शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पाच लाखांचे चंदन लाकूड जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 00:33 IST

गस्तीवर असलेल्या रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी वर्धा रेल्वे स्थानक परिसरातून बेवारस स्थितीत पडून असलेल्या साहित्याची पाहणी केली. यावेळी एका बॅगमध्ये मोठ्या प्रमाणात चंदनाचे लाकूड असल्याचे त्यांना दिसले.

ठळक मुद्देवर्धा रेल्वे स्थानकच्या फलाट २ वर पडून होते बेवारस स्थितीत

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गस्तीवर असलेल्या रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी वर्धा रेल्वे स्थानक परिसरातून बेवारस स्थितीत पडून असलेल्या साहित्याची पाहणी केली. यावेळी एका बॅगमध्ये मोठ्या प्रमाणात चंदनाचे लाकूड असल्याचे त्यांना दिसले. हे लाकुड ६० हजारांच्या किंमतीचे असल्याचे बोलले जात असले तरी त्याची किंमत बाजारपेठेत सुमारे पाच लाखांच्या घरात असल्याचा कयास रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांच्यावतीने वर्तविला जात आहे.वर्धा रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी गस्तीवर असताना वर्धा रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक २ वर पडून असलेल्या बेवारस साहित्याची पाहणी केली. यावेळी एका बॅगमध्ये मोठ्या प्रमाणात लाकुड आढळून आले. हे लाकुड नेमके कुठल्या प्रजातीच्या झाडाचे आहे याची शहानिशा करण्यासाठी अधिकाऱ्यांनी घटनेची माहिती आपल्या वरिष्ठांना देत वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. माहिती मिळताच वर्धा वन परिक्षेत्र अधिकारी सागर बन्सोड यांनी आपल्या चमुसह घटनास्थळ गाठले.पाहणी अंती त्यांनी सदर लाकुड चंदनाचे असल्याचे रेल्वे सुरक्षा बलाच्या जनावांना सांगितले. सदर लाकुड रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी जप्त केले आहे. सदर प्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय वन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई नागपूर येथील वरिष्ठ सुरक्षा आयुक्त ज्योतीकुमार सतीजा यांच्या मार्गदर्शनात वर्धा रेल्वे सुरक्षा बलाचे ठाणेदार सुरेश कांबळे यांच्यासह त्यांच्या सहकार्यांनी केली.गांजा नंतर चंदन तस्करीचे हब?सेवाग्राम रेल्वे स्थानक गांजा तस्करीचे हब होऊ पाहत असल्याचे वेळोवेळी करण्यात आलेल्या कारवाई समोर आले आहे. तर याच पाश्वभुमिवर आता चंदन तस्करांनी वर्धा रेल्वे स्थानक होत पूढील प्रवास करण्यास सुरूवात केल्याचे या कारवाई वरून दिसून येत आहे.‘त्या’ अहवालावरून होणार किंमत निश्चितीजप्त केलेले लाकुड किती आहे याची माहिती पंचनामा करताना नोंदविण्यात आली आहे. सदर माहिती मैसुर येथे पाठविण्यात आली असून तेथून अहवाल प्राप्त झाल्यानंतर जप्त करण्यात आलेल्या चंदनाच्या लाकडाची योग्य किंमत माहित पडणार असल्याचे रेल्वे सुरक्षा बलाच्यावतीने सांगण्यात आले.

टॅग्स :Crimeगुन्हाrailwayरेल्वे