अंबाडीची फुले...
By Admin | Updated: January 2, 2017 00:05 IST2017-01-02T00:05:26+5:302017-01-02T00:05:26+5:30
हिवाळ्याच्या दिवसात अनेक प्रकारचा रानमेवा शेतात व शेताच्या धुऱ्यावर दिसतो.

अंबाडीची फुले...
अंबाडीची फुले... हिवाळ्याच्या दिवसात अनेक प्रकारचा रानमेवा शेतात व शेताच्या धुऱ्यावर दिसतो. यात आंबट चव असलेली अंबाडीची भाजी सर्वांनाच आवडणारी आहे. याच अंबाडीला येणारी लाल फुलांची चटणी थंडीच्या दिवसात अनेक खवय्यांना आकर्षित करते. तर हीच लाल फुले वाळवून उन्हाळ्याच्या दिवसात त्याचे सरबत घेतल्यास शरीरात वाढलेली उष्णता शमविण्याकरिता उपयोगी असते.