जिल्ह्यात स्वातंत्र्यदिनी ठिकठिकाणी ध्वजारोहण व वृक्षारोपण कार्यक्रम

By Admin | Updated: August 19, 2015 02:28 IST2015-08-19T02:28:08+5:302015-08-19T02:28:08+5:30

भारताचा ६९ वा स्वातंत्र्यदिन जिल्ह्यात सर्वत्र शाळा-महाविद्यालय, ग्रामपंचायत, शासकीय व निमशासकीय कार्यालये यासह इतरही ठिकाणी साजरा करण्यात आला. सर्वत्र ध्वजारोहण करून वृक्षारोपणही करण्यात आले.

Flag hoisting and plantation programs at the district's independence day | जिल्ह्यात स्वातंत्र्यदिनी ठिकठिकाणी ध्वजारोहण व वृक्षारोपण कार्यक्रम

जिल्ह्यात स्वातंत्र्यदिनी ठिकठिकाणी ध्वजारोहण व वृक्षारोपण कार्यक्रम

वर्धा : भारताचा ६९ वा स्वातंत्र्यदिन जिल्ह्यात सर्वत्र शाळा-महाविद्यालय, ग्रामपंचायत, शासकीय व निमशासकीय कार्यालये यासह इतरही ठिकाणी साजरा करण्यात आला. सर्वत्र ध्वजारोहण करून वृक्षारोपणही करण्यात आले.
ए. एम. पी. एस. कॉन्व्हेंट
आर्वी : जनता नगर येथील ए.एम.पी.एस. कॉन्व्हेंटमध्ये स्वातंत्र्यदिनी शाळेचे अध्यक्ष डॉ. गुल्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य कालोकर, काळे, मुख्याध्यापक गोडबोले यांच्यासह शिक्षकवृंद व पालकांची उपस्थिती होती.
प्राथमिक आरोग्य केंद्र, मांडगाव
वर्धा : मांडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वातंत्र्य दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. अध्यक्षस्थानी वैद्यकीय अधिकारी दत्तात्रेय चरडे तर प्रमुख अतिथी म्हणून औषध निर्माण अधिकारी तृप्ती देशमुख उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात केले. कार्यक्रमाला आरोग्य सहाय्यक भुजाडे, बोरसरे, शिरपूरकर, पोहनकर, पडोळे, हरणे, गीता चांभारे, गेडाम, मिरगे, कांबळे, वानखेडे, शंभरकर मिरगे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
सयजा मोहन विद्यालय
वायगाव( िन.) : सरूळ येथील सयजा मोहन विद्यालयात स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम संस्थाध्यक्ष अशोक जवादे मुख्याध्यापकांच्या उपस्थितीत घेण्यात आला. यानंतर शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
सिद्धार्थ नवयुवक वाचनालय
पुलगाव : स्थानिक सिद्धार्थ नवयुवक वाचनालयाद्वारे संचालित डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्ययन केंद्र येथून नव्याने नोकरीवर लागलेल्या विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी प्रवीण वानखेडे, अशोक रोकडे, प्रिती मिश्रा, नरेश बुटे, महेश साहू, प्रभाकर सुरजुसे, शैलेश सहारे, अरूण राऊत, अजय बोदेले आदींची उपस्थिती होती. यावेळी महिला कर्मचारी वैशाली नंदेश्वर, मंगला विलासी यांना सन्मानित करण्यात आले. सिद्धार्थ नवयुवक वाचनालय, पुलगावचा विद्यार्थी कौस्तुभ रंगारी या विद्यार्थ्याची धर्माची संस्कृती व त्याबद्दलचे विचार जगी मांडण्याकामी भारत सरकारद्वारे निवड करण्यात आली. त्याचाही सत्कार करण्यात आला. पोलीस निरीक्षक राजेंद्र शिरतोडे, रवींद्र बोदेले उपस्थित होते. संचालन गणेश सरोदे यांनी केले.
किनकर इंटरनॅशनल स्कूल
सेलू : किनकर इंटरनॅशनल शाळेत आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थासचिव किशोर किनकर तर अतिथी म्हणून बबन दूरतकर, यशवंत थूल उपस्थित होते. किनकर यांच्या हस्ते झेंडवंदन झाले. कार्यक्रमाला प्राचार्य फरकाडे, प्राचार्य ठाकरे, प्राचार्य अमोल फाले, गुहा, इंगोले व शिक्षकवृंद उपस्थित होते. संचालन आरती जैन यांनी केले. आभार मनीषा येळणे यांनी मानले.
