चौकांमधील झेंड्यांचे अतिक्रमण हटविले
By Admin | Updated: May 26, 2016 00:24 IST2016-05-26T00:24:34+5:302016-05-26T00:24:34+5:30
पोलिसांनी शहरात केलेल्या कारवाईत शहरातील रस्ता दुभाजकावर चौथरे बांधून त्यावर लावलेले झेंडे तसेच चौकांतील झेंड्याचे अतिक्रमण काढून टाकले.

चौकांमधील झेंड्यांचे अतिक्रमण हटविले
हिंगणघाट : पोलिसांनी शहरात केलेल्या कारवाईत शहरातील रस्ता दुभाजकावर चौथरे बांधून त्यावर लावलेले झेंडे तसेच चौकांतील झेंड्याचे अतिक्रमण काढून टाकले. पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली.
विविध राजकीय पक्षांचे तसेच विविध धार्मिक झेंड्यांचा यात समावेश होता. मागील काही वर्धापासून झेंडे, पताका, लावण्याची जणू स्पर्धाच निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत असे. त्यामुळे चौकांत तसेच रस्ता दुभाजकांवर झेंडे लावण्याचा प्रकार सामन्य झाला होता.
भारतीय प्रशासन सेवेतील परिविक्षाधीन अधिकारी निलोत्पल यांच्या नेतृत्वात पोलिसांनी ही कारवाई केली. या कारवाईत विठोबा चौक ते फिदा हुसैन पेट्रोलपंप तसेच तुकडोजी पुतळा चौक ते विठोबा चौक तसेच अन्य भागातील लावलेली झेंडे, चौथरे, लोखंडी खांब काढण्यात आले. धार्मिक उत्सवाच्या निमित्ताने सार्वजनिक स्थळी झेंडे लावायची बाब सामान्य आहे. पण चौरी बांधून त्यावर झेंडेही लावण्यात आले होते. झेंड्यास अपाय झाल्यास धार्मिक तलावाला निमंत्रण मिळते. कुठलीही परवानगी न घेता या प्रकाराची दखल आतापर्यंत घेतल्या जात नव्हती. परंतु याची दखल घेत हिंगणघाट पोलिसांनी ठोस कारवाई केली. याकरिता शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता. शांतता कायम राखून हे अतिक्रमण काळण्यात आले.(तालुका प्रतिनिधी)