शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
3
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
4
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
5
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
6
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
7
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
8
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
9
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
10
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
11
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
12
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
13
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
14
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...
15
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
16
Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले
17
"आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 
18
'शिंदेंसोबत जायला मी विरोध केला होता'; गजानन किर्तीकरांच्या पत्नीने मांडली रोखठोक भूमिका
19
...अन् अचानक तरुण झाला कोट्यधीश; खात्यात आले 9900 कोटी, बँक मॅनेजरही हैराण
20
"ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे...", अभिनेत्री वैशाली भोसलेला मतदान करता न आल्यामुळे व्यक्त केला संताप

शस्त्र बाळगण्यासह दारू विकणाऱ्या पाच व्यक्ती हद्दपार; उपविभागीय न्याय दंडाधिकाऱ्यांनी केला शिक्कामोर्तब

By महेश सायखेडे | Published: October 09, 2023 6:21 PM

गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आणि शस्त्र बाळगण्यासह दारूची विक्री करणाऱ्या पाच व्यक्तींना सहा महिन्यांकरिता हद्दपार करण्यात आले आहे.

वर्धा: गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आणि शस्त्र बाळगण्यासह दारूची विक्री करणाऱ्या पाच व्यक्तींना सहा महिन्यांकरिता हद्दपार करण्यात आले आहे. हा आदेश उपविभागीय न्याय दंडाधिकारी तथा उपविभागीय महसूल अधिकारी दीपक कारंडे यांनी निर्गमित केला आहे. वर्धा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रहिवासी सागर ज्ञानेश्वर घोडे रा. बोरगाव (मेघे), अक्षय दिगांबर पटले रा. सातपुते ले-आऊट, बोरगाव (मेघे), अज्जू वासुदेव राठोड रा. बोरगाव (मेघे), अमोल उर्फ बंटी महेंद्र शंभरकर रा. तारफैल व मनिष प्रसादीलाल ताराचंदी रा. आनंदनगर वर्धा यांच्याविरुद्ध वर्धा शहर पोलीस ठाण्यात घातक शस्त्र बाळगणे, दारू विक्री करणे आदी गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.

 त्यांच्याविरूद्ध वारंवार प्रभावी प्रतिबंधक कार्यवाही करूनही त्यांच्या वर्तणुकीत परिणाम न झाल्याने हद्दपारीचा प्रस्ताव पोलीस विभागाने उपविभागीय न्याय दंडाधिकारी तथा उपविभागीय महसूल अधिकारी दीपक कारंडे यांच्याकडे सादर केला. त्या निर्णयावर उपविभागीय न्याय दंडाधिकाऱ्यांनी शिक्कामोर्तब केल्याने या सहा व्यक्तींना हद्दपारीच्या आदेशाची अंमलबजावणी करीत कारवाई करण्यात आली आहे. बोरगाव (मेघे), आनंदनगर व तारफैल भागातील रहिवासी असलेल्या सहा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. संबंधित व्यक्तींना पुढील सहा महिने वर्धा जिल्ह्यात प्रवेशबंदी राहणार आहे. ही व्यक्ती वर्धा जिल्ह्यात कुणाला दिसल्यास त्याची माहिती नागरिकांनी पोलिसांना द्यावी. - कैलास पुंडकर, ठाणेदार, शहर, पोलीस स्टेशन, वर्धा.

टॅग्स :wardha-acवर्धाCrime Newsगुन्हेगारी