मुक्ताबाई विद्यालय
समुद्रपूर : येथे संस्थेचे अध्यक्ष सुधाकर घोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाला मुख्याध्यापक कल्पना शिंदे, सर्व शिक्षक, विद्यार्थी व पालकवर्गाची उपस्थित होती.
पी. एन. सरोदे महाविद्यालय
वर्धा : येथे आयोजित कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून संस्थेचे संस्थापक प्रवीण सरोदे तर प्रमुख पाहुणे म्हणून शरद मुडे उपस्थित होते. संचालन धीरज मसराम यांनी केले. यशस्वीतेकरिता कांबळे, दातारकर, भोयर, विनोद देऊळकर, मंगेश सातपुते, जगदीश मडावी आदींनी सहकार्य केले.
सुशील हिंमतसिंगका विद्यालय
वर्धा : येथे महिला सेवा मंडळचे सहमंत्री पवन रुईया यांच्या हस्ते आमदार पंकज भोयर यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक महेंद्र धर्माळे, माजी मुख्याध्यापक सुरेंद्र गौतम, पर्यवेक्षक प्रमोद मेश्राम उपस्थित होते. संचालन रेखा जुगनाके यांनी केले.
महात्मा गांधी विद्यालय
हिंगणघाट : कुटकी येथे महात्मा गांधी विद्यालयात आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमाला मुख्याध्यापक तिजारे, शालिक कापसे, पंढरीनाथ महाजन, सीमा उईके उपस्थित होते. यावेळी वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाला हरितसेना प्रमुख कुडमते, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
मूकबधिर विद्यार्थ्यांना साहित्य वाटप
सेवाग्राम : येथील बापूराव देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालयातील सिव्हील व मेकॅनिकल इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यदिनी नालवाडी येथील शारदा मुकबधिर विद्यालयात शैक्षणिक साहित्य वितरण करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. एस. व्ही. देशमुख, प्रा. यु. डी. गुल्हाणे, डॉ. एस. जी. मकरंदे, डॉ. पी. पी. सकलेचा, उषा फाले, मुरलीधर फाले, मुख्यध्यापक श्याम भेंडे, राजश्री देशमुख उपस्थित होते. यशस्वीतेकरिता प्रा. निखार, प्रा. डेहणे, प्रा. किटे, प्रा. लोहे, प्रा. वाघ, प्रा.केळापुरे, नेहा महाजन, अनुज सक्सेना, नीरज मिश्रा, अर्जून देशमुख, हर्षल चांडक, शुभम गजभिये, शुभम हिवंज आदींनी सहकार्य केले.
आष्टी परिसरात ध्वजारोहण
आष्टी (श.) : येथील शासकीय-निमशासकीय व खासगी संस्थामध्ये ध्वजारोहण करण्यात आले. यामध्ये हुतात्मा राष्ट्रीय शैक्षणिक परिवारातर्फे गुणवंत विद्यार्थिनी रोहिणी विघ्ने, हिच्या हस्ते, लोकमान्य विद्यालय शैक्षणिक परिवारातर्फे नेहा विवेक लाडवीकर, जवाहर उर्दु विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात नवशीन शेख बशीर, क्रांती ज्ञानपीठमध्ये श्रीधर उमाळे, लोकमान्य वाचनाल्यात सुभाष गुप्ता, प्राथमिक आरोग्य केंद्रात निर्मला बिजवे, आष्टी तालुका सहकारी सेवा सोसायटीमध्ये शाह महंमद खान, शारदादेवी भार्गव विद्यालयात संस्था पदाधिकारी भार्गव, को. आॅ. बॅक़ शाखेत खंडार, नगरपंचायत कार्यालयात प्रशासन अधिकारी तहसीलदार सीमा गजभिये, आष्टी पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक एस. एस. सोनटक्के, खासगी हुतात्मा स्मारकावर रम तांबस्कर तर कार्यालयाच्या परिसरात सीमा गजभिये यांनी ध्वजारोहण केले.
