शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
3
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
4
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
5
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
6
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
7
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
8
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
9
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
10
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
11
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
12
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
13
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
14
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

पूर व वादळाचा तडाखा

By admin | Updated: July 23, 2014 23:46 IST

वादळी पावसाचा तालुक्यातील सर्व गावांना फटका बसला़ यात मोठे नुकसान झाले़ बोरगाव-आलोडा, सरुळ-वायगाव तसेच देवळी ते डिगडोह, नांदोरा व मुरदगाव या पुलावरील वाहतूक यशोदा

यशोदा नदीच्या पुरामुळे वाहतूक ठप्प; घरांची पडझड, शेतीही खरडलीदेवळी - वादळी पावसाचा तालुक्यातील सर्व गावांना फटका बसला़ यात मोठे नुकसान झाले़ बोरगाव-आलोडा, सरुळ-वायगाव तसेच देवळी ते डिगडोह, नांदोरा व मुरदगाव या पुलावरील वाहतूक यशोदा नदीच्या पुरामुळे बुधवारी दुपारपर्यंत बंद होती. यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या़ नदी व नाल्यांचे पाणी शेतात गेल्याने शेतांना तलावाचे स्वरुप आले़ पुरामुळे शेते खरडून गेली व पिकांचे नुकसान झाले. सोयाबीन बियाणे जमिनीत सडले तर कपाशीचे पीक पूर्णत: पाण्याखाली आल्याने नुकसान झाले. झाडे पडून घरांची पडझड झाली. बुधवारी सकाळपर्यंत १३१ मिमी पावसाची नोंद झाली़तीन तालुक्यांत दोन दिवस वीज गुल; अनेक मार्ग बंदआष्टी (श़) - सततच्या पावसामुळे आर्वी, आष्टी व कारंजा तालुक्यातील वीज मंगळवार रात्रीपासून बंद होती़ यामुळे संपूर्ण व्यवहार ठप्प झाले होते़ कारंजा येथील वीज पुरवठा पहाटे ४ वाजता तर आष्टीची वीज रात्री १ वाजेपासून बंद होती़ तळेगाव ते आष्टी मार्गावर झाडे पडल्याने रात्रीपासून बुधवारी दुपारपर्यंत वाहतूक ठप्प होती़ जाम नदीच्या पुरामुळे आष्टी ते साहूर मार्ग बंद होता़ जाम, बाकळी व कड नदीला पूर आल्याने परिसरातील शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले़ सर्वाधिक नुकसान साहूर परिसरात झाल्याची नोंद आहे़मनसावळी ते कापसी मार्ग ठप्पहिंगणघाट - संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले ठप्प झाली़ २४ तासांत तालुक्यात ११४़४० मि.मी. तर एकूण ४०१ मिमी पाऊस झाला़ पावसामुळे वर्धा, यशोदा, वणा, पोथरा, लाल नाला आदींसह नाले दुथड्या वाहत आहे़ यशोदा नदीला आलेल्या पुरामुळे मनसावळी ते कापसी रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती़ संततधार पावसामुळे शासकीय कार्यालये, शाळा महाविद्यालयातील उपस्थिती रोडावली व बाजारपेठाही ओस होत्या़ तालुक्यात ९३ गावांची पडझडसमुद्रपूर - तुडूंब भरलेल्या लाल नाला धरणाची ५ दारे खुले करण्यात आली़ पोथरा धरण ओव्हरफ्लो झाले़ बुधवारी सकाळी ८ वाजेपर्यंत तालुक्यात १२७ मिमी तर एकूण ३९१.३ मिमी पावसाची नोंद झाली़ वाघाडी नदीच्या पुलावरून पाणी असल्याने वर्धा-समुद्रपूर मार्ग सकाळी ४ तास बंद होता. मार्डा येथे १० कुटुंबांना प्राथमिक शाळेत हलविण्याची तयारी होती; पण पाऊस थांबल्याने प्रक्रिया रोखली़ डोंगरगाव, आसोला व कोरा परिसरात काही गावांना सतर्कतेचा इशारा दिला़ वाघाडी नदीचे पाणी शेतांत पाणी शिरल्यासने पिकांचे नुकसान झाले. चारमंडळ येथे ५० घरांचे अंशत: तर अंतरगाव, घोरपड, चापापूर, वानरचुआ, सावंगी, लोखंडी, वाघेडा, सायगव्हान, धोंडगाव, समुद्रपूर, वायगाव (ह.), रेणकापूर, निंभा, बोडखा, मुरादपूर, पाइकमारी आदी गावांतील एकूण ४३ घरांची अंशत: पडझड झाली़ कारंजा तालुक्यात १९३ घरांची पडझडतालुक्यात १९३ घरांची अंशत: पडझड झाली़ यात कारंजा मंडळात ५६, सारवाडी ४९, ठाणेगाव ३३, कन्नमवारग्राम ४५ घरांची पडझड झाली़ यात ५ लाखांचे नुकसान झाले़ तहसीलदार बालपांडे यांनी बिहाडी, वाघेडा, काकडा, सेलगाव (ल़) गावांना भेटी देत आढावा घेतला़ ६८ गावांतील शेतांना फटका बसला़ बांध फुटल्याने शेती खरडली़ मंगळवारी सायंकाळी १७ टक्के असलेला खैरी धरणाचा जलसाठा बुधवारी दुपारी ९० टक्क्यांवर पोहोचला़