गुप्तधन शोधण्याचा टोळीचा पहिलाच प्रयत्न
By Admin | Updated: November 20, 2014 22:57 IST2014-11-20T22:57:18+5:302014-11-20T22:57:18+5:30
येथील रूपेश मुळे नरबळी प्रकरणात मुख्य आरोपी आसिफ व्यतिरीक्त अटकेत सहा जणांची सखोल चौकशी सुरू आहे. गुप्त धन शोधण्याचा हा त्यांचा पहिलाच प्रयत्न असल्याची कबुली त्या सहाही आरोपींनी

गुप्तधन शोधण्याचा टोळीचा पहिलाच प्रयत्न
आरोपींची कुबली : अटकेतील शिक्षकाकडून कार जप्त
वर्धा : येथील रूपेश मुळे नरबळी प्रकरणात मुख्य आरोपी आसिफ व्यतिरीक्त अटकेत सहा जणांची सखोल चौकशी सुरू आहे. गुप्त धन शोधण्याचा हा त्यांचा पहिलाच प्रयत्न असल्याची कबुली त्या सहाही आरोपींनी दिल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली. अटक करण्यात आलेल्या या आरोपींमध्ये एक शिक्षक असून गुप्तधन शोधण्याकरिता झालेल्या प्रवासात वापरण्यात आलेली त्याची कारही जप्त करण्यात आली आहे.
रूपेश नरबळी प्रकरणात मुख्य आरोपीच्या संपर्कात आलेल्या पाच जणांना जादूटोणा प्रतिबंधक काद्यांतर्गत अटक करण्यात आली. या सहा जणांनी देवळी येथील एका शेतात जावून गुप्तधन शोधण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. गुप्तधन शोधण्याकरिता झालेला प्रवास अटकेत असलेला शिक्षक सुरेश धानोरे याच्या कारचा वापर करण्यात आला होता. ती एम.एच ३१ झेड ७७९५ क्रमांकाची कार जप्त करण्यात आली.
या प्रकरणात पोलिसांनी यापूर्वी मुख्य आरोपी आसिफ याच्या आॅटोसह रूपेशचे अवयव कापण्याकरिता वापरलेला ब्लेड व रक्ताने माखलेले कपडे जप्त केले. या प्रकरणाचा तपास सुरू असून यात आणखी अनेक गंभीर बाबी पुढे येण्याची शक्यता आहे.(प्रतिनिधी)