शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
3
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
4
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
5
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
6
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
7
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
8
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
9
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
10
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
11
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
12
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
13
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
14
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
16
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
17
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
18
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
19
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
20
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला

पुलगावच्या तत्कालीन ठाणेदारासह पाच कर्मचाऱ्यांवर अटकेची टांगती तलवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2024 17:10 IST

दोन वर्षांनंतर गुन्हा दाखल : वाळू प्रकरण आले अंगलट, 'लोकमत'ने केला होता पाठपुरावा

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : वाळू भरलेला ट्रॅक्टर पकडल्यानंतर ट्रॅक्टर चालक व मालकाला पैशाकरिता धमकावून तत्कालीन ठाणेदारासह पाच पोलिस कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण केली होती. पुलगावातील हे प्रकरण चांगलेच गाजले होते. याप्रकरणी पोलिसांविरुद्ध पोलिस अधीक्षकांकडे तक्रार देऊन आंदोलनही उभारण्यात आले होते. आजपासून उपोषण, २० रोजी करणार सामूहिक आत्मदहन पोलिसांच्या या गैरकृत्याबद्दल 'लोकमत'ने सातत्याने पाठपुरावा केला. अखेर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या चौकशीअंती दोन वर्षानंतर तत्कालीन ठाणेदारांसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याने आता अटकेची टांगती तलवार कायम आहे.

पुलगाव येथील तत्कालीन पोलिस निरीक्षक शैलेश शेळके, सहायक फौजदार खुशालपंत राठोड, हवालदार जयदीप जाधव, महादेव सानप व गजानन गहूकर असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची नावे आहेत. 

देवेंद्र प्रमोद ठाकरे (२९, रा. गुंजखेडा) यांच्याकडे ट्रॅक्टर व ट्रॉली असून यांच्या ट्रॅक्टरवर अमोल पंधरे (रा. गुंजखेडा) हा चालक होता. ६ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ८ वाजता दरम्यान ठाकरे यांच्या घरी बांधकामातून शिल्लक राहिलेले वाळू एम.एच. ३२ टी.सी. ३९९ क्रमांकाच्या ट्रॅक्टरने ठाणेगाव येथील मंदिरात नेत होते. यादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेने ट्रॅक्टर पकडून पुलगाव पोलिस ठाण्यात आणला. देवेंद्र आणि अमोल या दोघांनाही पोलिस ठाण्यात आणून त्यांच्याकडील मोबाइल व पर्स पोलिसांनी ताब्यात घेतले. सकाळी १० वाजताच्या सुमारास दोघांनाही पोलिस कोठडीत टाकले. त्यानंतर लगेच १० ते १५ मिनिटांनी सहायक फौजदार खुशालपंत राठोड यांनी दोघांनाही कोठडीतून काढून डीबी पथकाच्या खोलीत नेऊन बेदम मारहाण केली. त्यानंतर १ वाजता न्यायालयात हजर केल्यावर दोघांचीही पोलिस कोठडी रद्द करून जामिनावर सुटका करण्यात आली. 

सुटका झाल्यावर देवेंद्रने त्याचा भाऊ शुभमला फोन करून घ्यायला बोलावले. त्यामुळे देवेंद्र व अमोल हे दोघेही जप्त केलेले मोबाइल व पर्स घेण्याकरिता फौजदार राठोड यांच्याकडे गेले असता 'अर्ध्या तासात ठाणेदार साहेब येणार आहे. तेव्हापर्यंत थांबा' असे सांगून थांबवून ठेवले. यावेळी पोलिस कर्मचारी जयदीप जाधव यांनी या दोघांनाही पुन्हा डीबी रूममध्ये नेऊन एक लाखांची मागणी केली. तेवढे पैसे नसल्याचे सांगितल्यावर ७० हजार तरी द्यावे लागणार नाही तर मार खावा लागणार असे सांगितले. परंतु पैसे नसल्याने देण्यास नकार दिल्यावर तत्कालीन ठाणेदार शेळके, राठोड व गजानन गहूकर यांनी डीबी रूममध्ये जाऊन दोघांना जबर मारहाण केली. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता दोघांनाही सोडून दिले. 

घराकडे जाण्याकरिता निघाले असता जयदीप जाधव व महादेव सानप या पोलिस कर्मचाऱ्यांनी दोघांनाही बोलावून झालं गेलं विसरा, नाही तर वाईट होईल, असा दम दिला. निमुटपणे ऐकून दोघांनाही शुभम ठाकरे याने ग्रामीण रुग्णालयात नेले. तेव्हा डॉक्टरांनी परिस्थिती पाहून जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर केले. तेथे उपचार घ्यावा लागला. त्यामुळे विनाकारण पैशाकरिता बेदम मारहाण करणाऱ्या ठाणेदारासह त्यांच्या सहकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी देवेंद्र ठाकरे याने पोलिस अधीक्षकांकडे केलेल्या तक्रारीतून केली होती. पण, याप्रकरणी विभागांतर्गत कारवाई करून प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर गुरुवार, २६ सप्टेंबरला पुलगाव पोलिसांत तक्रार घेऊन तत्कालीन ठाणेदारांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पुलगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राहुल सोनवणे करीत आहे. 

ठाणेदार शेकळे ठरले वादग्रस्त पुलगावमध्ये रुजू झाल्यापासून ठाणेदार शैलेश शेळके विविध कारणांनी चांगलेच वादग्रस्त ठरले होते. यासंदर्भात 'लोकमत'ने वृत्त प्रकाशित करून पुलगाव पोलिसांचा तत्कालीन गैरकारभार चव्हाट्यावर आणला. ट्रॅक्टर मालक व चालकाला मारहाण केल्याचे प्रकरण चांगलेच तापले होते. नागरिकांनी रस्त्यावर उतरून या प्रकरणाचा निषेध केला होता. अखेर तत्कालीन पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी ठाणेदार शेळके यांना मुख्यालयी अटॅच केले होते. आता चौकशीअंती गुन्हा दाखल झाल्याने या अधिकारी व कर्मचाऱ्यांमुळे वर्दीवरच डाग लावण्याचा प्रकार यांनी केल्याचे बोलले जात आहे

टॅग्स :wardha-acवर्धा