सेलू येथे ठिकठिकाणी ध्वजरोहण
सेलू : शहरात ठिकठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले. तहसील कार्यालयात तहसीलदार डॉ. रवींद्र होळी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी नायब तहसीलदार तिनघसे, झिले, माने, पुरवठा निरीक्षक देशमुख, शंभरकर उपस्थित होते. श्री संत केजाजी मुकबधिर शाळेत संस्थाध्यक्ष विजयसिंह चंदेल यांनी ध्वजारोहण केले. यावेळी संस्थेचे संचालक, शिक्षक व नागरिक उपस्थित होते. पोलीस स्टेशन येथे ठाणेदार संतोष बाकल यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. उपनिरीक्षक व सर्व पोलीस कर्मचारी उपस्थित होते. सार्वजनिक बांधकाम विभागात उपविभागीय अभियंता ए. डब्ल्यु. कुटे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. संस्कार इंग्लिश स्कूलमध्ये सेवानिवृत्त शिक्षक एम. बी.महाकाळकर यांनी ध्वजारोहण केले. याप्रसंगी सेवानिवृत्त शिक्षक वामन बुटे, रमेशचंद्र जाजोदिया, प्राचार्य रोहिणी लुंगे उपस्थित होते. संचालन कविता राऊत यांनी तर आभार किरण बाकडे यांनी मानले. दीपचंद चौधरी विद्यालयात मुख्याध्यापक पळसौदकर यांनी ध्वजारोहण केले. याप्रसंगी संस्थेचे नवळचंद चौधरी, नवीन चौधरी, अनिल चौधरी, युवराज राठी, नरेंद्र सारस्वत, शैलेंद्र दप्तरी, सुरेंद्र सराफ, कापसे उपस्थित होते. एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी पथसंचालन केले. यशवंत विद्यालयात मुख्याध्यापक भोमले यांनी ध्वजारोहण केले. विशाल विविध कार्यकारी सह. संस्थेत संस्थाध्यक्ष डॉ. राजेश जयस्वाल यांनी ध्वजारोहण केले. यावेळी सचिव भोंगाडे सर्व संचालक, कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते. गुड शेफर्ड इंग्लिश स्कूलमध्ये मुख्याध्यापक सतीश काटवे यांनी ध्वजारोहण केले. ग्रामपंचायत बर्खास्त होवून नगरपंचायत झाल्यामुळे प्रशासक तहसीलदार डॉ. होळी यांनी ध्वजारोहण केले. याप्रसंगी डॉ. राजेश जयस्वाल, राजेंद्र माहुरे, लता लिखार, शंकर देवतारे, तलाठी वंदना सव्वालाखे, प्रशांत रहांडले, आदी सह ग्रा. पं. कर्मचारी उपस्थित होते. डी. पी. नर्सिंग व पब्लिक स्कूल मध्ये संस्थेचे प्रमुख रुपेश वरटकर यांनी ध्वजारोहण केले. वीज वितरण कार्यालयात उपकार्यकारी अभियंता पुरी यांनी ध्वजारोहण केले. याप्रसंगी अभियंता गुबे, कर्मचारी, लाईनमन आदी उपस्थित होते. पंचायत समिती कार्यालयात सभापती मंजुषा दुधबडे यांनी ध्वजारोहण केले. यावेळी उपसभापती मंजुषा पारसे, पं. स. सदस्य, विस्तार अधिकारी, कृषी अधिकारी किटे, नागपूरकर, बिडीओ अनिता तेलंग उपस्थित होते.
डॉ. आंबेडकर मतिमंद शाळा
हिंगणघाट : येथील मतिमंद मुलामुलींच्या निवासी विशेष शाळा हिंगणघाट येथे गजु कुबडे, धनराज चांभारे, सुरेश चौधरी, सेवानिवृत्त हाते, संस्थाध्यक्ष दिनेश शेटीये, योगेश बिलगये आदीच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी बिलगये, बांते, चायंदे, कंदीकुरवार, मेश्राम, जगताप, हत्तीमारे, बिरजे, बोबडे, भिसे, तायवाडे, काचोळे, मडावी आदींनी सहकार्य केले. संचालन राजेश बांते, आभार कृणाल चायंदे यांनी मानले.
बी. आय. एस. स्कूल, गिरोली
वर्धा : येथे संस्थेचे अध्यक्ष डी. एम. थुल यांनी ध्वजारोहण केले. यावेळी मुख्याध्यापक उषा भगत, पुनम डहाके शिक्षक वृंद उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले.
बोधिसत्व विद्यालय, अडेगाव
वर्धा : येथे आयोजित कार्यक्रमाला मुख्याध्यापक मनीष थुल, सुरेश ठाकरे, अशोक सराटे, अनिल मडावी, प्रशांत राऊत, शिवप्रसाद नाखले, सरपंच वर्षा इंगळे, संगीता नाकर उपस्थित होत्या. प्रास्ताविक जगदीश सहारे यांनी केले. संचालन अश्विनी भुसारी यांनी केले तर आभार प्रगती येसणकर यांनी मानले. यशस्वीतेकरिता राजकुमार थुल, भारत भस्मे, रमेश डोंगरे, धनंजय खोंडे, रमेश पोराटे, राजेंद्र वडाळकर, मृणालिनी दातार, नरेश कोठेकार, नामदेवराव ठाकरे, राजकुमार कस्तुरे, दिलीप मडावी आदींनी सहकार्य केले.
लोकमान्य माध्यमिक विद्यालय
वर्धा : दारोडा येथील लोकमान्य विद्यालयात आयोजित कार्यक्रमाला सरपंच प्रशांत घवघवे, वर्षा पोहाणे, संस्थेच्या अध्यक्षा शालिनी रेवतकर, उपाध्यक्षा अर्चना रेवतकर, मुख्याध्यापक उषा घोडमारे, प्रा. संदीप रेवतकर उपस्थित होते. संचालन भारत लोंढे तर आभार गजानन झाडे यांनी मानले.
केळझर परिसरात ध्वजारोहण
केळझर : येथे ठिकठिकाणी स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. ग्रामपंचायतच्या प्रांगणात सरपंच रेखा शेंदरे यांचे हस्ते ध्वजारोहण झाले. यशवंत विद्यालयात मुख्याध्यापक येसनसुरे, यांनी ध्वजारोहण केले. तसेच जि. प. प्राथमिक शाळा, विद्या कॉन्व्हेंट, दि बुद्धीस्ट इंटरनॅशनल स्कूल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, इंग्लिश स्कूल येथेही ही ध्वजारोहण करण्यात आले. शहीद हरिभाऊ लाखे यांच्या स्मारकस्थळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतचे सर्व सदस्यगण, अंगणवाडी सेविका, मदतनीस तलाठी, ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी, गावातील नागरिक उपस्थित होते.
सुगुणा कंपनी
वर्धा : येथे आयोजित कार्यक्रमाला जानकीरामण, ग्रामपंचायतचे माजी पोलीस पाटील नव्हाते, मुख्याध्यापक धनकर, डांगे, यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण झाले. संचालन मनोज दांडेकर यांनी केले. यानिमित्त हिंगणघाट मधील कारंजा चौक येथे वृक्ष वाटप करण्यात आले. यावर्षी ३ लाख झाडे वाटप करण्याचे उद्दीष्ट ठरविले आहे. यशस्वीतेकरिता नितीन पखाले, श्याम चौधरी, पंकज लंबोधरी, संजय साठे, कुलदीप वाटकर यांनी सहकार्य केले.
डॉ. आंबेडकर विद्यालय
वर्धा : येथे आयोजित कार्यक्रमात मुख्याध्यापक प्रमोद टापरे, माजी कृषी अधिकारी बाळासाहेब अलोणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाला मनोज धात्रक, सुनील बाभळे, वासंती हिवरे, चेतन पडोळे, सुजाता भानसे, प्रज्ञा कांबळे, शिबा शेख, सचिन फुलके, बबन सातघरे, शंकर रामदिन, जनार्दन अडमाचे, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
लिटिल एंजल्स स्कूल
वर्धा : येथे मुख्याध्यापक अजय फुलझेले, निशांत बांबोडे, सरला यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. संचालन अरुण घोटेकार यांनी केले. आभार प्रगती पराते यांनी मानले.
