शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मनरेगाच्या कामावर पाच तर मस्टरवर दाखविले पंचवीस मजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2022 05:00 IST

वरिष्ठ अधिकारी रोपवाटिकेत पोहोचत चौकशी करीत असल्याचे कळताच सामाजिक वनीकरण विभागाची चांगलीच तारांबळ उडाली. आयुक्तांची बारकाईने पाहणी केली असता रोपवाटिकेत एकूण पाच मजूर बारमाही कामावर असताना सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी हजेरी पटावर चक्क २५ मजूर दाखविल्याचे निदर्शनास आले. गौडबंगाल करणाऱ्यांनी चक्क या २५ मजुरांच्या नावाने देयकही काढल्याचे पुढे आले. आयुक्त चौकशी अहवाल वरिष्ठांना सादर करणार आहे.

अमोल सोटेलोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) :  येथील सामाजिक वनीकरण कार्यालयांतर्गत विठ्ठलापूर रोपवाटिकेत भ्रष्टाचाराचा राक्षस चांगलाच मोठा झाल्याचा धक्कादायक प्रकार मनरेगा नागपूर विभागाच्या आयुक्तांच्या धडक चौकशीत नंतर पुढे आला आहे. कामावर पाच मजूर असताना मस्टरमध्ये तब्बल २५ मजूर दाखविण्यात आल्याचेही चौकशीत पुढे आले आहे. नागपूर विभागाचे मनरेगा आयुक्त शंतनू गोयल यांनी विठ्ठलापूर रोपवाटिकेला अचानक भेट दिली. वरिष्ठ अधिकारी रोपवाटिकेत पोहोचत चौकशी करीत असल्याचे कळताच सामाजिक वनीकरण विभागाची चांगलीच तारांबळ उडाली. आयुक्तांची बारकाईने पाहणी केली असता रोपवाटिकेत एकूण पाच मजूर बारमाही कामावर असताना सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी हजेरी पटावर चक्क २५ मजूर दाखविल्याचे निदर्शनास आले. गौडबंगाल करणाऱ्यांनी चक्क या २५ मजुरांच्या नावाने देयकही काढल्याचे पुढे आले. आयुक्त चौकशी अहवाल वरिष्ठांना सादर करणार आहे.

गरजूंना डावलण्यात मानली जायची धन्यता-   गरजू मजुरांनी कामाची मागणी करूनही अनेकांना डावलण्यात येत होते. हा प्रकार पिलापूर, जैतापूर, लहान आर्वी येथील काही मजुरांनी तक्रारीद्वारे मनरेगा विभागाला कळविला. त्याची दखल घेत मनरेगा नागपूर विभागाचे आयुक्त शंतनू गोयल यांनी विठ्ठलापूर रोपवाटिकेत तहसीलदारांच्या उपस्थितीत पाहणी केली. 

वर्षभराच्या कामांचे होणार ऑडिट-   सामाजिक वनीकरण आष्टी कार्यालयांतर्गत वर्षभर झालेल्या कामाचे ऑडिट वरिष्ठ पातळीवरून करण्यात येणार आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरात एकूण किती बनावट मजुरांच्या नावाने पैसे काढले हे अहवालाअंती स्पष्ट होणार आहे. चौकशी अहवालाकडे साऱ्यांचेच लक्ष लागून राहणार आहे. 

पितळ उघडे पडू नये म्हणून २० मजुरांना दाखविले गैरहजर

-   कामावर पाच मजूर असताना हजेरी पटावर २५ मजूर दररोज काम करीत असल्याचे दाखविले जात होते. ज्या दिवशी मनरेगा आयुक्तांचा दौरा झाला, त्यादिवशी आपले पितळ उघडे पडू नये म्हणून गैरप्रकार करणाऱ्यांनी तब्बल २० मजूर गैरहजर असल्याचे दाखविल्याचे आयुक्तांच्या प्रत्यक्ष पाहणीत पुढे आले आहे. प्रत्यक्ष पाहणीत अनेक गौडबंगाल पुढे आल्याने सामाजिक वनीकरण विभागाचे लागवड अधिकारी के. व्ही. आत्राम यांना विचारणा केली असता त्यांनी कुठलेही उत्तर दिले नाही, हे विशेष.

मजूर म्हणून कर्मचाऱ्यांच्या नावांची नोंद-   सामाजिक वनीकरणच्या आष्टी येथील कार्यालयातील तीन कर्मचारी यांनाही चक्क मजूर म्हणून दाखवून मस्टर काढण्याचा पराक्रम संबंधित अधिकाऱ्याने केला आहे. वरिष्ठांचा कुठलाही वचक नसल्यामुळे हा सर्व प्रकार बिनबोभाटपणे सुरू होता. साहित्य खरेदीचेही अनेक बनावट देयक  तयार करून ती मंजूर करून शासकीय निधीचा अपहार झाल्याचेही चौकशीत पुढे आले आहे.

प्रत्यक्ष पाहणीत अनेक गौडबंगाल पुढे आले आहे. याची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यासाठी वरिष्ठांना अहवाल पाठविण्यात येणार आहे. - शंतनू गोयल, आयुक्त, मनरेगा, नागपूर.

विठ्ठलापूर रोपवाटिकेत मनरेगा आयुक्त शंतनू गोयल यांनी पाहणी केली. यावेळी प्रत्यक्षात पाच मजूर कामावर होते. हजेरीपटावर २५ मजूर दररोज दाखविण्यात येत होते. दौऱ्याच्या दिवशी केवळ पाच मजूर उपस्थित होते. त्यामुळे आयुक्तांनी हे प्रकरण गंभीरपणे घेतले असून, संबंधित वनविभागाच्या अधिकाऱ्याला दोन वेळा कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. याप्रकरणी वरिष्ठांकडे अहवाल पाठविण्यात येणार आहे.- सचिन कुमावत, तहसीलदार, आष्टी (शहीद). 

 

टॅग्स :forest departmentवनविभागfraudधोकेबाजी