पुलावर लोखंडी कठडे बसवा

By Admin | Updated: October 17, 2015 02:57 IST2015-10-17T02:57:04+5:302015-10-17T02:57:04+5:30

पिंपळगाव-शिवनगर मार्गावर असलेल्या पिंपळगाव जवळील नदीवर लोखंडी कठडे नसल्याने प्रवासाचा धोका वाढला आहे.

Fix iron rods on the bridge | पुलावर लोखंडी कठडे बसवा

पुलावर लोखंडी कठडे बसवा

मागणी : सार्वजनिक बांधकाम विभागाला आपचे निवेदन
वर्धा : पिंपळगाव-शिवनगर मार्गावर असलेल्या पिंपळगाव जवळील नदीवर लोखंडी कठडे नसल्याने प्रवासाचा धोका वाढला आहे. त्यामुळे येथे लोखंडी कठडे बसविण्याची मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
२०००-२००१ या वर्षात पिंपळगाव येथील नदीवरील पुलाचे काम करण्यात आले. परंतु पुलावरील कठडे लवकरच नाहीसे झाले. यामुळे पावसाळ्यात कठड्याअभावी अपघाताचा धोका संभावतो. वर्षभरापूर्वी एक शेतकरी या नदीत पुलावरून पडून मरण पावला. असे अपघात होऊ नये यासाठी पुलावर कठडे बांधावी, अशी मागणी करण्यात आली. शिष्टमंडळात प्रमोद हजारे, प्रमोद भोयर, शंकर बावणे, संदीप बावणे, उमेश नागतोडे, प्रवीण बावणे, मनोज जोगे, रोशन दुरूगवार, मंगेश शेंडे, आदींचा समावेश होता.(शहर प्रतिनिधी)

Web Title: Fix iron rods on the bridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.