ग्राहक पंचायत
हिंगणघाट : येथे मुडे यांचे निवासस्थानी कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मधुकर रघाटाटे, जिल्हा अध्यक्ष मुडे, नगर अध्यक्ष कवडेश्वर बोबडे तसेच ग्राहक पंचायतचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
आॅक्सफोर्ड पब्लिक स्कूल
वायगाव(नि.) : येथे डॉ. सुभाष खंडारे, डॉ. चेतना सवई यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. संचालन शीतल व संगीता यांनी केले.
आनंद कनिष्ठ महाविद्यालय
वायफड : येथे संस्थेचे अध्यक्ष विलास कांबळे, सचिव वर्षा कांबळे, बाबा शेख, भुपती बाभळे यांच्या उपस्थितीत कांबळे यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रास्ताविक प्रशांत वैद्य यांनी केले. संचालन प्रा. सावन वाघमारे यांनी केले. आभार प्रा. वर्षा कुंडे यांनी मानले. यशस्वतीेकरिता प्रा. प्रिती नाखले, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
उच्च प्राथमिक शाळा, धामणगाव
वर्धा : येथे आयोजित कार्यक्रमात शिक्षक प्रमोद मुरार यांच्या बँड पथकासह शाळेच्या परिसरातून प्रभातफेरी काढण्यात आली. सरपंच नेहारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. संचालन मनीषा किनगावकर यांनी केले. आभार अरूण मांडवकर यांनी मानले. यावेळी छगन राऊत, प्रफुल कुचेवार, पोलीस पाटील कमलाकर राऊत उपस्थित होते. हेमंत जुनघरे, तक्षना लोहकरे यांनी सहकार्य केले.
न्यू आर्टस कॉलेज
वर्धा : स्वातंत्र्यदिनानिमित्त न्यु आर्टस, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेजतर्फे शहरातील वडत झोपडपट्टी, इतवारा परिसरात गरजूंना कपडे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता प्राचार्य डॉ. प्रशांत कडवे, प्रा. मनीष भोयर, डॉ. हेमंत मिसाळ, डॉ. मदन इंगळे, प्रा. संदीप पेटारे, डॉ. वंदना पळसापुरे आदींनी सहकार्य केले.
नेहरू विद्यालय
सालोड : येथे ग्राम सुधार शिक्षण मंडळाचे ज्येष्ठ सदस्य रामा मेहत्रे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाला मुख्याध्यापक पी. एम. वाके, पर्यवेक्षिका व्ही. एम.पिल्ललवार, यु. बी. नन्होरे, पी. एम. चरडे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
सावित्रीबाई फुले विद्यालय
वर्धा : येथे शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव अर्चना चौधरी, यांनी ध्वजारोहण केले. यावेळी एल. के. भोमले, मुख्याध्यापक एन. जे. काळबांडे, सी. एम. लोहकरे, ग्रामपंचायत सदस्य अभिजीत भेंडाळे उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्याध्यापक एन. जे. काळबांडे यांनी केले. संचालन एस. डी. मसराम यांनी केले. आभार सी. व्ही. पातोंड यांनी मानले.
मातोश्री रमाबाई विद्यालय
सिंदी(मेघे): येथे आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमाला प्राचार्य अनिता जाधव, मुख्याध्यापक पुष्पा चौधरी, दादासाहेब गायकवाड, रविकांत पाटील उपस्थित होते. यावेळी चंद्रभान गोटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.
