६४ वर्षांत पहिल्यांदाच ‘अध्यक्षपद’ ठरले चर्चेचा विषय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2020 05:00 AM2020-09-27T05:00:00+5:302020-09-27T05:00:25+5:30

महादेव विद्रोही यांची २ मार्च २०१४ ला सर्व सेवा संघाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. सर्व सेवा संघाच्या स्थापनेपासून वर्ष २०१९ पर्यंत अध्यक्षपदाचा वाद विकोपाला जाऊन त्याची हा विषय बहूचर्चेचा विषय ठरला नाही. मात्र, महादेव विद्रोही यांना अध्यक्षपदावरून पायउतार केल्यानंतर कलह उफाळून येत सध्या हा विषय चर्चेचा विषय ठरत आहे.

For the first time in 64 years, the presidency has become a topic of discussion | ६४ वर्षांत पहिल्यांदाच ‘अध्यक्षपद’ ठरले चर्चेचा विषय

६४ वर्षांत पहिल्यांदाच ‘अध्यक्षपद’ ठरले चर्चेचा विषय

Next
ठळक मुद्देसर्व सेवा संघातील कलह। आरोप-प्रत्यारोप सुरूच, अध्यक्षाला केले पदावरून पायउतार

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सर्व सेवा संघाचे अध्यक्ष महादेव विद्रोही यांना अध्यक्ष पदावरून पायउतार केल्यानंतर सध्या ‘अध्यक्षपद’ हे अनेकांसाठी चर्चेचा विषय ठरत आहे. विशेष म्हणजे मागील ६५ वर्षांच्या काळात कधीच सर्व सेवा संघाचे अध्यक्षपद चर्चेचा विषय ठरले नव्हते. मात्र, आता सर्व सेवा संघातील दोन्ही गटांकडून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.
आचार्य विनोबा भावे यांच्या आग्रहानंतर १९४८ मध्ये सर्व सेवा संघाची स्थापना झाली. सुमारे १९५२ मध्ये सर्व सेवा संघाची रितसर नोंदणी झाली. त्यानंतर सर्वसंमतीने अध्यक्ष म्हणून धीरेंद्र मझुमदार यांची २१ एप्रिल १९५४ मध्ये निवड करण्यात आली. ते सर्व सेवा संघाचे पहिले अध्यक्ष होते. तर वल्लभ स्वामी यांना २३ जून १९५६, नवकृष्ण चौधरी १३ एप्रिल १९६१, मनोहर चौधरी १६ नोव्हेंबर १९६२, एस. जगन्नाथ २३ एप्रिल १९६९, सिद्धराज धड्डा १६ मे १९७२, आचार्य राममूर्ती १७ जून १९७८, ठाकूरदास बंग १७ जुलै १९७९, रविंद्रनाथ उपाध्याय १८ जानेवारी १९८५, यशपाल मित्तल १२ डिसेंबर १९८७, पी. गोपीनाथ नायर १४ एप्रिल १९८९, नारायण देसाई १९ नोव्हेंबर १९९५, डॉ. गंगाप्रसाद अग्रवाल ९ नोव्हेंबर १९९८, अमरनाथ भाई १ डिसेंबर २००१, डॉ. सुगन बरंठ ८ डिसेंबर २००७, राधा भट यांना १९ फेबु्रवारी २०११ ला सर्व सेवा संघाचे अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली. तर महादेव विद्रोही यांची २ मार्च २०१४ ला सर्व सेवा संघाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. सर्व सेवा संघाच्या स्थापनेपासून वर्ष २०१९ पर्यंत अध्यक्षपदाचा वाद विकोपाला जाऊन त्याची हा विषय बहूचर्चेचा विषय ठरला नाही. मात्र, महादेव विद्रोही यांना अध्यक्षपदावरून पायउतार केल्यानंतर कलह उफाळून येत सध्या हा विषय चर्चेचा विषय ठरत आहे.

Web Title: For the first time in 64 years, the presidency has become a topic of discussion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.