शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

‘फर्स्ट एड’ प्रशिक्षणाचा अभ्यासक्रमात अंतर्भाव करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 14:02 IST

वैद्यकीय विद्यार्थी सक्षम व्हावा म्हणून मुलभूत आपत्कालीन सेवा व प्राथमिक उपचार (फर्स्ट एड) देण्यास योग्य प्रशिक्षण नवीन वैद्यकीय अभ्यासक्रमात अंतर्भूत केले जात आहे.

ठळक मुद्देभारतीय वैद्यक परिषदेची माहिती मुलभूत आपत्कालीन सेवाही अभ्यासली जाणार

प्रशांत हेलोंडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मुलभूत आपत्कालीन सेवा तथा प्राथमिक उपचार याबाबत प्रशिक्षण न घेताच वैद्यकीय विद्यार्थ्यांना सक्षम घोषीत केले जात होते. ही बाब डॉ. खांडेकर व त्यांच्या पथकाने शासन व एमसीआयच्या लक्षात आणून दिली. यावरून वैद्यकीय विद्यार्थी सक्षम व्हावा म्हणून मुलभूत आपत्कालीन सेवा व प्राथमिक उपचार (फर्स्ट एड) देण्यास योग्य प्रशिक्षण नवीन वैद्यकीय अभ्यासक्रमात अंतर्भूत केले जात आहे. यासाठी एमसीआयने तब्बल २० वर्षांनी निर्णय घेतला, हे विशेष!देशातील आपत्कालीन सेवेचा दर्जा खालावला आहे. यामुळे असंख्य मृत्यू होत असून त्याची कारणे दर्शविणारा सविस्तर अहवाल महात्मा गांधी वैद्यकीय महाविद्यालय सेवाग्राम येथील न्यायवैद्यक शास्त्र विभागाचे प्रा.डॉ. इंद्रजीत खांडेकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांना पाठविला होता. सदर अहवाल पंतप्रधान कार्यालय व आरोग्य मंत्रालयाने भारतीय वैद्यक परिषदेला योग्य कार्यवाहीसाठी पाठविला. यावर कार्यवाही करताना एमसीआयने ही माहिती दिली. शिवाय प्रत्येक पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थ्यालाही मुलभूत आपत्कालीन सेवेचे प्रशिक्षण दिले जावे, असे निर्देश प्रत्येक महाविद्यालयाला दिले जाणार असल्याचे एमसीआयने नमूद केले.एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना १९९७ पासून कोणत्याही प्रात्यक्षिक परीक्षेविना तथा योग्य प्रशिक्षणाविना मुलभूत आपत्कालीन सेवा, कार्डीओ-पलमोनरी-रीसूसायटेशन (सीपीआर) व फर्स्ट एड देण्यास सक्षम घोषित केले गेले, हे विशेष! वैद्यकीय अभ्यासक्रम याबद्दल स्तब्ध आहे, असा खुलासा आरटीआय अंतर्गत एमसीआयने केला होता. इतकेच नव्हे तर मुलभूत आपत्कालीन सेवा, सीपीआर व प्राथमिक उपचार देण्यास वैद्यकीय विद्यार्थी सक्षम झाला आहे वा नाही, हे तपासण्यासाठी प्रात्यक्षिक परीक्षा घ्यावी, त्यासाठी कुठली पद्धत वापरावी याबाबत एमसीआयने आरोग्य विद्यापीठांना १९९७ पासून निर्देश दिलेच नसल्याचे समोर आले. यामुळे प्रात्यक्षिक परीक्षेदरम्यान मुलभूत आपत्कालीन सेवेसाठी प्रात्यक्षिक परीक्षा न घेता देशातील वैद्यकीय महाविद्यालये विद्यार्थ्यांना सक्षम व तज्ज्ञ म्हणून घोषित करीत असल्याचे उघड झाले होते. यावरून अहवाल तयार करून पंतप्रधान व केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना देण्यात आला होता.

२० वर्षांत दिशानिर्देश नाही, ही खेदाची बाबमुलभूत आपत्कालीन सेवा, कार्डीओ-पलमोनरी-रीसूसायटेशन (सीपीआर) व प्राथमिक उपचार हे शालेय शिक्षक तथा विद्यार्थ्यांनाही यायला हवे; पण वैद्यकीय विद्यार्थी या बाबींसाठी सक्षम होत आहे वा नाही, हे तपासण्यासाठी एमसीआयने २० वर्षांपासून कुठलेच दिशानिर्देश दिले नाही. ही बाब अत्यंत खेदाची असल्याची मते अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केली आहेत.

गरजेच्या वेळी डॉक्टरांची निवड करण्याची संधी नसते. यामुळे सर्व स्तरातील रुग्णालयात काम करणारे डॉक्टर मुलभूत आपत्कालीन सेवा व सीपीआर देण्यास सक्षम असायलाच हवे. एमबीबीएस डॉक्टरांना याबाबत प्रशिक्षित करण्याची जबाबदारी कायद्याने एमसीआयची आहे; पण एमसीआयने या अत्यंत महत्त्वाच्या मुलभूत बाबींकडे २० वर्षांपासून दुर्लक्ष केले होते.- प्रा.डॉ. इंद्रजीत खांडेकर, न्यायवैद्यक शास्त्र विभाग, महात्मा गांधी वैद्यकीय महाविद्यालय, सेवाग्राम.

टॅग्स :Healthआरोग्य