तुकडोजी महाराज विद्यालय
वर्धा : येथे आयोजित कार्यक्रमात मुख्याध्यापक सुधाकर बोबडे, हुतात्मा स्मारक समितीचे संचालक शंकर कोल्हे, शिशुपाल सावळकर, रेवनसिद्ध हायगले, नामदेव पाटील, संजय तिळले, विलास येेंडे उपस्थित होते. यावेळी शालांत परीक्षेतील गुणवंताचा सत्कार करण्यात आला. यानंतर वृक्षारोपण करण्यात आले. प्रास्ताविक विलास येंडे यांनी केले. संचालन पुंडलिक नागतोडे, प्रदीप चोपडे यांनी केले. आभार पुष्पा गभणे यांनी मानले. कार्यक्रमाला अरुण हर्षबोधी, संजीवनी निंबाळकर, संतोष साटोटे, शरद वानखेडे, उद्धव गोडकर, कांता थुटे, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
जि. प. प्राथमिक केंद्र शाळा
बोथुडा : येथे स्वातंत्र्यदिनी मुख्याध्यापक दारोंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाला ज्ञानेश्वर किरपाल, सरपंच ज्ञानेश्वर कावळे, केंद्र प्रमुख हायगुने, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, तलाठी पन्नासे, आरोग्य सेविका जयश्री सुटे उपस्थित होते. संचालन रामटेके यांनी केले तर आभार कुंभलकर यांनी मानले. कार्यक्रमाकरिता चलाख,बुधे, तडस, फोंडेकर, शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
गिरड परिसरात ध्वजारोहण
गिरड : येथे विविध संस्था, संघटना व शासकीय कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये ठाणेदार संतोष शेगावकर, ग्राम पंचायतमध्ये सरपंच चंदा कांबळे, झेंडा चौकात भाऊराव गाठे, विकास विद्यालयात प्राचार्य प्रकाश गोडबोले, गजानन महाविद्यालयात अध्यक्ष स्वप्नील मोंढे, कन्या विद्यालयात त्रिवेदी, जि.प. मुलांच्या शाळेत अध्यक्ष दिलीप बोराकर, जि. प. मुलांची शाळेत बुरडकर, व्यापारी संकुलमध्ये अश्विनी दाभणे, गिरड ग्रामीण सह. पतसंस्थ्थेत वसंत पर्बत, जिजामाता सह. पतसंस्थेत देवका गिरडे, अहिल्याबाई सह. संस्थेत प्रमोद भुजाडे, भा. स्टेट बँक शाखेत मनीष रोहणकर, गिरड विविध सह. संस्थेत रवी गाठे, को.आॅ. बॅकेत बोरीकर, वीजवितरण कंपनीत कनिष्ठ अभियंता दरेकर, गुरुकुल कॉन्व्हेंटमध्ये रवी वरघणे, प्राथमिक स्वास्थ केंद्रात जि.प.सदस्य विना राऊत आणि पशुचिकित्सा रुग्णालयात डॉ. राघोर्ते यांनी ध्वजारोहण केले.
श्रीकृष्ण हायस्कूल, जामणी
वर्धा : येथे ठाकरे, देशपांडे, पोलीस पाटील अडसूळे, राजेंद्र उईके, ज्ञानेश्वर गव्हाळे, नरताम, भगत यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. प्रास्ताविक उरकुडे यांनी केले. संचालन प्राजक्ता अंबुलकर यांनी केले. यशस्वीतेकरिता येळणे, तेलरांधे, घंगारे, खोबे, गव्हाळे, सूर्यवंशी कावटे, डी. येळणे, चापडे, दुधबडे, शिक्षकेतर कर्मचारी धोंगडे, काळे, कोठाळे, ठाकरे, जुवारे आदींनी सहकार्य केले.
जि. प. महात्मा गांधी विद्यालय
वर्धा : येथे आयोजित कार्यक्रमात शहरातून वृक्षदिंडी काढण्यात आली. शाळेच्या परिसरामध्ये बकुळ, अंमलताश, कांचन, पिंंपळ, गुलमोहोर, जांभूळ इत्यादी प्रजातीची रोपे लावण्यात आली. कार्यक्रमाला सामाजिक वनीकरणचे उपसंचालक बडगे, जिल्हा शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर, लागवड अधिकारी खडतकर, प्राचार्य मुरारकर उपस्थित होते. संचालन जया टेकाडे यांनी केले. यशस्वीतेकरिता रीना राठोड प्रा. धांदे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.
उच्च प्राथमिक शाळा, इंझाळा
अल्लीपूर : इंझाळा येथे उच्च प्राथमिक शाळेत गावचे सरपंच झामरे, अध्यक्ष मुळे यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. प्रास्ताविक यदुराज मिस्कीन यांनी केले. प्रभातफेरी नंतर वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाला बोरकर, चांभारे, मदनवार, बुरांडे, भलमे, देऊळकर उपस्थित होते.
राष्ट्रभाषा प्रचार समिती
वर्धा : येथे समितीचे प्रधानमंत्री प्राध्यापक अनंतराम त्रिपाठी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी समितीचे पदाधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक आदींची उपस्थिती होती. बँड पथकाचे संचालन मारोती पोहाणे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन शोभा अंबादे यांनी केले. आभार संजय पालीवाल यांनी मानले.
