पाण्याचा भडका; टँकरसाठी धावाधाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 21:56 IST

शहरात पाणीसमस्या दिवसेंदिवस तीव्र होत असल्याने नागरिकांना त्याच्या झळा सोसाव्या लागत आहेत. पालिकेने पाण्याचे नियोजन करून पाच दिवसांआड पाणीपुरवठा सुरू केला होता. परंतु, वाढलेले तापमान आणि जलाशयाची खालावलेली पातळी यामुळे पालिकेचे नियोजन कोलमडल्याने शहरात पाणीप्रश्न चांगलाच पेटला आहे.

ठळक मुद्देपालिकेचे नियोजन कोलमडले : दहा दिवसांपासून कोरड, नागरिकांना सहन करावा लागतोय त्रास

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरात पाणीसमस्या दिवसेंदिवस तीव्र होत असल्याने नागरिकांना त्याच्या झळा सोसाव्या लागत आहेत. पालिकेने पाण्याचे नियोजन करून पाच दिवसांआड पाणीपुरवठा सुरू केला होता. परंतु, वाढलेले तापमान आणि जलाशयाची खालावलेली पातळी यामुळे पालिकेचे नियोजन कोलमडल्याने शहरात पाणीप्रश्न चांगलाच पेटला आहे. सद्यस्थितीत नागरिकांना दहा दिवसांपासून पाणी मिळाले नसून नागरिकांची पाण्यासाठी धावाधाव सुरू आहे.शहराला सुरळीत पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी पालिकेची आहे. शहरात सध्या सिमेंटीकरण, पाणीपुरवठा पाईपलाईन आणि भुयारी गटार योजना यामुळे शहरातील रस्ते पोखरले आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगरपालिकेत समन्वयाचा अभाव असल्याने नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. या बांधकाम नळजोडणी वारंवार फुटत असल्याने पाणीपुरवठा खंडित होत असून पाण्याचाही अपव्यय होत आहे. परिणामी, नागरिकांच्या घशाला कोरड पडत आहे. पाच दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात पालिका असमर्थ ठरल्याने दहा दिवसांपासून नागरिक पाण्याच्या प्रतीक्षेत आहे. शहरातील टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे अपेक्षित असताना केवळ तीन टँकरद्वारेच पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांना वेळेत पाणी मिळत नसल्याने खासगी टँकरचा आधार घ्यावा लागतो. त्यासाठी नागरिकांना पाचशे ते हजार रुपये मोजावे लागत आहे. नागरिकांना काम सोडून पाण्याची सोय करण्यासाठी धावपळ करावी लागत असल्याने शहरातील पाणीकोंडी आणखीच तीव्र होण्याची शक्यता बळावली आहे.पदाधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी थाटली दुकानदारीशहरातील पाणीटंचाई फायदा उचलत अनेकांनी पाणी टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्याचा व्यवसायच थाटला आहे. यात नगरपालिकेतील काही आजी-माजी नगरसेवकांसह कर्मचारीही सहभागी आहे. त्यांनी स्वत: चे टँकर तयार करुन शहरात पाणीपुरवठा सुरु केला आहे. यांच्या सपन्नतेसाठी तर पालिका अतिरिक्त टँकरव्दारे पाणीपुरवठा करणे टाळत नाही ना? असाही प्रश्न आता उपस्थित होत आहे.शहरात जवळपास २० ते २५ टँकर असून दररोज एक टँकर दहा ते पंधरा ट्रीप मारताना दिसत आहे. शहरालगतच्या शेतकºयांच्या विहिरीवरुन दोनशे रुपयात भरुन घेतलेला टँकर नागरिकांना १ हजार ते १ हजार २०० रुपयांत दिला जात आहे. यावरून टँकरचालक पाण्यासारखा पैसा लुटत आहे. यावर पालिकेने नियंत्रण आणण्याची गरज आहे.घरगुती बोअरवेलचे पाणी विकण्याकरिता नगरपालिका किंवा ग्रामपंचायतची परवानगी घेणे बंधनकारक आहे. असे असतानाही आर्वी मार्गावरील पंजाब कॉलनी परिसरातील एका गृहस्थामार्फत बिनदिक्कतपणे टँकरव्दारे पाण्याची विक्री सुरु आहे. लहान टँकर ५०० रुपये तर मोठा १ हजार रुपयात विकल्या जात आहे. पहाटेपासून तर रात्री उशीरापर्यंत पाणी विक्री सुरु असतानाही ग्रामपंचायतीचे मात्र दुर्लक्ष आहे.मागील दहा दिवसांपासून नळ आले नसल्याने पाणी टँकरची मागणी वाढली आहे. कोणत्याही टँकरचालकाला फोन केला तर तत्काळ टँकर उपलब्ध होत नाही. एका दिवसाचे ‘वेटिंग’ असल्याचे सांगतात. तर काही जास्त पैसे दिल्यावर लगेच पाणी पोहोचवितात. अशी मनमर्जी सध्या शहरात सुरू असून नागरिकांची होरपळ होत आहे.कंत्राटदाराविरुद्ध पोलिसात तक्रारशहरात दहा दिवसांपासून नागरिक पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. असे असतानाही बॅचलर रोडलगतच्या राधानगरात भुयारी गटार योजनेच्या कामादरम्यान प्रशांत वानखेडे यांच्या घरची नळजोडणी तोडली. आज दहाव्या दिवशी नळ आले पण, जोडणी फुटल्याने त्यांना पाणी मिळाले नाही. नळजोडणी तोडल्याने कंत्राटदाराला विचारपूस केली असता त्याने वानखेडे यांनाच धमकावत आपली मुजोरी कायम ठेवली. तसेच पाणी घेऊन आलेला टँकरही त्यांच्या घरापर्यंत जाऊ दिला नाही. त्यामुळे वानखेडे यांनी पोलीस ठाणे गाठून कंत्राटदारविरुद्ध तक्रार नोंदविली आहे. असाच त्रास अनेकांना सहन करावा लागत असल्याने मुजोर कंत्राटदारावर कारवाई करण्याची गरज आहे.पेट्रोलपेक्षा पाणी महागलेपाणीटंचाईच्या काळात पाण्यासाठी वाट्टेल ते अशीच स्थिती पाहायला मिळत आहे. सकाळपासून नागरिक सार्वजनिक नळांवर, विहिरीवर व हातपंपावर गर्दी करून पाण्यासाठी धडपडतांना दिसून येत आहे. पाण्याची वाहतुक करण्यासाठी चक्क दोनचाकी व चारचाकी वाहनांचाही वापर होत आहे. त्यामुळे नागरिकांना परराष्ट्रातील पेट्रोल मिळणे सहज शक्य आहे. पण, पाणी मिळणे कठीण झाल्याने नागरिकांना पाणी आणण्याकरिता पेट्रोलची वाहने वापरावी लागत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई