पाच कोटी परतीच्या मार्गावर

By Admin | Updated: March 4, 2016 02:12 IST2016-03-04T02:12:35+5:302016-03-04T02:12:35+5:30

महाराष्ट्र राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शहिदभूमी आष्टीच्या विकासाकरिता पाच कोटी रुपये मंजूर केले होते.

Five crore return on the route | पाच कोटी परतीच्या मार्गावर

पाच कोटी परतीच्या मार्गावर

नगराध्यक्षाचा हेकेखोरपणा कारणीभूत : भाजपा नगरसेवकांचा आरोप
आष्टी (शहीद) : महाराष्ट्र राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शहिदभूमी आष्टीच्या विकासाकरिता पाच कोटी रुपये मंजूर केले होते. हा निधी नगराध्यक्षाच्या हेकेखोर वृत्तीमुळे परत जाण्याच्या मार्गावर असल्याचा आरोप भाजपच्या नगरसेवकांनी केला आहे.
येथील हुतात्मा स्मारक समिती पदाधिकाऱ्यांच्या निमंत्रणावरून पालकमंत्री मुनगंटीवार हे शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्याकरिता २० आॅगस्ट २०१५ ला आष्टी येथे आले होते. त्यावेळी येथील शहीद स्मारक व इतर मुलभूत सोई सुविधांकरिता ५ कोटी रुपयांचा निधी देण्याची त्यांनी घोषणा केली होती. त्यानुसार पालकमंत्र्यांनी १७ नोव्हेंबर २०१५ च्या पत्रान्वये ५ कोटी रुपयांचा निधी नगरविकास विभागाला उपलब्ध करून दिला. हा निधी सन २०१५-१६ मध्ये खर्च करावयाचा असल्याने नगरविकास मंत्रालयामार्फत जिल्हाधिकारी वर्धा यांना तातडीने विकास आराखडा तयार करून तांत्रिक व प्रशासकीय मान्यतेसह प्रस्ताव सादर करण्याबाबत आदेशित केले होते.
जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी नगर पंचायत आष्टीच्या मुख्याधिकारी डॉ. मेघना वासनकर यांना दिलेल्या निर्देशानुसार नगराध्यक्षांशी चर्चा करून १८ फेब्रुवारी २०१६ रोजी विशेष सभेचे आयोजन केले होते. हा विषय सभागृहासमोर ठेवला. या सभेला सर्व सदस्य उपस्थित होते. यावर सभागृहात चर्चा होवून चर्चेअंती बाकळी नदीवरील जुने शहीद स्मारक जेथे संग्राम घडला त्या ठिकाणाचा विकास, जुन्या पोलीस ठाण्याच्या इमारतीचा विकास, स्मशानभुमीचे बांधकाम, संरक्षणभिंत, ग्रंथालय, दशक्रिया घाट, कब्रस्तान, रस्ता-बांधकाम या कामांना बहुमताने मंजुरी देण्यात आली.

Web Title: Five crore return on the route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.