हुतात्मा स्मारक परिसर
सेवाग्राम : हुतात्मा स्मारक परिसरात स्वातंत्र्यदिनी वृक्षारोपण कार्यक्रम निसर्ग सेवा समिती द्वारे घेण्यात आला. अध्यक्षस्थानी बापूराव देशमुख स्मारक समितीचे अध्यक्ष प्रकाश येंडे तर अतिथी म्हणून डॉ. गोपीचंद वडतकर, डॉ. विक्रम बेलखोडे, सुभाष ढोबळे उपस्थित होते. बा. दे. हांडे यांनी राष्ट्रवंदना घेतली. कार्यक्रमाला परिसरातील नागरिक उपस्थित होते.
स्वातंत्र्यदिनी रक्तदान शिबिर
वर्धा : भारतीय जैन संघटना, लॉयन्स, लॉयनेस व लिओ क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यदिनी दिंगबर जैन बोर्डिंग कपडा लाईन येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. डॉ. हेडगेवार रक्तपेढी ने रक्त संकलन केले. कार्यक्रमाला अनिल फरसोले, डॉ. विनोद अदलखिया, लता जैन, डॉ. अजय वाणे उपस्थित होते. संचालन मनोज श्रावणे यांनी केले. आभार लॉयन्स अध्यक्ष अभिषेक बेद यांनी मानले.
ह. भु. आदर्श शाळा
पुलगाव : येथे आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमाला संस्था सचिव प्रकाशचंद्र भुत, प्रमोद लुंकड, अ‍ॅड. दिनेश शर्मा, मुख्याध्यापक दुम्पलवार, उपमुख्यध्यापक हिरोडे, ठोंबरे उपस्थित होते. संचालन झिलपे तर आभार डोंगरे यांनी मानले.
एकलव्य आश्रमशाळा
समुद्रपूर : वायगाव(गौंड) येथील एकलव्य आदिवासी आश्रम शाळेत सुनील अनासने, शंकर झाडे, कमलाकर यसनसुरे यांच्या उपस्थिती ध्वजारोहण आणि वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाला मुख्याध्यापक चौधरी, राठोड, इंगोले आदी शिक्षक उपस्थित होते. प्रास्ताविक नरसापूरकर यांनी कले. संचालन सेलकर यांनी केले तर आभार चौधरी यांनी मानले.
ठाणेगावात ठिकठिकाणी ध्वजारोहण
ठाणेगाव : येथे ठिकठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले. नवप्रभात विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात प्राचार्य के.बी.साठवणकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष रवी मुन्ने तर अतिथी म्हणून सरपंच पे्रमिला बोरकर, साहेबराव पांडे, रमेश नागतूरे, तुकाराम डोंगरे, रमेश पवार, नामदेव देशमुख, दिलीप ठाकरे, बलराम मिश्रा, लता शेटे आणि सुमित्रा पवार उपस्थित होते. संचालन करित आभार सुनील रत्नपारखी यांनी केले. ग्राम पंचायत कार्यालयात सरपंच पे्रमिला बोरकर यांनी ध्वजारोहण केले. यावेळी ग्राम विकास अधिकारी के.के. कामडी, ग्रा.प.सदस्य यावेळी उपस्थित होते.
मोतीराम शिंदे महाविद्यालय
वर्धा : मांडगाव येथील मोतीराम शिंदे कॉलेज आणि कस्तुरबा नर्सिंग स्कूलमध्ये ध्वजारोहण झाले. यावेळी मोतीराम शिंदे, प्रभाकर देशमुख, पुरुषोत्तम ढबाले, चन्ने गुरुजी, सुप्रिया शिंदे, सुनिल शिंदे, सोनाली भेंडे, किरण सरदारे उपस्थित होते.
जि.प. माध्यमिक शाळा नागापूर
सेवाग्राम : नागापूर येथील माध्यमिक शाळेत तंटामुक्ती अध्यक्ष विठ्ठल कारामोरे यांनी ध्वजारोहण झाले. यावेळी सरपंच सतीश कुकडे, राजू भोयर, विष्णू मोहदूरे व शिक्षकवृंद उपस्थित होते.(लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Flag hoisting and plantation programs at the district's independence day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.